Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
एकत्रिंशत्तमं पर्व कौबेरोमथ निर्जेतुमाशामभ्युद्यतो विभुः । प्रतस्थे वाजिभूयिष्ठः साधनः स्थगयन्दिशः॥१ पौरितर्गतमुत्साहैः सत्त्वं शिक्षां च लाघवः । जाति वपुर्गुणस्तज्ज्ञास्तदाश्वानां विजज्ञिरे ॥२ धौरितं गतिचातुर्यमुत्साहस्तु पराक्रमः । शिक्षाविनयसम्पत्तीरोमच्छायावपुर्गुणः ॥ ३ पुरोभागानिवात्यतुं पश्चाद्भागः कृतोद्यमाः । प्रययुर्वृतमध्वानमध्वनीनास्तुरङगमाः ॥ ४ खुरोद्भतान्महीरेणून्स्वाङगस्पर्शभयादिव । केचिद्वयतीयुरध्यध्वं महाश्वाः कृतविक्रमाः ॥५ छायात्मनः सहोत्थानं केचित्सोदुमिवाक्षमाः । खुरैरघट्टयन्वाहाः स तु सौक्षम्यान बाधितः ॥६ केचिनृत्तमिवातेनुमहीरङगे तुरङगमाः। क्रमैश्चङक्रमणारम्भे कृतमड्डुकवादनः ॥ ७ स्थिरप्रकृतिसत्त्वानामश्वानां चलताभवत् । प्रचलत्खुरसंक्षुण्णभुवां गतिषु केवलम् ॥८
--......................------------------
यानंतर कुबेराची दिशा जिंकण्यास अर्थात् उत्तरदिशा जिंकण्यास ( उत्तर दिशेचा स्वामी कुबेर असल्यामुळे तिला कौबेरी नांव आहे ) भरत उद्युक्त झाला व ज्यात घोडे पुष्कळ आहेत अशा आपल्या सैन्यानी सर्व दिशा व्यापून त्याने प्रयाण केले ॥१॥
___ त्यावेळी अश्वहृदय नामक शास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वान् लोकानी धौरित नामक गतीवरून घोड्यांची चाल जाणली. उत्साहाने त्याची बलशक्ति जाणली. त्यांची स्फूर्ति पाहून त्यांना दिलेल्या शिक्षणाचे ज्ञान झाले व शरीराच्या गुणावरून त्यांच्या जातींचा निर्णय त्यांना झाला ॥२॥
गतीच्या चातुर्याला धौरित म्हणतात, त्यांच्या पराक्रमाला उत्साह म्हणतात, विनयाला शिक्षा आणि त्यांच्या केसांच्या कान्तीला शरीराचा गुण म्हणतात ॥ ३ ॥
याप्रमाणे वर्णिलेले ते घोडे जेव्हां रस्त्यावरून धावत सुटले तेव्हां त्यांच्या मागील भागांनी-अवयवांनी जणु पुढल्या भागाना उल्लंघण्याचा यत्न चालविला. अशा रीतीने ते घोडे आपल्या मार्गाला वेगाने उल्लंघू लागले ॥ ४ ॥
आपल्या टापांनी उडालेल्या जमीनीच्या धुराळयाचा आपल्या अंगाला स्पर्श होईल या भीतीने जणु कांही मोठे घोडे रस्ता उल्लंघून वेगाने पुढे जाऊ लागले ॥ ५ ॥
आपल्याबरोबर आपली सावली चालत आहे हे ज्यांना जणु सहन झाले नाही असे कित्येक घोडे त्या आपल्या सावलीला आपल्या टापानी जणु ताडन करीत आहेत असे होऊन पळू लागले पण ती सूक्ष्म असल्यामुळे तिला टापाच्या आघातानी ते बाधु शकले नाहीत ॥ ६॥
प्रयाण करण्याच्या आरंभी नगान्याच्या ध्वनीला अनुसरून अनेक घोडे चालण्याच्या अनेक गतीनी जणु ते या पृथ्वीरूपी रंगभूमीवर नृत्य करीत आहेत असे वाटले ॥ ७ ॥
ज्यांचा स्वभाव आणि बल स्थिर आहे परंतु ज्यांनी चालताना आपल्या खुरांनी जमीन खोदून चूर्ण केली आहे अशा घोड्यांची चंचलता फक्त चालण्यात होती. अन्यकार्यात ती नव्हती ॥ ८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org