________________
३१-१४५)
महापुराण
जाता वयं चिरादद्य सनाथा इत्युदाशिषः । केचिच्चक्रधरस्याज्ञामशठाः प्रत्यपत्सत ॥ १३७ सन्धिविग्रहयानादिषाड्गुण्यकृतविक्रमाः । बलात्प्रणामिताः केचिदश्वर्यलवदूषिताः ॥ १३८ कांश्चिदुर्गाश्रिताम्लेच्छानवस्कन्दनिरोधनः । सेनानीर्वशमानिन्ये नमत्यज्ञोऽधिकं क्षतः॥१३९ केचिद्बलैरवष्टब्धास्तत्पीडां सोढुमक्षमाः। शासने चक्रिणस्तस्थुः स्नेहो नापीलितात्खलात् ॥१४० इत्युपायरुपायज्ञः साषयम्लेच्छभूभुजः । तेभ्यः कन्यादिरत्नानि प्रभोर्नोग्यान्युपाहरत् ॥ १४१ धर्मकर्मबहिर्भूता इत्यमी म्लेच्छका मताः । अन्यथान्यः समाचाररार्यावर्तेन ते समाः ॥१४२ इति प्रसाध्य तां भूमिमभूमि धर्मकर्मणाम् । म्लेच्छराजबलैः साधं सेनानीयवृतत्पुनः ॥ १४३ रराज राजराजस्य साश्वरत्नचम्पतिः। सिद्धदिग्विजयो जैत्रः प्रताप इव मूर्तिमान् ॥ १४४ सतोरणामतिक्रम्य स सिन्धोर्वनवेदिकाम् । विगाढश्च ससोपानां रूप्याद्रवनवेदिकाम् ॥ १४५
आपण आज पुष्कळ दिवसानंतर सनाथ झालो असे म्हणून मंगलाशीर्वाद देणाऱ्या कित्येक सरळ मनाच्या लोकानी चक्रवर्तीची आज्ञा मान्य केली ॥ १३७ ।।
संधि-तह, विग्रह-युद्ध, यान-पळून जाणे, आसन-दबा धरून बसणे, संश्रय-प्रबळ राजाचा आश्रय घेणे, द्वेधीभाव-फितुरी करणे या गुणानी पराक्रम करणारे व थोड्याशा वैभवाने उन्मत्त झालेल्या कित्येक राजाना सेनापतीने जबरदस्तीने नम्र केले ॥१३८ ।
किल्ल्याचा आश्रय करून राहणाऱ्या कित्येक राजाना ताब्यात घेण्यासाठी सेनापतीने त्यांच्या वाटा रोखून धरिल्या व त्याना अशा रीतीने वश केले. हे ठीकच झाले कारण फार त्रास दिला असता अज्ञ मनुष्य नम्र होतो ।। १३९ ॥
कित्येक म्लेच्छ राजाना सैन्याने वेढले. तेव्हा त्यांचा त्रास सोसण्यास असमर्थ झालेले ते चक्रवर्तीच्या आज्ञेवरून वश झाले. बरोबरच आहे की न दाबलेल्या पेंडीतून जसे तेल निघत नाही तसे त्रास न दिलेल्या दुष्टापासून स्नेह उत्पन्न होत नाही ॥ १४० ॥
___ याप्रमाणे अनेक युक्ति जाणणाऱ्या त्या सेनापतीने अनेक उपायानी म्लेच्छराजांना जिंकले व त्यांच्यापासून प्रभूस भोगण्यास योग्य असे कन्यादिक पदार्थ त्याने घेतले ॥ १४१ ।।
हे म्लेच्छ धर्म-अहिंसा वगैरे धर्म आणि सदाचार यांनी रहित होते म्हणून हे म्लेच्छ होत पण बाकीच्या विवाहादि आचारानी आर्यावर्तातील लोकासारखे होते. याप्रमाणे धर्मकर्माला अयोग्य अशा त्या भूमीला-प्रदेशाला जिंकून तो सेनापति म्लेच्छराजांच्या सैन्यासह पुनः ‘परतला ।। १४२-१४३ ॥
सर्वराजांचा राजा अशा भरतेश्वराचा अश्वरत्नाने युक्त असलेला सेनापति जो जयकुमार तो म्लेच्छांना जिंकण्याच्या कार्यानी फार शोभला. कारण सर्व हा विजय मिळविणारा व साक्षात् जणु शरीरधारी पराक्रम आहे असा होता ॥ १४४ ॥
या सेनपतीने सिन्धुनदीच्या द्वारासहित वनवेदिकेला उल्लंघून विजयार्धपर्वताच्या पायऱ्यानी युक्त अशा वनवेदिकेत प्रवेश केला ॥ १४५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org