________________
१९८)
महापुराण
(३१-१२८
निपेतुरमरस्त्रीणां दृक्क्षेपः सममम्बरात् । सुमनः प्रकरास्तस्मिन्हासा इव जयश्रियः॥ १२८ तटवेदी ससोपानां रौप्याद्रः समतीयिवान्। सोऽभ्यत्सतोरणां सिन्धोः पश्चिमां वनवेदिकाम्॥१२९ वेदिकां तामतिक्रम्य सञ्जगाहे परां भुवम् । नानाकरपुरग्रामसीमारामैरलडकृताम् ॥ १३० प्रविष्टमात्र एवास्मिन्प्रजास्त्रासमुपाययुः । समं दारगवैरन्या घटन्ते स्म पलायितुम् ॥ १३१ केचित्कृतधियो धीराः सार्धाः पुण्याक्षतादिभिः । प्रत्यग्रहीषुरभ्येत्य सबलं बलनायकम् ॥ १३२ न भेतव्यं न भेतव्यमाध्वमाध्वं यथासुखम् । इत्यस्याज्ञाकरा विष्वक्भ्रेमुराश्वासितप्रजाः॥१३३ म्लेच्छखण्डमखण्डाज्ञः परिक्रामन्प्रदक्षिणम् । तत्र तत्र विभोराज्ञां म्लेच्छराजैरजिग्रहत् ॥१३४ इदं चऋषरक्षेत्रं स चैव निकटे प्रभुः । तमाराधयितुं यूयं त्वरध्वं सह साधनः ॥ १३५ भरतस्यादिराजस्य चक्रिणोऽप्रतिशासनम् । शासनं शिरसा दध्वं यूयमित्यन्वशाच्च तान् ॥१३६
जयश्रीचे जणु हास्य असा फुलांचा समूह आकाशातून देवांगनांच्या नेत्रकटाक्षासह त्या सेनापतीवर पडला ।। १२८ ।।
विजयापर्वताची पायऱ्यानी युक्त असलेली जी तटवेदी ती त्या सेनापतीने ओलांडली व तोरणानी सहित असलेल्या सिन्धुनदीच्या पश्चिमेकडच्या वनवेदिकेकडे तो आला ॥ १२९ ॥
ती वेदिकाही ओलांडून सेनापति अनेक धातूंच्या खाणी, नगरे, गावे व त्यांच्या सीमावर असलेली उद्याने यांनी शोभणाऱ्या अशा उत्तम भूप्रदेशावर आला ॥ १३० ॥ - त्या प्रदेशात सेनापतीने प्रवेश केल्याबरोबर तेथील प्रजा फार घाबरली व कांही लोक आपल्या स्त्रिया व गायी, बैल वगैरे पशु बरोबर घेऊन पळून जाण्याची तयारी करू लागले।।१३१॥
___ कांही पूर्वापरविचार करणारे जे धैर्यवंत लोक होते त्यानी मंगलाक्षतादिकासह अर्घ्य-आदर करण्याचे साहित्य घेतले व सैन्यासहित असलेल्या सेनापतीकडे ते आले व त्याचा त्यांनी आदर केला ॥ १३२ ॥
__आपण भिऊ नका, भिऊ नका; सुखाने राहा, सुखाने राहा याप्रमाणे सेनापतीच्या आज्ञेला कळविणारे सेवक सर्वत्र फिरले व त्यानी सर्वप्रजाना आश्वासन दिले. व त्यांचे भय दूर केले ॥१३३॥
ज्याच्या आज्ञेचा भंग कोठेही झाला नाही अशा त्या सेनापतीने सर्व म्लेच्छखंडाला प्रदक्षिणा घातली व त्या त्या ठिकाणी भरतप्रभूची आज्ञा सेनापतीने त्यांना मान्य करावयास लाविली ॥ १३४ ॥
जेथे आपण राहिलेले आहात ती भूमि चक्रवर्तीची आहे व तो प्रभु जवळच आहे, तुम्ही आपल्या सैन्यासह त्याला सन्तुष्ट करण्याकरिता लोकर चला, त्वरा करा ॥ १३५ ॥
भरतचक्री, या युगाचा पहिला अथवा मुख्य राजा आहे. यास्तव कधी भंग न पावणाऱ्या त्याच्या आज्ञेला तुम्ही सर्वजण आपल्या मस्तकावर धारण करा असे सेनापतीने त्या म्लेच्छराजाना सांगितले ॥ १३६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org