Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१७२)
महापुराण
(३०-४९
आपश्चिमार्णवतटादा च मध्यमपर्वतात् । आतुङगवरकादद्रेस्तुङ्गगण्डोपलाङकितात् ॥ ४९ तं कृष्णगिरिमुल्लजच्य तं च शैलं सुमन्दरम् । मुकुन्दं चाद्रिमुढुप्ता जयभास्तस्य बभ्रमः ॥५० तत्रापरान्नकानागान् हस्वनीवात्परारदः। युक्तान्पीनायितस्निग्धेः श्यामान्स्वक्षान्मृदुत्वचः॥५१ महोत्सङ्गानुदग्राङ्गान् रक्तजिह्वोष्ठतालुकान् । मानिनो दीर्घबालोष्ठान्पद्मगन्धमदच्युतः॥ ५२ सन्तुष्टान्स्वे वने शूरान्दृढपादान्सुवर्मणः । स भेजे तलाधीशः ससम्भ्रममुपाहतान् ॥ ५३ वनरोमावलीस्तुङ्गतटारोहा बहूनदीः । पूर्वापराब्धिगाः सोऽत्यत् सह्याद्रेर्दू हितरिव ॥५४ सञ्चरभीषणग्राहां भीमा भैमरथी नदीम् । नचऋकृतावर्तेरवेणां च दारुणाम् ॥ ५५ नीरां तोरस्थवानीरशाखाग्रस्थगिताम्भसम् । मूलां कूलङ्कङ्गरोधरुन्मूलिततटद्रुमाम् ॥ ५६
चक्रवर्तीभरताचे मदोन्मत्त विजयी हत्ती, पश्चिम समुद्राच्या तीरापासून मध्यम पर्वतापर्यन्त व तेथून मोठमोठया पाषाणांनी व्याप्त झालेल्या तुंगवरक नामक पर्वतापर्यन्त, कृष्णगिरि नावाचा पर्वत, सुमंदर नामक पर्वत आणि मुकुन्द नामक पर्वत हे सर्व ओलांडून फिरते झाले ॥ ४९-५० ॥
पश्चिम समुद्राजवळच्या प्रदेशांत उत्पन्न झालेले, ज्यांचे कंठ आखूड आहेत व जे दिसण्यांत सुंदर आहेत, जे जाड, लांब व तुळतुळित दांतांनी युक्त आहेत, जे लठ्ठ, स्निग्ध व श्यामवर्णाचे आहेत, ज्यांचे डोळे सुंदर व ज्यांची त्वचा मृदु आहे, ज्यांची पाठ फार रुंद आहे. व जे उंच आहेत, ज्यांच्या जिभा, ओठ व टाळू हे लालभडक आहेत, जे मानी आहेत, ज्यांचे ओठ व शेपूट लांब आहेत व कमलाच्या वासाप्रमाणे सुगन्धित मद ज्याच्यापासून वाहत आहे, जे सर्वदा सन्तुष्ट असतात, आपल्या अरण्यांत दुसऱ्याला न येऊ देणारे, जे शूर आहेत, ज्यांचे पाय मजबूत आहेत व जे शरीराने पुष्ट आहेत, अशा हत्तींना त्या त्या राजांच्या सेनापतीनी आणले होते व त्यांनी मोठया आदराने ते हत्ती भरतराजाला अर्पण केले व त्याने त्यांचा स्वीकार केला ॥ ५१-५३ ।।
अरण्यांतील वृक्ष हेच ज्यांचे केश आहेत व उंच तट हेच ज्यांचे नितम्ब-ढुंगण आहेत व ज्या पूर्वपश्चिम समुद्राला मिळाल्या आहेत व ज्या सह्याद्रीच्या जणु कन्या आहेत अशा पुष्कळ नद्या उल्लंघून भरतचक्रीने पुढे प्रयाण केले ॥ ५४ ।।
जिच्यांत भय उत्पन्न करणा-या सुसरी फिरत आहेत व त्यामुळे जी भयंकर दिसते अशी भैमरथीनामक नदी, मगरीच्या समूहांनी जिच्यांत भोवरे उत्पन्न झाले आहेत त्यामुळे जी भयंकर वाटते अशी दारुवेणा नामक नदी ॥ ५५ ॥
जिच्या तीरावर वेतांचे वन पसरल्यामुळे त्यांच्या शाखांनी जिचे पाणी वाहणे स्थगित झाले आहे- बंद झाले आहे अशी नीरा नावाची नदी, तीराला घासून जाणा-या प्रवाहांनी जिने तटावरील झाडे उपडून टाकली आहेत अशी मूला नांवाची नदी ।। ५६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org