Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१७८)
महापुराण
(३०-९३
उपानिन्यः करीन्द्राणां दन्तानस्मै समौक्तिकान् । किरातवर्या वर्या हि स्वोचिता सतक्रिया प्रभोः॥
पश्चिमान्तेन विन्ध्याद्रिमुल्लाध्योत्तीर्य नर्मदाम् । विजेतुमपरामाशां प्रतस्थे चक्रिणो बलम् ॥९४ गत्वा किञ्चिदुदग्भूय प्रतीची दिशमानशे। प्राक्प्रतापोऽस्य दुर्वारः सचक्रं परमं बलम् ॥ ९५ तदाप्रचलदश्वीयखुरोद्भूतमहीरजः । न केवलं द्विषां तेजो रुरोध धुमणेरपि ॥ ९६ लाटा ललाटसन्दष्टभूपृष्ठाः स्वादुभाषिणः । लालाटिकपदं भेजः प्रभोराज्ञावशीकृताः ॥ ९७ केचित्सौराष्ट्रिकगिः परे पाञ्चनदैर्गजैः । तं तद्वनाधिपा वीक्षाञ्चक्रिरे चक्रचालिताः ॥ ९८ चक्रसन्दर्शनादेव त्रस्ता निमंण्डलग्रहाः । ग्रहा इव नृपाः केचिच्चक्रिणो वशमाययुः ॥ ९९ दिश्यानिव द्विपान्धमापान् पृथुवंशान्मदोरान्।प्रचक्रे प्रगुणांश्चक्री बलादाक्रम्य दिक्पतीन्॥१००
त्याठिकाणी कित्येक श्रेष्ठ भिल्ल राजे होते त्यांनी हत्तींच्या मस्तकांत उत्पन्न झालेले मोत्यांचे समूह आणि त्या हत्तींचे दात भरतराजाला भेट म्हणून अर्पण केले. कारण प्रभूचा अर्थात् थोर मनुष्याचा सत्कार आपणास जसा अनुकूल होईल तसा करणे योग्य आहे ।। ९३ ।।
पश्चिम दिशेच्या बाजने विध्याद्रि व नर्मदानदीला ओलांडन व उतरून चक्रवर्तीच्या सैन्याने दुसरी दिशा ( वायव्य ) अवलंबिली अर्थात् तिकडे प्रयाण केले ।। ९४ ॥
तें भरतराजाचे सैन्य कांहीं अन्तर उत्तरेकडे गेले व पुनः तें पश्चिमेकडेच प्रयाण करू लागले. या भरतप्रभूचा दुर्वार प्रताप पुढे प्रयाण करीत असे व नंतर चक्ररत्नासह सैन्य तेथें पोहोचत असे ॥ ९५ ।।
त्यावेळी मोठया वेगाने घावणा-या घोड्यांच्या टापानी उडालेल्या पृथ्वीवरच्या धळीनी फक्त शत्रचे तेजालाच अडविले, आच्छादिले असे नाही तर त्यानी सूर्याच्या तेजालाही झाकून टाकले ॥ ९६ ॥
भरतप्रभूच्या आज्ञेला लाट देशाचे राजे वश झाले. मधुर भाषण करून आपल्या कपाळानी भूमीला स्पर्श करून त्यानी भरतप्रभूला नमस्कार केला त्यामुळे ते ‘लालाटिक' या नांवाला प्राप्त झाले. तेव्हापासून जनता त्यांना 'लालाटिक'' म्हणू लागली ।। ९७ ।।
___ त्या लाटदेशातील वनांचे जे राजे होते त्यांचा भरतराजाच्या चक्राने पराभव केला तेव्हां कांहीनी सौराष्ट्रदेशाचे हत्ती प्रभूला अर्पण करून त्याचे दर्शन घेतले व कांहीनी पंचनद देशातील हत्तींचा नजराणा प्रभूला अपिला व त्याचे दर्शन घेतले ॥ ९८॥
भरतप्रभूचे चक्ररत्न पाहिल्याबरोबर भ्यालेल्या काही राजांनी आपल्या देशाचा त्याग केला व काही राजे सूर्यादिग्रहाप्रमाणे चक्रवर्तीला वश झाले ॥ ९९ ॥
___भरतचक्रवर्तीने दिग्गजाप्रमाणे पृथुवंश-उत्कृष्ट वंशामध्ये उत्पन्न झालेले, दुसरा अर्थ पाठीवरचा विस्तृत जो कणा त्याने सहित असलेलेव मदोद्धर-अभिमानाने भरलेले उत्कट अभिमानी. दसरा अर्थ मदजलाने मत्त झालेले अशा इत्तीसमान असलेल्या आक्रमण केले व दिग्गजाप्रमाणे असलेल्या त्यांना वश केले ॥ १०० ॥
१. 'ललाटं पश्यति इति लालाटिकः' मालक कोणती आज्ञा करतो त्या अभिप्रायाने जो मालकाच्या कपाळाकडे नेहमी दृष्टि फेकतो त्या नोकराला लालाटिक म्हणतात. अर्थात् लाटदेशाचे राजे चक्रवर्तीचे आज्ञाधारक बनले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org