Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१९४)
महापुराण
(३१-९३
किमप्येतदपिज्योतिरित्यादावविशेषतः । पश्चादवयवव्यक्त्या प्रव्यक्तपुरुषाकृतिः ।। ९३ कृतमालश्रुतिव्यक्त्यै कृतमालः स चम्पकः । कृतमाल इवोत्फुल्लो निदध्ये प्रभुणाग्रतः ॥ ९४ सप्रणामं च सम्प्राप्तं तं वीक्ष्य सहसा विभुः । यथार्हप्रतिपत्त्यास्मायासनं प्रत्यपादयत् ॥ ९५ प्रभुणानुमतश्चायं कृतासनपरिग्रहः । क्षणं विसिष्मिये पश्यन्धामामुष्यातिमानुषम् ॥ ९६ । सम्भाषितश्च सम्राजा पूर्व पूर्वाभिभाषिणा । सुरः प्रचक्रमे वक्तुमिति प्रश्रयवद्वचः ॥ ९७ क्व वयं क्षुद्रका देवाः क्व भवान्दिव्यमानुषः । पौतन्यमुचितं मन्ये वाचाटयति नः स्फुटम् ॥९८ आयुष्मन्कुशलं प्रष्टुं जिह्रोमः शासितुस्तव । त्वदायत्ता यतः कृत्स्ना जगतः कुशलक्रिया ॥ ९९ लोकस्य कुशलाधाने निरूढं यस्य कौशलम् । कुशलं दक्षिणस्यास्य बाहोस्ते मां जिगीषतः॥१०० देवानां प्रिय देवत्वं त्वयाशेषजगज्जयात् । नाम्नैव तु वयं देवा जातिमात्रकृतोक्तयः ॥ १०१
__ प्रथमतः हे कांही तर उत्तम तेज आहे अशा सामान्य कल्पनेने व नंतर अवयवांच्या व्यक्ततेने त्याची पुरुषाकृति स्पष्ट लोकाकडून पाहिली गेली व नंतर आपल्या कृतमाल या नावाच्या स्पष्टतेसाठी चाफ्यांच्या फुलांच्या माळा ज्याने धारण केल्या आहेत म्हणून फुललेल्या कृतमालनामक वृक्षाप्रमाणे जो दिसत आहे असा तो देव भरतराजाने आपल्यापुढे "पाहिला ॥ ९३-९४ ॥
___नमस्कार करीत आपल्याकडे आलेल्या त्या देवाला प्रभुभरताने तत्काल पाहिले व त्याचा योग्य आदर करून त्याला त्याने आसन दिले. त्याला प्रभुभरताने बसण्यास अनुमति दिली. आसनावर बसलेल्या या देवाला इतर मानवाना ज्याने उल्लंधिले आहे असे भरताचे तेजस्वीरूप दिसले व क्षणपर्यन्त तो विस्मित झाला ॥ ९५-९६ ॥
प्रथम प्रश्नरूपाने बोलणाऱ्या चक्रवर्तीकडून प्रथम विचारला गेलेला तो देव याप्रमाणे नम्रतायुक्त भाषण करू लागला ॥ ९७ ॥
हे प्रभो, आम्ही क्षुद्रदेव कोणीकडे व आपण दिव्यमनुष्य कोणीकडे. अर्थात् आपण आमच्यापेक्षा फार मोठे आहात. हे प्रभो, आमचा देवपणा आम्हाकडून योग्य असे भाषण करवीत आहे. आमचा कमीपणा आम्हास तुमच्याशी बोलावयास लावित आहे हे उघड आहे ॥ ९८॥
हे.दीर्घायुषी राजा, तू सर्व जगाचे रक्षण करणारा आहेस म्हणून तुझे कुशल विचारण्यास आम्हाला लाज वाटते. कारण सगळ्या जगाचे क्षेमकुशल करणे तुझ्याच हातात आहे ॥ ९९ ॥
- जगाचे कल्याण करण्याचे चातुर्य ज्याचे प्रसिद्ध आहे व सर्व जगाला जिंकणाऱ्या या तुझ्या उजव्या बाहूचे कुशल आहे ना ? ॥ १०० ॥
हे देव, आपण देवाना देखिल प्रिय आहात, आपण सर्व जगाला जिंकले आहे म्हणून आपल्या ठिकाणीच देवपणा योग्य आहे. पण आम्ही नावानेच देव आहोत. फक्त देवजातीमध्ये आमचा जन्म झाला म्हणून आम्ही देव म्हटले जात आहोत ॥ १०१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org