________________
१७४)
महापुराण
(३०-६६
भाति यः शिखरस्तुर्दूरव्यायतनिझरः । सपताकैविमानौविश्रमायेव संश्रितः ॥ ६६ यः पूर्वापरकोटिभ्यां विगाह्याम्बुनिधि स्थितः । नूनं दावभयात्सख्यममुना प्रचिकीर्षति ॥ ६७ नयन्ति निझरा यस्य शश्वत्पुष्टि तटदुमान् । स्वपादाश्रयिणः पोष्याः प्रभुणेवेति शंसितुम् ॥ ६८ तटस्थपुटपाषाणस्खलितोच्चलिताम्भसः नदीवधूः कृतध्वानं निर्झरहसतीव यः ॥ ६९ वनाभोगसपर्यन्तं यस्य दग्घुमिवाक्षमः । भृगुपाताय दावाग्निः शिखराण्यधिदोहति ॥ ७० ज्वलद्दावपरीतानि यत्कूटानि वनेचरैः । चामोकरममानीव लक्ष्यन्ते शुचिसन्निधो ॥ ७१ समातङ्गं वनं यस्य सभुजङ्गपरिग्रहम् । विजातिकण्टकाकीर्ण क्वचिद्धत्तेऽतिकष्टताम् ॥ ७२
पर्वत अतिशय लांबीला धारण करीत आहे. आपण जसे परैः अलंध्यम्- शत्रूनी न जिंकले जाणारे आहोत तसे हा पर्वतही इतराकडून उल्लंघन न करण्यास योग्य आहे. अशारीतीने भरताने आपल्याप्रमाणे त्या पर्वताला पाहिले ।। ६५ ।।
जो पर्वत दूर व लांब झरे ज्यांच्यावर आहेत अशा उंचशिखरांनी युक्त असल्यामुळे जणु पताकांनी सहित अशा विमानांनी विश्रांतिकरिता आश्रय घेतल्याप्रमाणे शोभत आहे ॥६६।।
जो पर्वत पूर्व आणि पश्चिमेकडील आपल्या दोन टोकांनी समुद्रात प्रवेश करून राहिला आहे. जणु वणव्याच्या भयाने समुद्राबरोबर सख्य-मैत्री करण्याची इच्छा करीत आहे असा भासतो ॥ ६७ ।।।
ज्याचे झरे-पाण्याचे प्रवाह आपल्या पायांचा आश्रय घेतलेल्याचे मालकाने अवश्य रक्षण केले पाहिजे असे जनांना जणु कळविण्याकरिता तटावर असलेल्या वृक्षांना कायमचे पुष्ट करीत आहैत ।। ६८ ॥
ज्याचे पाणी तटावर असलेल्या उंच सखल पाषाणावर आपटून उडत आहे अशा आपल्या नद्यारूपी स्त्रियांना जो पर्वत झऱ्याच्या मिषाने मोठ्याने खदखदा हसत आहे असा भासतो ॥ ६९ ॥
या विन्ध्यपर्वताच्या विस्तृत अरण्यप्रदेशाला मी जाळण्यास असमर्थ आहे असे जणु वणव्याच्या अग्नीला वाटले म्हणून तो शिखरावरून पडून आत्महत्या करावी अशा विचाराने या पर्वताच्या शिखरावर चढत आहे ॥ ७० ॥
आषाढमास जवळ आला असता या पर्वताची शिखरे जेव्हां पेटलेल्या उज्वल अग्नीने व्याप्त होतात तेव्हां भिल्ल लोकांना ती जणु सुवर्ण निर्मित आहेत असे वाटते ॥ ७१ ॥
___ या पर्वतावरील वन कोठे कोठे समातङ्ग-हत्तींनी युक्त होते अथवा मांग जातीच्या लोकाचे निवासस्थान होते व कोठे कोठे सभुजङ्गपरिग्रहम्-सांच्या परिवारांनी युक्त होते किंवा भुजंग-विट-नीच लोकांच्या निवासाने युक्त होते व कोठे कोठे विजाति नाना पक्ष्याच्या जातींनी युक्त होते अथवा नीच लोकांनी युक्त होते, अनेक कण्टकांकीर्ण-नाना प्रकारच्या काटयांनी भरले होते व अनेक उपद्रव देणाऱ्या लोकांनी युक्त होते. यामुळे या पर्वतावरील वन अतिकष्टदायक होते ॥ ७२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org