Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१८८)
महापुराण
(३१-४३
देव, विग्विजयस्याद्धं विभजन्नेष सानुमान् । विजया स्थिति धत्ते तात्स्थ्यात्तबूढयो वयम् ॥४३
आयुष्मन् युष्मदीयाज्ञां मूर्ना स्रजमिवोद्रहन् । पदातिनिविशेषोऽस्मि विज्ञाप्यं किमतः परम् ॥४४ इति ब्रुवंस्तथोत्थाय शिवस्तीर्थाम्बुभिः प्रभुम् । सोऽभ्यषिञ्चत्सुरः सार्द्ध स्वं नियोगं निवेदयन् ॥ ४५
तदा प्रणेदुरामन्द्रमानकाः पथि वार्मुचाम् । विचेरुर्मरुतो मन्दमाधूतवनवीथयः ॥ ४६ ननृतुः सुरनर्तक्यः सलीलार्तितभ्रवः। जगुश्च मङ्गलान्यस्य जयशंसोनि किन्नराः ॥ ४७ कृताभिषेकमेनं च शुभ्रनेपथ्यधारिणाम् । युयोज रत्नलाभेन लम्भयन्स जयाशिषः॥ ४८ स तस्मै रत्नभृङ्गारं सितमातपवारणम् । प्रकीर्णकयुगं दिव्यं ददौ च हरिविष्टरम् ॥ ४९ इति प्रसाधितस्तेन वचोभिः सानुवर्तनः । प्रसादतरलां दृष्टि तत्र व्यापारयत्प्रभुः ।। ५० विजितश्च सानुशं प्रभुणा कृतसक्रियः । भृत्यत्वं प्रतिपाद्यास्य स्वमोकः प्रत्यगात्सुरः॥५१ विजयाः जिते कृत्स्नं जितं दक्षिणभारतम् । मन्वानो निधिराट्तच्च चक्ररत्नमपूजयत् ॥ ५२
हे देवा, हा पर्वत दिग्विजयाचा अर्धा विभाग करीत असल्यामुळे विजयाध नाव धारण करीत आहे व मी या पर्वतावरच राहत असल्यामुळे मीही त्याच नावाचा धारक आहे ॥४३॥
हे आयुष्यवंता, मी आपली आज्ञा मस्तकाने मालेप्रमाणे धारण करीत आहे व मी पादचारी सैनिकाप्रमाणे आहे. यापेक्षा मी अधिक काय सांगू ? ॥ ४४ ॥
याप्रमाणे बोलून तो उठला व त्याने कल्याण करणाऱ्या तीर्थजलानी सर्व देवाना बरोबर घेऊन चक्रवर्तीचा अभिषेक केला व दिग्विजय करणाऱ्या चक्रवर्तीचा अभिषेक करणे हे माझे काम व ते मी पार पाडले आहे असे त्याने चक्रवर्तीला कळविले ॥ ४५ ॥
__ त्यावेळी आकाशांत गंभीरपणाने नगारे वाजू लागले व वनपंक्तीना मन्दमन्द कंपित करीत वारे वाहू लागले. भुवया लीलेने वर उडवीत नर्तकी नाचू लागल्या व किन्नरदेव जयसूचक मंगलश्लोक गाऊ लागले ॥ ४६-४७ ।।
ज्याचा अभिषेक केला गेला आहे व ज्याने शुभ्र वस्त्र धारण केली आहेत अशा भरतप्रभूला जयलाभाचे आशीर्वाद विजयार्धदेवाने दिले व अनेकरत्नांचा नजराणा दिला ॥४८॥
___ या विजयार्धदेवाने भरतप्रभूला रत्नाची झारी, शुभ्र छत्र, दोन दिव्यचवऱ्या व सिंहासन हे नजराणा म्हणून दिले ॥ ४९ ॥
विनययुक्त भाषणानी त्याने चक्रवर्तीला गौरविले. त्यावेळी भरतप्रभूने सन्तुष्ट होऊन त्याच्याकडे प्रसादयुक्त चंचल दृष्टीने पाहिले ॥ ५० ॥
भरतप्रभूने त्याचा सत्कार करून त्याला जाण्याची परवानगी दिली. त्या देवाने मी आपला दास आहे असे कबूल केले व तो आपल्या घराकडे गेला ॥ ५१ ।।
_ विजया पर्वत जिंकला म्हणजे सर्व दक्षिणभारत जिंकला असे मानणाऱ्या निधिपति भरताने त्यावेळी चक्ररत्नाची पूजा केली ॥ ५२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org