Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२०४)
महापुराण
(३२-१०
जगत्स्थितिरिवानाद्याघटितेव च केनचित् । जनश्रुतिरिवोपातगाम्भीर्या मुनिभिर्मता ॥ १०. व्यायता जीविताशेव मूछेव च तमोमयी।गतेवोल्लाघतां कृच्छान्मुक्तोमा शोधितान्तरा॥११ कुटीव च प्रसूताया निषिद्धान्यप्रवेशना । कृतरक्षाविधिारे धृतमङ्गलसंविधिः ॥ १२ तामालोक्य बलं जिष्णोर्दूरादासीत्ससाध्वसम् । तमसा सूचिभेयेन कज्जलेनेव सम्भता ॥ १३ चक्रिणा ज्ञापितो भूयः सेनानीः सपुरोहितः । तत्तमोनिर्गमोपाये प्रयत्नमकरोत्ततः ॥ १४ काकिणीमणिरत्नाभ्यां प्रतियोजनमालिरवत् । गुहाभित्तिद्वये सूर्यसोमयोमण्डलद्वयम् ॥ १५ तत्प्रकाशकृतोद्योतं सज्ज्योत्स्नातपसन्निधि । गुहामध्यमपध्वान्तं व्यगाहत ततो बलम् ॥ १६ चक्ररत्नज्वलद्दीपे ससेनान्या पुरः स्थिते । बलं तदनुमार्गेण प्रविभज्य द्विधा ययौ ॥ १७
जसे या जगाचे अस्तित्व अनादि आहे तशी ही गुहाही अनादिकालीन आहे तथापि कोणी निर्माण केल्यासारखी वाटते, जशी जिनेश्वराची वाणी गंभीरपणाला धारण करिते तशी ही गुहा अतिशय गंभीर आहे असे मुनीनी सांगितले आहे ।। १० ॥
ही गुहा जगण्याच्या इच्छेप्रमाणे जणु फार दीर्घ-लांबीने युक्त आहे. ही गुहा मूछेप्रमाणे आहे. मूर्छा जशी अज्ञानाने बेशुद्धीने युक्त असते तशी ही तमोमय-अंधकाराने भरलेली आहे व जशी एखादी आजारी स्त्री पोटातील मलशुद्धि केल्यामुळे आरोग्य युक्त व मुक्तोष्मा-उष्णज्वराने रहित होते तशी ही गुहा आतील भागाचे शोधन केल्यामुळे उष्णतेने रहित झाली आहे ॥ ११ ॥
___ जशी एखाद्या प्रसूत झालेल्या स्त्रीची झोपडी इतराना प्रवेश जीत नाही अशी असते तशी ही गुहा द्वारावर रक्षणकार्य होत असल्यामुळे इतराना प्रवेश मिळत नाही व जशी नूतन प्रसूतस्त्रीची झोपडी मंगलविधीनी सहित असते तशी ही मंगलविघीला धारण करणारी आहे ॥ १२ ॥
अशा त्या गुहेला दूरून पाहून चक्रवर्तीचे सैन्य भ्याले. तिच्यात सुईने फोडता येण्यासारखा अंधकार असल्याने जणु ती काजळाने भरल्याप्रमाणे वाटत होती ।। १३ ॥
- चक्रवर्तीने पुनः ज्याला सूचना दिली आहे अशा पुरोहितासहित सेनापतीने नंतर त्या गुहेतील अंधार नाहीसा करण्याचा उपाय याप्रमाणे केला ॥ १४ ॥
त्या दोघानी त्या गुहेच्या दोन भिंतीवर काकिणीरत्न व चूडामणिरत्न या दोन रत्नानी एक एक योजनाच्या अंतरावर सूर्य व चंद्र या दोघांचे मण्डल लिहिलेले होते, रचले होते ॥ १५ ॥
त्यांच्या प्रकाशाने ती गुहा उजेडसहित झाली. चन्द्रप्रकाश व सूर्यप्रकाशाच्या सानिध्याने गुहेचा मध्यभाग अंधाररहित झाला व त्यामुळे चक्रिसेनेने गुहेत प्रवेश केला ॥१६॥
चक्ररत्नरूपी उज्ज्वल दीप सेनापतीसह पुढे चालत होता व त्याच्या मार्गाला अनुसरून सैन्य दोन विभागाने युक्त होऊन चालले होते ॥ १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org