________________
द्वात्रिंशत्तमं पर्व अथान्येधुरुपारूढसम्भ्रमर्बलनायकः । प्रत्यपाल्यत सन्नद्धः प्रयाणसमयः प्रभोः ॥१ गजताश्वीयसैन्यानां पदातीनां च सडकुलः। न नृपाजिरमेवासीद्रुद्धमद्रेवनान्यपि ॥२ जयकुञ्जरमारूढः परीतो नृपकुञ्जरः । रेजे निर्यन्प्रयाणाय सम्राट शक्र इवामरैः ॥ ३ किञ्चित्पश्चान्मुखं गत्वा सेनान्या शोषिते पथि। ध्वजिनी सडकुचन्त्यासीदीर्याशुद्धि श्रितेव सा ॥४ प्रगुणस्थानसोपानां रूप्याद्रेः श्रेणिमश्रमात् । मुनेः शुद्धिरिव श्रेणीमारूढा सा पताकिनी ॥५ तमिस्रति गुहा यासौ गिरिव्याससमायतिः। उच्छिता योजनान्यष्टौ ततोऽर्धाधिकविस्तृतिः ॥६ वाचं कपाटयोर्युग्मं या स्वोच्छायमितोच्छिति । दधे पृथक्स्वविष्कम्भसाधिकवचंशविस्तृति ॥ ७ पराय॑मणिनिर्माणरुचिमद्वारबन्धना । तवधस्तलनिस्सर्पसिन्धुस्रोतोविराजिता ॥८ अशक्योद्घाटनान्येषां मुक्त्वा चक्रिचमूपतिम् । तन्निरर्गलितत्वाच्च प्रागेव कृतनिवृतिः ॥९
नंतर दुसरे दिवशी ज्याना पुढे प्रयाण करण्याची फार त्वरा उत्पन्न झाली आहे असे जे अनेक सेनापति ते सन्नद्ध होऊन भरतचक्रीच्या प्रयाणसमयाची वाट पाहात राहिले ॥१॥
हत्तींचा समुदाय, घोडेस्वारांचे सैन्य व पायदळ यांच्या दाटीनी भरतनृपाच्या राजवाड्याचे अंगणच फक्त व्यापले होते असे नाही तर विजयार्द्धपर्वतावरील सर्व वनेही व्यापिली होती ॥२॥
__ जो आपल्या विजयशाली हत्तीवर बसला आहे व ज्याला अनेक श्रेष्ठ राजांनी वेढले आहे व जो प्रयाणासाठी-शत्रूना जिंकण्यासाठी निघत आहे असा सम्राट भरत देवानी घेरलेल्या इन्द्राप्रमाणे शोभत होता ।। ३ ॥
थोडेसे पश्चिमेकडे वळून सेनापतीने शुद्ध केलेल्या मार्गात संकोचून जाणारी ती सेना जणु ईर्यापथशुद्धीला प्राप्त झाली आहे असे वाटले ॥४॥
___ जसे मुनींच्या चारित्राची विशुद्धता उत्कृष्ट गुणस्थानाची ( आठवे, नौवे, दहावे या गुणस्थानांची ) जी श्रेणी आहे त्यावर वाढत जाते तशी भरतेशाची सेना ज्याच्यावर उत्तम पायऱ्या बनविल्या आहेत अशा त्या विजयार्धपर्वताच्या श्रेणीवर चढू लागली ॥ ५॥
या विजयापर्वताची तमिस्रा नावाची जी गुहा आहे ती पर्वताच्या रुंदीबरोबर रुंदीची होती व लांबीही तितकीच होती. मात्र तिची उंची आठ योजन प्रमाणाची होती व रुंदी बारा योजन प्रमाणाची होती ॥ ६ ॥
या गुहेचे दोन दरवाजे वज्राचे-वज्रमय होते व तिच्या उंची इतके उंच होते आणि सहा सहा योजन रुंद होते व या दरवाजांची चौकट महामूल्य रत्नानी बनविलेली असल्यामुळे अतिशय चमकत होती व तिच्या खालच्या भागातून निघालेल्या सिन्धुनदीच्या प्रवाहाने शोभत होती ॥ ७-८॥
ही गुहा चक्रवर्तीच्या सेनापतीवाचून इतराकडून उघडली जाणे शक्यच नसते व ते उद्घाटन पूर्वीच झाले असल्यामुळे आता ती गुहा जिची शान्ति केली आहे अशी झाली आहे ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org