Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०-१२६)
महापुराण
(१४१
सिन्धोस्तटवने रम्ये न्यविक्षन्तास्य सैनिकाः । चमूद्विरदसम्भोगनिकुब्जीभूतपादपे ॥ ११९ तत्राधिवासितानोङ्गः पुरश्चरणकर्मवित् । पुरोधा धर्मचक्रेशान्प्रपूज्य विधिवत्ततः ॥ १२० सिद्धशेषाक्षतैः पुण्यैर्गन्धोदकविमिश्रितैः । अभ्यनन्दत्सुयज्वा तं पुण्याशीभिश्च चक्रिणम् ॥१२१ ततोऽसौ धृतदिव्यास्त्रो रथमारुह्य पूर्ववत् । जगाहे लवणाम्भोधि गोष्पदावज्ञया प्रभुः ॥ १२२ प्रभासमजयत्तत्र प्रभासं व्यन्तराधिपम् । प्रभासमूहमर्कस्य स्वभासा तर्जयन्प्रभुः ॥ १२३ जयश्रीशफरीजालंमुक्ताजालं ततोऽमरात् । लेभे सान्तानिकी मालां हेममालां च चक्रभृत् ॥१२४
इति पुण्योदयाज्जिष्णुळजेष्टामरसत्तमान् । तस्मात्पुण्यधनं प्राज्ञाः शश्वदर्जयतोजितम् ॥ १२५ त्वङ्गत्तुङ्गतुरङ्गसाधनखुरक्षुण्णान्महीस्थण्डिलात् । उद्भूतैरथरेणभिर्जलनिधेः कालुष्यमापादयन् ॥
सिन्धुद्वारमुपेत्य तत्र विधिना जित्वा प्रभासामरम् । तस्मात्सारधनान्यवापदतुलश्रीरग्रणीश्चक्रिणाम् ॥ १२६
सैन्यातील हत्तींनी भक्षण केल्यामुळे ज्यातील झाडे खुजी झाली आहेत अशा सिन्धु नदीच्या तटावरील सुंदर वनात या भरतेशाचे सैन्य राहिले ।। ११९ ॥
___ त्या ठिकाणी पूजेचा विधि जाणणारा अशा पुरोहिताने प्रथम चक्ररत्नाची स्थापना करून धर्मचक्राचे स्वामी अशा अहंत परमेष्ठींची विधिपूर्वक पूजा केली व नंतर पवित्र गंधोदकमिश्रित पवित्र सिद्धशेषाक्षता व पुण्यकारक आशीर्वादानी चक्रवर्ती भरताला त्याने आनंदित केले ॥ १२०-१२१ ॥
यानंतर ज्याने दिव्य अस्त्रे आपल्या हातात घेतली आहेत अशा भरतप्रभूने पूर्वीप्रमाणे रथात आरोहण केले व गायीच्या पावलासमान तुच्छ समजून लवणसमुद्रात प्रवेश केला ॥१२२॥
सूर्याच्या किरणसमूहाचा स्वतःच्या कान्तीने तिरस्कार करणाऱ्या भरतचक्रीने उत्कृष्ट कान्ति ज्याची आहे अशा प्रभासनामक व्यन्तराला जिंकले ।। १२३ ॥
यानंतर त्या प्रभासदेवापासून जयलक्ष्मीरूपी मत्सीला पकडण्यासाठी जणु जाळे अशा मोत्यांनी गुंफलेले जाळे व सन्तानक नामक कल्पवृक्षाच्या फुलांची माला व सुवर्णमाला या चक्रवर्तीला मिळाल्या ।। १२४ ।।
____ याप्रमाणे पुण्याच्या उदयामुळे जयशाली भरतेशाने श्रेष्ठ अशा देवांना जिंकले म्हणून हे विद्वज्जनहो तुम्ही उत्तम फल देण्याची शक्ति धारण करणारे पुण्यरूपी धन नेहमी मिळवा ॥ १२५ ॥
वारंवार उड्या मारणाऱ्या उंच घोड्यांच्या सैन्याच्या टापानी चूर्ण झालेल्या जमिनीपासून उडालेल्या धुराळयानी समुद्राला गढूळ करणारा, लक्ष्मीसंपन्न सर्व चक्रीमध्ये पहिला श्रेष्ठ असा भरतराजा सिन्धुद्वाराजवळ आला व त्याने तेथे असलेल्या प्रभासनामक व्यंतरदेवाला योग्य विधीने जिंकले व त्याच्यापासून सारधन उत्कृष्ट धनाची प्राप्ति करून घेतली ॥ १२६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org