Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१८४)
महापुराण
कोटयोऽष्टादशास्य स्युजिनां वाथुरंहसाम् । आजानेयप्रधानानां योग्यानां चक्रवर्तिनः ॥९ रुद्धरोपोवना क्षुण्णतटभूसियन्त्यपः । सिन्धोः प्रतीपतां भेजे प्रयान्ती सा पताकिनी ॥ १० प्रभोरिवागमात्तुष्टा सिन्धुः सैन्याधिनायकान् । तरङगपवनैर्मन्दमासिषेवे सुखाहरः॥ ११ गङगावर्णनयोपेतां फेनाढयां सम्मुरवागताम् । तां पश्यन्नुत्तरामाशां जितां मेने निधीश्वरः॥१२ अनुसिन्धुतटं सैन्यैरुदीच्यान्साधयन्नृपान् । विजयार्धाचलोपान्तमाससाद शनैर्मनुः ॥ १३ स गिरिमणिनिर्माणनवकूटविशङ्कटः । ददृशे प्रभुणा दूराद्धृतार्घ इव राजतः ॥ १४ स शैलः पवनाधूतचलशाखाग्रबाहुभिः । दूरादभ्यागतं जिष्णुमाजुहावेव पादपैः ॥ १५ सोऽचलः शिखरोपान्तनिपतन्निराम्बुभिः । प्रभोरुपागमे पाद्यं संविधित्सुरिवाचकात् ॥ १६ स नगो नागपुन्नागपूगादिद्रुमसङकुल । रम्यैस्तटवनोद्देशैराह्वत्प्रभुमिवासितुम् ॥ १७
वायुप्रमाणे ज्यांचा वेग आहे, जे उत्तम जातीचे व योग्य आहेत असे घोडे या चक्रवर्तीजवळ अठरा कोटि होते ॥ ९॥
जिने तटावरील वने व्यापिली आहेत, जिने तटप्रान्त खोदला आहे, जिने तिचे पाणी कमी केले आहे अशी ती चाललेली चक्रवर्तीची सेना जणु सिन्धुनदीबरोबर वैर करीत आहे अशी वाटली ॥ १० ॥
जणु भरतप्रभूच्या आगमनाने सन्तुष्ट झालेल्या सिन्धुनदीने सुख देणान्या आपल्या तरङ्गाच्या वान्यांनी सेनेच्या मुख्य नायकांची हळूहळू सेवा केली ।। ११ ॥
गंगानदीच्या वर्णनाप्रमाणे असलेली, फेसानी भरलेली व आपल्या समोर आलेली अशा त्या सिन्धु नदीला पाहून निधिस्वामी भरताने उत्तरदिशा मी जिंकली असे मानले ।। १२॥
सिन्धुतटाला अनुसरून राहणाऱ्या उत्तरदिशेच्या अनेक राजांना आपल्या सैन्याच्याद्वारे वश करणान्या भरतमनूने विजयापर्वताजवळ हळूहळू प्रवेश केला ॥ १३ ॥
रत्नखचित अशा नऊ शिखरानी विस्तृत दिसणारा तो चांदीचा विजयापर्वत जणु ज्याने अर्घ धारण केले आहेत अशा भरतेशाकडून पाहिला गेला ।। १४ ।।
वायने हाललेले शाखांचे अग्र हेच कोणी बाहु ज्याचे आहेत अशा वृक्षानी तो पर्वत विजयशाली व दूरून आलेला जणु पाहुणा अशा भरतप्रभूला बोलावित आहे असा दिसला ॥ १५ ॥
शिखरांच्याजवळ पडणाऱ्या झन्यांच्या पाण्यांनी तो पर्वत प्रभु जवळ आले असतां त्यांना पाय धुण्यास पाणी देण्याकरितां जणु उभा राहिला आहे असा शोभला ॥ १६ ।।
तो पर्वत नागवृक्ष, नागकेसर, सुपारी आदिक वृक्षांनी रमणीय दिसणारे जे तटवनाचे प्रदेश त्यांनी प्रभु भरताला येथे बसा म्हणून जणु बोलावित आहे असा शोभू लागला ॥ १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org