Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( १६९
वनस्पतीन्फलानत्रान्वीक्ष्य लोकोपकारिणः । जाताः कल्पद्रुमास्तित्वे निरारेकास्तदा जनाः ॥२३ लतायुवति संसक्ताः प्रसवाढ्या वनद्रुमाः । करदा इव तस्यासन्प्रीणयन्तः फलैर्जनान् ॥ २४ नालिकेरासर्वमंत्ताः किञ्चिदाघूर्णितेक्षणाः । यशोऽस्य जगुरामन्द्रकुहरं सिंहलाङ्गनाः ॥ २५ त्रिकूटे मलयोत्सङ्गे गिरौ पाण्डयकवाटके । जगरस्य यशो मन्द्रमूर्च्छनाः किन्नराङ्गनाः ॥ २६ मलयोपान्तकान्तारे सह्याचलवनेषु च । यशो वनचरस्त्रीभिरुज्जगेऽस्य जयाजितम् ॥ २७ चन्दनोद्यानमाधूय मन्दं गन्धवहो ववौ । मलयाचलकुञ्जेभ्यो हरनिर्झरशीकरान् ॥ २८ विष्वग्विसारी दाक्षिण्यं समुज्झन्नपि सोऽनिलः । सम्भावयन्निवातिथ्यैवभोः श्रममपाहरत् ॥ २९ एलालवंग संवास सुरभिश्वसितैर्मुखैः । स्तनैरापाण्डुभिः सान्द्रचन्दनद्रवचचितैः ॥ ३०
३०-३०)
महापुराण
फळांनी थोडेसे वाकलेले व जगावर उपकार करणान्या अशा मोठमोठ्या वृक्षांना पाहून त्यावेळी पूर्वी या जगात कल्पवृक्ष होते यांच्या अस्तित्वाबद्दल लोक संशयरहित झाले ।। २३ ।।
त्य वनांतील वृक्ष वेलीरूपी स्त्रियांनी युक्त होते. फुलांनी लकडलेले होते व सैन्यांतील लोकांना फलांनी संतुष्ट करणारे व जणु भरतराजाला करभार देत आहेत असे दिसले || २४ ॥ नारळाच्या आसवाने मादक पेयाने मत्त झालेल्या, ज्यांचे नेत्र थोडेसे फिरत आहेत अशा सिंहलद्वीपांतील स्त्रिया या भरतराजाची कीर्ति गद्गदकापऱ्या स्वरांनी गाऊ लागल्या ।। २५ ।।
त्रिकूट पर्वतावर, मलयपर्वताच्या शिखरावर आणि पाण्डयकवाटक नांवाच्या पर्वतावर किन्नर देवता या भरतराजाच्या यशाचे गायन गंभीर ताना घेऊन करू लागल्या ॥ २६ ॥ मलयपर्वताच्याजवळ असलेल्या जंगलांत व सह्याद्रीच्या अनेक वनांत राहणाया भिल्लांच्या स्त्रियांनी या भरतराजाचे अनेक राजांना जिंकून मिळविलेल्या यशाचे गायन केले ।। २७ ।।
मलयपर्वताच्या लतागृहांतील झन्याच्या जलबिन्दूना हरण करणारा वायु चंदन वनास हलवून मंदरीतीने वाहू लागला ॥ २८ ॥
चोहोकडे वाहणारा असा वायु आपले दाक्षिण्य ( सरळपणा, दुसरा अर्थ दक्षिण दिशेकडून वाहणे हा स्वभाव ) सोडून देखिल पाहुणचाराला योग्य अशा सत्कारानी जणु आदर करीत आहे असा होऊन या भरतराजाचे श्रम दूर करू लागला ।। २९ ॥
वेलदोडे, लवंग यांच्या संस्काराने सुगंधित श्वासांनी ज्यांचे मुख शोभत आहे, दाट चन्दनाची उटी लावल्यामुळे ज्यांचे स्तन थोडेसे शुभ्र दिसत आहेत, नितम्बाच्या ओझ्याने ज्यांची चालण्याची पद्धति लीलायुक्त व कोमल भासत आहे, ज्यांचे हास्य मदनाच्या पुष्प
म. २२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org