Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३०-३१
सलीलमृदुभिर्यानिनितम्ब भरमन्थरः । स्मितैरनङ्गपुष्पास्त्रस्तबकोद्भेदविभ्रमैः ॥ ३१ कोकिलालापम घुरैर्जल्पितैरनतिस्फुटैः । मृदुबाहुलतान्दोलसुभगश्च विचेष्टितैः ॥ ३२ लास्यैः स्खलत्पदन्यासैर्मुक्ताप्रार्थीविभूषणैः । मन्दमञ्जुभिरुद्गीतेजितालिकुलसिञ्जने ॥ ३३ तमालवनवीथीषु सञ्चरन्त्यो यदृच्छथा । मनोऽस्य जन्हरारूढयौवनाः केरलस्त्रियः ॥ ३४ प्रसाध्य दक्षिणामाशां विभुस्त्रैराज्यपार्थिवान् । समं प्रणमयामास विजित्य जयसाधनः ॥ ३५ कालिङ्गकैर्गजैरस्य मलयोपान्तभूधराः । तुलयद्भिरिवोन्मानमाक्रान्ताः स्वेन वर्मणा ॥ ३६ दिशां प्रान्तेषु विश्रान्तैदिग्जयेऽस्य चमूगजैः । विग्गजत्वं स्वसाच्चक्रे शोभायैतत्कथान्तरम् ॥३७ ततोऽपरान्तमारुह्य सह्याचलतटोपगः । पश्चिमार्णववेलान्तपालकानजयत्प्रभुः ॥ ३८ जयसाधनमस्याब्धेरारात्तीरे विजृम्भितम् । महासाधनमित्युच्चैः परंपारमवाष्टभत् ॥ ३९ उप सिन्धुरिति व्यक्तमुभयोस्तीरयोर्बलम् । दृष्ट्वास्य साध्वसात्क्षुभ्यन्निवाभूदाकुलाकुलः ॥ ४० शरांच्या विलासाना उत्पन्न करीत आहे, ज्यांचे भाषण कोकिलांच्या स्वराप्रमाणे मधुर व थोडेसे अस्पष्ट आहे, ज्यांच्या कोमल बाहुलतांच्या हालचाली मोठ्या सुन्दर वाटतात, पावले टाकतांना अडखळण्याचा भास ज्यामध्ये होत आहे असे नृत्य करणाऱ्या, ज्यांनी प्रायः मोत्यांचे अलंकार धारण केले आहेत व भ्रमरांच्या मधुर गुंजारवांना जिंकणा-या पैंजणांचे शब्द ज्या चालत असतांना होत आहेत, ज्या तमालवनाच्या मार्गात लीलेने संचार करीत आहेत, अशा केरलदेशांतील तारुण्याने मुसमुसलेल्या स्त्रियांनी यां भरतराजाचे अन्तःकरणाला आपल्याकडे आकर्षून घेतले || ३०-३४ ॥
१७० )
महापुराण
या प्रमाणे भरतचक्रीने दक्षिणदिशा हस्तगत करून चोल, केरळ आणि पाण्ड्य या तीन देशांच्या राजांना आपल्याला जय मिळवून देणाऱ्या सैन्याच्याद्वारे एकदम जिंकले व आपल्यापुढे त्यांना नमस्कार करावयास लाविले ।। ३५ ।।
जे आपल्या शरीराच्या उंचीने जणु मलयपर्वताच्या उंचीची तुलना करीत आहेत अशा कलिंगदेशाच्या आपल्या हत्तीनी या भरतचक्रीने मलयपर्वताच्याजवळ असलेल्या पर्वतांना व्याप्त केले ॥ ३६ ॥
दिग्विजयाच्या निमित्ताने दिशांच्या शेवटी जाऊन विश्रान्ति घेतलेल्या या भरतेशाच्या सैन्यांतील हत्तीनी दिग्गजपणाही आपल्याकडेच घेतला यास्तव दिशांचे अंजनादिक दिग्गज आहेत असे जे वर्णिले जाते तें शोभेकरिताच आहे असे समजावे ।। ३७ ।।
यानंतर पश्चिमेच्या बाजूकडे वळून भरतचक्री सैन्यासह सह्यपर्वताच्या तटाजवळ गेला आणि पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याच्या सर्व राजांना त्याने जिंकले ॥ ३८ ॥
भरताची ती विजयी सेना समुद्राच्या अलिकडल्या किनाऱ्यावर सर्व ठिकाणी पसरली होती व ती इतकी मोठी होती की, तिने समुद्राचा दुसरा किनारा देखिल व्याप्त केला होता ।। ३९ ।।
आपल्या दोन्ही किनान्यावर भरतचक्रीचे सैन्य पसरलेले पाहून तो उपसमुद्र जणु भीतीने अतिशय व्याकुळ झाला || ४० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org