Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१८६)
महापुराण
(३१-२६
विषाणोल्लिखितस्कन्धो रुषिताताम्रितेक्षणः । खुरोत्खातावनिः सैन्यैर्ददृशे महिषो विभीः ॥२६ चमूरवश्रवोद्भूतसाध्वसाः क्षुद्रका मृगाः । विजयार्षगुहोत्सङ्गान्युगक्षय इवाश्रयन् ॥ २७ अनुद्रुता मृगाः शावैः पलायाञ्चक्रिरेऽभितः। वित्रस्ता वेपमानाङगाः सिक्ता भयरसैरिव ॥२८ वराहाररति मुक्त्वा वराहा मुक्तपल्वलाः । विनेशविस्फटाथाश्चमूक्षोभादितोऽमुतः ॥ २९ वरणावरणास्तस्थुः करिणोऽन्ये भयद्रुताः । हरिणा हरिणारातिगहान्तानधिशिश्यिरे ॥३० इति सत्वा वनस्येव प्राणाः प्रचलिता भृशम् । प्रत्यापत्ति चिरादीयुः सैन्यक्षोभे प्रसेदुषि ॥३१ प्रयायानुवनं किञ्चिदन्तरं तदनन्तरम् । रौप्याद्रेमध्यमं कुटं सन्निकृष्य स्थितं बलम् ॥ ३२ ततस्तस्मिन्वने मन्दमरुतान्दोलितद्रुमे । नृपाज्ञया बलाध्यक्षाः स्कन्धावारं न्यवेशयन् ॥ ३३
आपल्या शिंगानी झाडाच्या फांदीला घासणारा, क्रोधाने ज्याचे डोळे लालबुंद झाले आहेत, ज्याने आपल्या खुरानी भूमि खोदली आहे व जो निर्भय आहे असा जंगली रेडा सैन्यानी पाहिला ॥ २६ ॥
सैन्याच्या मोठ्या कोलाहलाला ऐकून जे भ्याले असे क्षुद्र हरिण वगैरे प्राणी युग क्षयाच्यावेळी प्रलयकोलाचे वेळेप्रमाणे विजया पर्वताच्या गुहांच्या मध्यभागात घुसून बसले. तात्पर्य-प्रलयकालाचे वेळी जीव जसे विजयार्धपर्वताच्या गुहांचा आश्रय घेतात तसे यावेळी देखिल अनेक प्राण्यानी सैन्याचा शब्द ऐकून भीतीने त्याच्या गुहांचा आश्रय घेतला ॥ २७ ॥
__हरिणाप्रमाणे त्यांची पिलेही त्यांच्या पाठीमागे चोहोबाजूनी पळू लागली. ती घाबरली होती. त्यांची अंगे थरथर कापत होती व ती जणु भयाच्या रसानी न्हाली होती ।। २८ ॥
सैन्याच्या मोठ्या कोलाहलाला ऐकून रानटी डुकरानी आपल्या उत्तम आहारावरचे प्रेम त्यागले व डबक्यातले लोळणे त्यानी त्यागिले व आपल्या कळपातून ती फुटून वेगळी झाली आणि इकडून तिकडून पळत सुटली ॥ २९ ॥
कांही अन्य हत्ती भयाने पळून विशिष्ट झाडानी आच्छादित होऊन उभे राहिले होते व हरिण भयाने पळून हरिणांचे शत्रु असे जे सिंह त्यांच्या गुहांच्या आत जाऊन उभे राहिले ॥३०॥
याप्रमाणे वनाचे जणु प्राण असे ते चंचल प्राणी जेव्हा सेनेचा क्षोभ बरेच वेळानंतर शान्त झाला तेव्हा पुनः आपल्या पूर्वस्थळी आले ॥ ३१ ॥
यानंतर त्याच वनात ते सैन्य कांही अन्तर चालून गेले व विजयार्धपर्वताच्या मध्य शिखराच्या म्हणजे पाचव्या कूटाच्या जवळ त्याने आपला तळ दिला ॥ ३२ ॥
यानंतर भरतेशाच्या आज्ञेने मन्दवाऱ्याने जेथे वृक्ष हलत आहेत अशा त्या वनात सेनापतीनी सैन्याची स्थाने डेरे तंबू हे लावले. अर्थात् सेना तेथे राहिली ॥ ३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org