Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१-९२)
महापुराण
सामवायिकसामन्तसमाजेरिति सर्वतः । सरिदोघरिवाम्भोषिरापूर्यत विभोर्बलम् ॥ ८५ सवनः सावनिः सोऽद्रिः परितो रुरुधे बलैः। जिनजन्मोत्सवे मेरुरनीकरिव नाकिनाम् ॥ ८६ विजयाचिलप्रस्था विभोरत्यासिता बलः । स्वर्गावासश्रियं तेनुविभक्तर्नुपमण्डपः॥ ८७ प्रक्ष्वेलितरथं विष्वक् प्रहेषिततुरङ्गमम् । प्रबृंहितगजं सैन्यं ध्वनिसादकरोगिरिम् ॥ ८८ बलध्वानं गुहारन्धेः प्रतिश्रुभूतमुद्वहन् । सोऽद्रिरुद्रिक्ततायोध्रुवं फूत्कारमातनोत् ॥ ८९ अत्रान्तरे ज्वलन्मौलिप्रभापिञ्जरिताम्बरः । ददृशे प्रभुणा व्योम्नि गिरेरवतरत्सुरः ॥ ९०
स ततोऽवतरन्नद्रेर्बभौ सानुचरोऽमरः । सवनः कल्पशाखीतु लसदाभरणांशुकः ॥ ९१ दिव्यः प्रभान्वयः कोऽपि सम्मूछेति किमम्बरे । तडित्पुञ्जः किमयचिरिति दृष्टःक्षणं जनैः॥९२
नद्यांच्या समूहानी समुद्र जसा भरून जातो तसे सहायता देणाऱ्या सामन्तराजाच्या समूहानी भरतेश्वराची सेना सर्वबाजूनी भरून गेली ॥ ८५ ॥
जसे जिनेश्वराच्या जन्मोत्सवप्रसंगी देवांच्या सैन्यानी नन्दनादिवने व सर्व जमिनीसह मेरुपर्वत पूर्ण व्यापला होता तसे तो विजयार्धपर्वत त्याच्या वनासह व जमिनीसह भरतेश्वराच्या सैन्यानी सर्व बाजनी पूर्ण व्यापला होता ।। ८६ ॥
विजयार्धपर्वताची शिखरे भरतप्रभूच्या सैन्याकडून पूर्ण व्यापिली होती व अनेक राजांचे जे तेथे वेगवेगळे मनुष्य होते त्यानी तेथे स्वर्गातील घरांची शोभा उत्पन्न केली होती ॥ ८७ ।।
त्या विजयापर्वतावर रथांचा सिंहाप्रमाणे आवाज होत होता. चोहीकडे घोड्याचे खिकाळणे ऐकू येत होते व हत्तींच्या सैन्याचा चीत्कार शब्द होत होता या सर्व शब्दानी त्याला शब्दमय केले होते ॥ ८८ ॥
___सैन्याचे ध्वनि त्या पर्वताच्या गुहामध्ये पसरून मोठे प्रतिध्वनि उत्पन्न होत असत. जणु सैन्याच्या सर्वबाजूंच्या घेराव्यानी त्याला त्रास झाल्यामुळे तो जणु मोठ्याने फार सुस्कारे टाकीत आहे असे वाटत होते ॥ ८९ ।।
___ अशावेळी ज्याने उज्ज्वल मुकुटाच्या कान्तीनी आकाश पिवळसर केले आहे, असा एक देव त्या पर्वतावरून खाली उतरत असता भरतप्रभूकडून आकाशात पाहिला गेला ॥ ९० ॥
त्या पर्वतावरून आपल्या अनुचरासह खाली उतरणारा तो देव अलंकार व वस्त्रे यानी शोभत असल्यामुळे वनासह असलेल्या सालंकार व वस्त्रयुक्त अशा कल्पवृक्षाप्रमाणे शोभत होता ॥ ९१॥
___ ज्याचे वर्णन करता येत नाही. दिव्य असा हा कान्तींचा समुदाय जणु आकाशाला सर्वत्र व्यापित आहे काय, असा भासणारा, किंवा हा विजांचा पुंज आहे काय किंवा ह्या अग्नीच्या ज्वाला आहेत काय अशा रीतीने लोकाकडून काही वेळपर्यन्त तो देव उतरत असता पाहिला गेला ॥ ९२ ।। म. २५
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org