Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१७६)
महापुराण
(३०-७९
स तमालोकयन्दूरादाससाद महागिरिम् । आह्वयन्तमिवासक्तं मरुद्भूतैस्तटमः ॥ ७९ स तद्वनगतान्दूरादपश्यद्धनकळुरान् । सयथानुद्धनुर्वशान्किरातान्करिन्णोऽपि च ॥८० सरिद्वधस्तदुत्सङ्ग विवत्तशफरीक्षणाः। तद्वल्लभा इवापश्यत्स्फुरद्विरुतमन्मनाः ॥८१ मध्येविन्ध्यमथैक्षिष्ट नर्मदां सरिदुत्तमाम् । प्रततामिव तत्कीतिमासमुद्रमपारिताम् ।। ८२ तरडागितपयोवेगां भवो वेणीमिवायताम। पताकामिव विन्ध्याद्रः शेषाद्रिजयशंसिनीम ॥८३ सा धुनी बलसङक्षोभादुड्डोनविहगावलिः । विभोरुपागमे बद्धतोरणेव क्षणं व्यभात् ॥ ८४ नर्मदा सत्यमेवासीन्नर्मदा नृपयोषिताम् । यदपी हयुत्तरन्तीस्ताः शफरीभिरघट्टयत् ॥ ८५
वान्याने हालविलेल्या तटावरील वृक्षांनी हा पर्वत जणु आपणास बोलावित आहे असे जाणून आपणाविषयी जणु आसक्त अशा त्या महापर्वताला दुरून पाहत तो भरतप्रभु त्याच्याजवळ आला ।। ७९ ॥
त्या भरतराजाने विध्यपर्वताच्या अरण्यांत संचार करणारे मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे धनुष्य व वेळूच्या काठ्या उंच धारण करणा-या भिल्लांच्या टोळीला दुरून पाहिले व मेघाप्रमाणे काळे, धनुष्याप्रमाणे उंच अशा पाठीनी युक्त असलेल्या हत्तींच्या कळपांनाही दुरून पाहिले ।। ८० ॥
___त्या पर्वताच्या टेकडीवर चंचलमासे हेच ज्यांचे डोळे आहेत व किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचे शब्द हेच ज्यांचे मनोहर शब्द आहेत अशा विंध्यपर्वताच्या प्रियस्त्रियाप्रमाणे असलेल्या नदीरूपी स्त्रियांना अतिशय उत्कण्ठेने भरतराजाने पाहिले ॥ ८१ ।।
यानंतर विन्ध्यपर्वताच्या मध्यभागी समुद्रापर्यन्त जी पसरली आहे व जी या पर्वताची न रोकली जाणारी जणु कीर्ति आहे अशा नद्यांत श्रेष्ठ असलेल्या नर्मदा नदीला भरत राजाने पाहिले ॥ ८२ ॥
तरङ्गयुक्त पाण्याच्या वेगाला धारण करणारी ती नर्मदा जणु पृथ्वीदेवीच्या लांब वेणीप्रमाणे दिसत होती. तसेच बाकीच्या पर्वतांना या विन्ध्यपर्वताने जिंकले आहे असे जणु सांगणारी ही जयपताका आहे अशी भासत होती ॥ ८३ ॥
सैन्याच्या गलबल्याने नर्मदानदीच्या तीरावरील पक्षी उडाले तेव्हां भरतराजाच्या आगमनसमयी तिने जणु तोरणाची रचना केली की काय अशी क्षणभर ती जनाना दिसली ।। ८४ ॥
ती नर्मदा नदी खरोखर राजस्त्रियांना नर्मदा-खेळवणारी व त्यांची थट्टा करणारी झाल्यामुळे तिचे नर्मदा हे नांव अन्वर्थक झाले. कारण जेव्हां राजस्त्रिया नर्मदेच्या पाण्यातून तरून जाऊ लागल्या तेव्हा तिने माशांच्याद्वारे त्यांच्या मांड्याजवळ घर्षण केले. गुदगुल्या केल्या ॥ ८५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org