________________
३०-१३)
महापुराण
(१६७
फलेन योजितास्तीक्ष्णाः सपक्षा दूरगामिनः । नाराचैः सममेतस्य योधा जग्मुर्जयाङ्गताम् ॥ ८ दूरमूत्सारिताः सैन्यैः परित्यक्तपरिच्छदाः । विपक्षाः सत्यमेवास्य विपक्षत्वमुपाययुः ॥९ आक्रान्ता भूभृतो नित्यं भुजानाः फलसम्पदम् । कुपतित्वं ययुश्चित्रं कोपेऽप्यस्य विरोधिनः॥१० सन्धिविग्रहचिन्तास्य पदविद्यास्वभूत्परम् । धूतयातव्यपक्षस्य क्व सन्धानं क्व विग्रहः ॥ ११ इत्यजेतव्यपक्षोऽपि यदयं दिग्जयोद्यतः । तन्नूनं भुक्तिमात्मीयां तद्व्याजेन परीयिवान् ॥ १२ आक्रान्ताः सैनिकरस्य विभोः पारेऽर्णवं भुवः । पूगद्रुमकृतच्छाया नालिकेरवनस्तताः ॥ १३
भरतराजाचे वीर पुरुष युद्धात पराक्रम गाजविल्यामुळे फलाने योजित केले. उत्तम बक्षिस देऊन गौरविले गेले. ते तीक्ष्ण-पराक्रमी होते व सपक्ष-पुष्कळ सहाय्य देणारे होते व अनेक दूर देशात लढण्यासाठी जाणारे होते. म्हणून ते बाणाप्रमाणे या भरतराजाच्या जयाला कारण झाले. तसेच बाण देखिल फलाने अग्रभागाने युक्त केले होते, तीक्ष्ण होते. त्यांना शेवटी पक्ष-पंख जोडलेले होते आणि ते खूप दूरजाऊन शत्रूवर पडत असत म्हणून भरतराजाला जय मिळविण्यास ते बाण कारण झालेले होते ।। ८ ॥
या भरतराजाचे विपक्ष-शत्रू खरोखर विपक्ष झाले-सहायरहित झाले. कारण त्यांना भरतराजाच्या सैन्याने दूर पळविले होते व ते शत्रुसैन्य छत्र चामरादि सामग्रीनीरहित झाले होते ॥ ९॥
हा भरतराजा शत्रूवर रागावला असताही त्याचे शत्रू कुपतित्वं ययुः पृथ्वीच्या पतित्वाला-स्वामित्वाला प्राप्त झाले हे आश्चर्यकारक वाटते. कारण ते भरतराजाच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले असताही नेहमी अनेक प्रकारच्या फलसंपदाचा उपभोग घेत होते. तात्पर्य-या श्लोकात विरोधाभास अलंकार आहे. विरोध परिहार असा-भरतराजाने कोपाने आक्रमण केल्यावर त्यांना कुपतित्व आले अर्थात् थोडासा राजेपणा त्यांच्या ठिकाणी राहिला. भरतचक्रीने त्यांना पूर्णपणे राज्यभ्रष्ट केले नाही. किंवा ते शरण आले पण मनात त्यांच्या दुष्ट राजेपणा राहिला ॥ १०॥
सर्व शत्रूना हाकून लाविले असल्यामुळे या भरतराजाला संधि व विग्रह करणे यांचा विचार व्याकरण शास्त्रात करावा लागत होता. संधि म्हणजे तह करणे व विग्रह म्हणजे युद्ध करणे या दोन गोष्टी शत्रूना हाकून दिल्यामुळे याला करण्याची आवश्यकताच राहिली नाही म्हणून संधि-दोन स्वर किंवा दोन व्यंजने एकत्र करणे हा संधि व विग्रह करणे म्हणजे जुळलेली पदे, स्वर व व्यंजने वेगळे करणे एवढेच कार्य याचे उरले होते ॥ ११ ॥
जिंकण्यास योग्य असा शत्रु कोणीही नव्हता तरीही हा भरत दिग्विजय करण्याकरिता निघाला याचे कारण असे आहे. या दिग्विजयाच्या मिषाने तो आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर फेरफटका करून आला असे मानणेच योग्य होय ॥ १२ ॥
ज्याच्यावर सुपारीच्या झाडांच्या सावल्या सतत पडतात व नारळाच्या झाडांनी जे गजबजलेले आहेत असे समुद्राच्या कितान्याचे प्रदेश या भरताच्या सैनिकानी व्यापलेले होते॥१३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org