Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३१-७६)
महापुराण
(१९१
संमिता भृशं रेज़र्भटाः प्रोल्लासितासयः । निर्मोकरिव विश्लिष्टर्ललज्जिह्वा महाहयः ॥७०. साटोपं स्फुटिताः केचिद्वल्गन्तिस्माभितो भटाः । अस्युद्यताः पुरोऽरातीन्पश्यन्त इव सम्मुखम् ॥ ७१ अस्त्रय॑स्त्रश्च शस्त्रश्च शिरस्त्रैः सतन्त्रकैः । दधुर्जयनशालानां लीलां रथ्याः सुसम्भृताः ॥ ७२ रथिनो रथकड्यासु गुरुरायुधसम्पदः । समारोप्यापि पत्तिभ्यो भेजुरेवातिगौरवम् ॥ ७३ हस्तिनां पदरक्षाय सुभटा योजिता नृपः । राजन्यः सहयुध्वानः कृप्ताश्चाभिनिपादिनः ॥७४ प्रवीरा राजयुध्वानः क्लुप्ताः पत्तिषु नायकाः । आश्वीये च ससन्नाहाः सोत्तरङ्गास्तुरङगिणः ॥७५ आरचय्य बलान्येके स्वानीक्षां चक्रिरे नपाः । दण्डमण्डलभोगासंहृतव्यूहैः सुयोजितैः ॥ ७६
ज्यानी आपल्या अंगात चिलखत घातले आहे व आपल्या चमकणाऱ्या तरवारी ज्यानी हातात घेतल्या आहेत असे काही वीर ज्यांची कात शिथिल झाली आहे व ज्यांच्या जिभा वारंवार बाहेर फिरत आहेत अशा महासप्रिमाणे दिसले ॥ ७० ॥
__ कांही योद्धयानी अभिमानाने आपले दंड ठोकले व ते इकडे तिकडे ऐटीने चालू लागले व आपल्यापुढे समोर जणु आपण आपल्या शत्रूना पाहात आहोत असे त्याना वाटले व त्यानी आपल्या तलवारी भ्यानातून वर काढल्या ।। ७१ ।।
आग्नेयबाण आदिक अस्त्रे, काठी लाठी वगैरे व्यस्त्रे, तरवार, जंबिया आदिक शस्त्रे व चिलखतानी सहित अशी शिरस्त्राणे इत्यादिकानी भरलेले सैन्य जेथून चालत आहे. असे रस्ते शस्त्रशालांच्या शोभेला धारण करू लागले ॥ ७२ ॥
___ अतिशय वजनदार आयुधसंपत्ति आपल्या रथसमूहात ज्यानी ठेविली आहे असे रथात बसलेले वीर पायदळ सैन्यापेक्षा अधिक गौरवाला वजनदार पणाला पावले. अर्थात् रथिक वीरानी शस्त्रादिकाचे ओझे रथात ठेवले होते पण पायदळ सैन्याने ते आपल्या अंगावर धारण केले होते तथापि रथिकापेक्षा ही पायदळ अधिक वजनदार झाले नाही. अर्थात् पायदलापेक्षा रथिकाची योग्यता अधिक आहे. असे समजावे ।। ७३ ॥
हत्तीच्या पायांचे रक्षण करण्याकरिता राजानी सुभटाची-वीराची योजना केली होती. ते शत्रूशी युद्ध करीत असलेल्या त्या वीराना नंतर महात बनविले. महात पडल्यानंतर त्याच्या जागी त्या वीराची योजना केली अर्थात् महाताच्या कामातही ते चतुर असल्यामुळे ते त्याकामी योजिले गेले ॥ ७४ ॥
राजाबरोबर युद्ध करणारे असे वीरपुरुष ते पायदळावरचे अधिकारी म्हणून नेमले गेले आणि जे घोडेस्वार ज्यानी कवच धारण केले होते व जे तरङ्गयुक्त नदीप्रमाणे होते त्याना घोडेस्वारांचा सेनापति बनविले होते ॥ ७५ ॥
दंडव्यूह- ओळीने सैन्य उभे करणे, मण्डलव्यूह- गोलाकाराने सैन्याला उभे करणे, भोगव्यूह- अर्धगोलाकाराने सैन्य उभे करणे, असंहृतव्यूह- पसरून सैन्याला उभे करणे याप्रमाणे आपल्या सैन्याची रचना करून राजे आपल्या सैन्याना पाहात होते ॥ ७६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org