Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१-१०८)
महापुराण
(१९५
गीर्वाणा वयमन्यत्र जिगीषो क्षतगीश्वराः। त्वयि कुण्ठगिरो जाताः प्रस्खलद्गर्वगद्गदाः ॥१०२ राजोक्तिस्त्वयि राजेन्द्र राजतेऽनन्यगामिनी । अखण्डमण्डलां कृत्स्ना षटखण्डां गां नियच्छति॥१०३
चक्रात्मना ज्वलत्येष प्रतापस्तव दुःसहः । प्रथते दण्डनीतिश्च दण्डरलच्छलाद्विभोः ॥ १०४ ईशितव्या मही कृत्स्ना स्वतंत्रस्त्वमसीश्वरः। निधिरत्नद्धिरैश्वयं कापरस्त्वादशः प्रभुः ॥१०५ भ्रमत्येकाकिनी लोकं शश्वत्कोतिरनर्गला । सरस्वती च वाचाला कथं ते ते प्रिये प्रभोः ॥१०६ इति प्रतीतमाहात्म्यं त्वां समाजयितुं दिवः । त्वद्वलध्वानसंक्षोभसाध्वसाद्वयमागताः ॥ १०७ कूटस्था वयमस्याः स्वपदावविचालिनः । भूमिमेतावती तावत्त्वया देवावतारिताः ॥ १०८
आम्ही गीर्वाण आहोत, आपणाशिवाय विजयाची इच्छा करणारा जो दुसरा पुरुष आहे त्याच्याविषयी आम्ही तीक्ष्ण वचनरूपी बाण धारण करणारे आहोत. पण आपल्यापुढे आम्ही कुण्ठितवचन होत आहोत. आमचा अहंकार गळून गेला आहे व आमचे भाषण गद्गद स्वराने बाहेर पडत आहे ॥ १०२॥
__ हे राजेन्द्रा, ज्याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी जात नाही संभवत नाही असा 'राजा' हा शब्द अखण्ड देशानी युक्त सहा खंडानी युक्त अशा सर्व पृथ्वीला ताब्यात ठेवणाऱ्या तुझ्याच ठिकाणी शोभत आहे ॥ १०३ ॥
हे राजेन्द्रा, या चक्ररत्नाच्या स्वरूपाने तुझा हा दुःसह पराक्रम प्रज्वलित झाला आहे. आणि प्रभु अशा तुझी ही दण्डनीति (अपराधी लोकाना शिक्षा करणे) दण्डरत्नाच्या मिषाने सर्वत्र प्रसिद्ध होत आहे ॥ १०४ ॥
हे राजन्, ही सर्व पृथ्वी तुजकडूनच पालन केली जाण्यास योग्य आहे व तूच स्वतन्त्र असा या पृथ्वीचा ईश्वर-स्वामी आहेस. नऊ निधि आणि चौदा रत्नांची समृद्धि हे ऐश्वर्य तुला प्राप्त झाले आहे. तुझ्यासारखा दुसरा कोण या पृथ्वीचा प्रभु आहे बरे ? ॥ १०५ ॥
हे प्रभो, तुझी कीर्ति जिला कोठेही प्रतिबंध नाही अशी एकटी सर्वभूतलावर सतत भटकत आहे व कोठेही स्खलन न पावणारी तुझी वाणी देखिल चोहीकडे सारखी फिरत आहे. मग अशा स्वतंत्र झालेल्या या दोन स्त्रिया प्रभु-समर्थ अशा तुला कशा बरे आवडतात ? अर्थात् हे प्रभो, तुझी कीर्ति सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे व तुझी वाणी सर्व विषयात प्रवृत्त झाली आहे हे तात्पर्य ॥ १०६ ।।
___याप्रमाणे ज्याचे माहात्म्य-मोठेपणा प्रसिद्ध आहे अशा आपला सत्कार करण्यासाठी आकाशातून आपल्या सैन्याच्या क्षोभाने भिऊन आम्ही येथे आलो आहोत ॥ १०७॥
- आम्ही या पर्वताच्या शिखरावर राहणारे आहोत व आपल्या स्थानाहून अन्यत्र जात नसतो. पण हे देवा, इतक्या लांब भूमीवर आपण आम्हास यावयास भाग पाडले आहे ॥१०८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org