Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०-१०९)
( १७९
नृपान्सौराष्ट्रकानुष्टवामीशतभृतोपदान् । सभाजयत्प्रभुर्भेजे रम्या रैवतकस्थलीः ॥ १०१ सुराष्ट्रेषज्जयन्ताद्रिमद्रिराजमिवोच्छ्रितम् । ययौ प्रदक्षिणीकृत्य भावितीर्थमनुस्मरन् १०२ क्षौमांशुक दुकूलैश्च चीनपट्टाम्बरैरपि । पटीभेदैश्च देशेशा ददृशुस्तमुपायनैः ॥ १०३ कांश्चित्संमानदानाभ्यां कांश्चिद्विश्रम्भभाषितैः । प्रसन्नैर्वीक्षितैः कांश्चिद्भूपान्विभुररञ्जयत् ॥१०४ गजप्रवेकंर्जात्यश्व रत्नैरपि पृथग्विधैः । तमानर्चुर्नृपास्तुष्टाः स्वराष्ट्रोपगतं प्रभुम् ॥ १०५ तरस्विभिर्वर्मेघावयः सत्त्वगुणान्वितैः । तुरङ्गमैस्तुरुष्काद्यैर्विभुमाराधयन्परे ॥ १०६ केचित्काम्भोजबाह्लीकतैतिलारट्टसंन्धवैः । वानायुजैः सगान्धारैर्वापीयैरपि वाजिभिः ॥ १०७ कुलोप कुलसम्भूतैर्नानादिग्देशचारिभिः । आजानेयैः समग्राङ्गः प्रभुमैक्षन्त पार्थिवाः ॥ १०८ प्रतिप्रयाणमित्यस्य रत्नलाभो न केवलम् । यशोलाभश्च दुःसाध्यान्बलात्साधयतो नृपान् ॥ १०९
1
महापुराण
शेकडो उंट व घोड्यांची भेट घेऊन आलेल्या सौराष्ट्र देशातील राजांना आनंदित करणाच्या भरतचक्रीने रमणीय रैवतक पर्वताचा आश्रय घेतला ॥ १०१ ॥
सुराष्ट्रदेशामध्ये मेरुपर्वताप्रमाणे उंच असा उज्जयन्त पर्वत आहे तो भावी तीर्थ म्हणून त्याला भरतचीने प्रदक्षिणा घालून पुढे प्रयाण केले ।। १०२ ॥
तागाची वस्त्रे व रेशमी वस्त्रे, चीन देशाची वस्त्रे व आणखी कांही वस्त्रांचे प्रकार यांची भेट कित्येक देशांच्या राजांनी भरतराजाला केली व त्यांचे दर्शन त्यानी घेतले ।। १०३ ॥ कित्येक राजांचा भरताने संमान केला, कांहींना बक्षिसे दिली, कांही राजाबरोबर विश्वासयुक्त भाषण केले, कांही राजाना त्याने प्रसन्न नजरेने पाहिले. याप्रमाणे राजे लोकांना त्याने खुष केले ।। १०४ ॥
भरतप्रभु आपल्या राष्ट्रात राज्यात आला म्हणून आनंदित झालेल्या राजानी श्रेष्ठ हत्ती, जातिवंत घोडे व नाना प्रकारची रत्ने त्याला अर्पण करून त्यांचे पूजन केले - आदर केला ॥ १०५ ॥
इतर कांही राजानी वेगवंत, सुंदर शरीराचे, बुद्धि, वय व बल या गुणानी युक्त असलेले तुरुष्क वगैरे देशात उत्पन्न झालेले अनेक घोडे दिले व त्यांनी प्रभूची आराधना केली, त्याला प्रसन्न केले ॥ १०६ ॥
कित्येक राजांनी काम्भोज, बाह्लीक, तैतिल, आरट्ट, सिन्धुदेश, वनायुजदेश, गंधार व वापी या देशांत उत्पन्न झालेले घोडे प्रभूला देऊन त्याचे दर्शन घेतले. तसेच समान जातीच्या घोडीपासून उत्पन्न झालेले व भिन्न जातीच्या घोडीपासून उत्पन्न झालेले, अनेक दिशा व अनेक देशात संचार करणारे सर्वांगांनी युक्त असे पुष्कळ घोडे नजर करून भरतराजाचे दर्शन घेतले ।। १०७ - १०८ ॥
याप्रमाणे प्रत्येक मुक्कामाचे ठिकाणी भरतराजाला उत्कृष्ट पदार्थांचा रत्नादिकांचाच लाभ झाला असे नसून मोठमोठ्या दुःसाध्य बलिष्ठ राजांना स्वपराक्रमाने त्याने जिंकले असल्यामुळे त्याला खूप यशो - लाभही झाला ॥ १०९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org