Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१९०)
महापुराण
(३१-६२
विष्वगापूर्यमाणस्य रैराशिभिरनारतम् । कोशप्रावेश्यरत्नानामियत्तां कोऽस्य निर्णयेत् ॥ ६२ देशाध्यक्षा बलाध्यक्षवलं सुकृतरक्षणम् । यवसेन्धनसन्धानस्तदोपजगहुश्चिरम् ॥ ६३ उत्तरार्षजयोद्योगं प्रभोः श्रुत्वा तदागमन् । पार्थिवाः कुरुराजाद्याः समग्रबलवाहनाः ॥ ६४ आहूताः केचिदाजग्मुः प्रभुणा मण्डलाधिपाः । अनाहूताश्च सम्भजुर्विभुं चारभटाः परे ॥ ६५ विदेशः किल यातव्यो जेतव्या म्लेच्छभूभुजः। इति सञ्चिन्त्य सामन्तः प्रायः सज्जं धनुर्बलम्॥६६ धन्विनः शरनाराचसम्भृते युधि बन्धनः । न्यवेदयन्निवात्मानमणदासमधीशिनाम् ॥ ६७ ।। धनुर्धरा धनुः सज्जमास्फाल्याचकृषुः परे । चिकीर्षव इवारीणां जीवाकर्ष सहुअकृताः ॥ ६८ करबालान्करे कृत्वा तुलयन्ति स्म केचन । स्वामिसत्कारभारेण नूनं तान् प्रमिमित्सवः ॥ ६९
सर्व बाजूनी धनराशीनी जो नेहमी भरला जात आहे, अशा या भरतराजाच्या खजिन्याच्या घरात ज्याचा प्रवेश झाला आहे अशा रत्नांच्या संख्येचा कोण बरे निर्णय करू शकेल ? कोणासही त्याचा निर्णय करता येणार नाही ।। ६२ ॥
त्यावेळी जवळच्या देशाच्या राजानी ज्याचे सेनापतीकडून चांगले रक्षण केले गेले आहे अशा सैन्याचे गवत, लाकडे, भाजीपाला इत्यादिकानी दीर्घकालपर्यंत चांगले पोषण केले ॥ ६३ ॥
भरतक्षेत्राच्या उत्तर भागाला जिंकण्याचा उद्योग भरतराजाकडून केला जात आहे हे कुरुराज जयकुमार वगैरे राजानी ऐकले तेव्हा ते संपूर्ण सैन्य व अनेक प्रकारच्या वाहनाना घेऊन भरतराजाकडे आले ॥ ६४ ॥ .
प्रभु भरताकडून बोलावले गेलेले कित्येक देशाचे राजे त्यावेळी आले व कित्येक उत्तम योद्धे न बोलावताही प्रभुकडे आले ॥ ६५ ॥
आता विदेशावर स्वारी करण्याकरिता जावयाचे आहे व म्लेच्छ राजांना जिंकावयाचे आहे असा विचार करून माण्डलिक राजानी धनुष्य धारण करणाऱ्या सैन्याचा खूप संग्रह केला ॥६६॥
ते धनुर्धारी वीर शर-नाराच-लहानमोठे असे जे तीक्ष्ण बाण त्यानी व्याप्त अशा युद्धात आपण आपल्या मालकाचे ऋणी नोकर आहोत जणु असे चिलखत वगैरेच्या बंधनानी दर्शवू लागले ॥ ६७ ॥
हुंकार शब्द करून कांही धनुष्य धारण करणारे वीर शत्रूच्या जीवाचे जणु आकर्षण करण्याची इच्छा करीत आहेत असे होऊन दोरी लावून आपले धनुष्य टणत्कार करून ओढू लागले ॥ ६८ ॥
कित्येक वीर तरवारी हातात घेऊन त्या तोलू लागले. आपल्या मालकाने केलेल्या सत्काराच्या वजनाशी आपल्या तलवारीची बरोबरी होते काय हे ते जणु पाहात आहेत असे तेव्हां दिसले ॥ ६९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org