Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१९६)
महापुराण
(३१-१०९
विप्रकृष्टान्तरावासवासिनो व्यन्तरा वयम् । संविधेयास्त्वयेदानी प्रत्यासत्राः पदातयः॥१०९ विद्धि मां विजयाद्धस्य मर्मज्ञममृताशनम् । कृतमालं गिरेरस्य कूटेऽमुष्मिन्कृतालयम् ॥११० मयि स्वसात्कृते देव स्वीकृतोऽयं महाचलः । सगुहाकाननस्यास्य गिरेगर्भविदस्म्यहम् ॥१११ गर्भज्ञोऽहं गिरेरस्मीत्यत्त्यल्पमिदमुच्यते। द्वीपाधिवलये कृत्स्ने नास्माकं कोऽप्यगोचरः ॥११२. वटस्थानवटस्थांश्च कूटस्थान्कोटरोटजान् । अक्षपाटान क्षपाटांश्च विद्धि नःसार्व सर्वगान्॥११३ इति प्रशान्तमोजस्वि वचः सम्भाष्य सादरम् । सोऽमरो विततारासी भूषणांनि चतुर्दश ॥११४ तान्यनन्योपलभ्यानि प्राप्य चक्री परां मुदम् । भेजे सत्कृतसत्कारैः सुरः सोऽप्याप सम्मदम् ॥११५
तं रोप्याद्रिगुहाद्वारप्रवेशोपायशंसिनम् । प्रविसय॑ स्वसेनान्यं प्राहिणोत्प्रभुरग्रतः ॥ ११६ त्वमुद्घाटय गुहाद्वारं यावनिर्वाति सा गुहा । तावत्पाश्चात्यखण्डस्य निर्जयाय कुरूद्यमम् ॥११७
हे प्रभो, आम्ही फार दूरच्या स्थानी निवास करणारे व्यन्तरदेव आहोत पण आता आपण आम्हाला जवळ राहणारे शिपाई हुजरे करावे ।। १०९ ॥
मी या विजयार्धपर्वताचे सर्व मर्म जाणणारा देव आहे, माझे ‘कृतमाल' हे नांव आहे व या पर्वताच्या शिखरावर माझे निवासस्थान आहे ॥ ११० ॥
हे देवा, मला आपण वश केले आहे त्यामुळे हा सर्व पर्वत देखिल आपण स्वाधीन करून घेतला आहे. मी गुहा व वने यानी युक्त असलेल्या या पर्वताच्या आत असलेल्या सर्व पदार्थांचा ज्ञाता आहे ॥ १११॥
मी या पर्वताच्या गर्भात असलेले पदार्थ जाणतो असे जे म्हणालो ते मी थोडेच सांगितले पण सर्व द्वीप व सर्वसमुद्रांचे जे मण्डल आहे त्यात आम्हाला न समजणारा असा कोणताही पदार्थ नाही ॥ ११२ ।।
हे सार्व-सर्वांचे हित करणाऱ्या हे राजा, वडांच्या झाडावर, पातालस्थानी, पर्वतांच्या शिखरावर, झाडांच्या ढोलीत व पर्णरचित झोपडी या ठिकाणी राहणारे व दिवसा आणि रात्रीही सर्वत्र फिरणारे व सर्व ठिकाणी जाणारे आहोत असे आम्हास आपण समजावे ॥११३॥
याप्रमाणे प्रशान्त पण तेजस्वी असे भाषण कृतमाल देवाने केले व आदराने त्याने चक्री भरताला चौदा अलंकार दिले ॥ ११४ ।।
इतरापासून न प्राप्त होणारे ते चौदा अलंकार कृतमाल देवापासून भरत चक्रीला मिळाले. त्यामुळे त्याला फार आनंद वाटला. यानंतर भरत चक्रीनेही त्या देवाचा आदर केला व त्यालाही त्यामुळे मोठा आनंद वाटला ॥ ११५ ॥
त्या कृतमाल देवाने विजयार्द्ध पर्वताचे गुहाद्वार उघडण्याचा उपाय सांगितल्यावर त्या देवाचे चक्रीने विसर्जन केले व भरतप्रभूने आपल्या सेनापतीला पुढे पाठवून दिले ॥ ११६ ॥
हे सेनापते, तू गुहेचा दरवाजा उघड व ती गुहा शान्त होईपर्यन्त पश्चिम खंडाला जिंकण्यासाठी उद्योग कर अशी आज्ञा चक्रीने सेनापतीला केली ॥ ११७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org