Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-१६९)
महापुराण
(१६५
स्वच्छं स्वं हृदयं स्फुटं प्रकटयन्मुक्ताफलच्छद्मना। स्वं चान्तर्गतरागमाशु कथयन्नुद्यत्प्रवालाङकुरैः। सर्वस्वं च समर्पयन्नुपनयनन्तर्धनं दक्षिणो वारां राशिरमात्यवद्विभुमसौ निर्व्याजमाराधयत् ॥१६८ आस्थाने जयदुन्दुभीमननदन्प्राभातिके मङगले । गम्भीरध्वनितर्जयध्वनिमिव प्रस्पष्टमुच्चारयन् ॥
सुव्यक्तं स जलाशयोऽप्यजलधीर्वारम्पतिः श्रीपतिम् । निर्भत्यस्थितिरन्वियाय सचिरं चक्री यथाद्यं जिनम ॥ १६९
इत्या भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे दक्षिणार्णवद्वार
विजयवर्णनं नामकोनत्रिशं पर्व ॥ २९ ॥
करदोडा हे पदार्थ मिळविले. यानंतर उत्तम रत्नानी ज्याचा आदर केला आहे असा तो ऐश्वर्यवान् चक्रवर्ती भरत श्रीवैजयन्त नामक समुद्राच्या द्वाराने निघून ज्यांत उंच तोरण लावले आहे अशा आपल्या छावणीत आला ॥ १६७ ।।
___ मोत्यांच्या मिषाने आपल्या स्वच्छ अन्तःकरणाला स्पष्टरीतीने दाखविणारा व पोवळयांच्या वेलींच्या अंकुरानी आपल्या हृदयातले प्रेम शीघ्न जणु सांगणारा व आपले रत्नादि सर्वधन अर्पण करणारा व सरळवृत्तीचा जणु अमात्य की काय अशा या दक्षिणसमुद्राने निष्कपटपणाने प्रभु भरतराजाची सेवा केली ।। १६८ ।।
___ अर्थ- जसे इन्द्र दास होऊन अनन्त चतुष्टयरूप लक्ष्मीचे पति अशा आदिजिनेश्वराची सेवा करीत होता तसे हा समुद्र देखिल दास होऊन राज्यलक्ष्मीचे पति अशा भरतचक्रीची सेवा करीत होता. जसे इन्द्र समवसरणसभेत जाऊन विजयदुन्दुभि वाजवीत होता तसे हा समुद्र देखिल भरताच्या सभामण्डपाच्याजवळ आपल्या गर्जनेने विजयदुन्दुभि वाजवीत होता. जसे इन्द्र प्रातःकाली म्हटला जाणान्या मंगलपाठासाठी जय जय शब्दाचे उच्चारण करीत होता तसे तो समुद्र देखिल प्रातःकाली म्हटले जाणा-या भरताच्या मंगलपाठास्तव आपल्या गंभीर शब्दांनी जय जय शब्दाचा स्पष्ट उच्चार करीत होता. जसे इन्द्र जलाशय-जडाशय अर्थात् केवलज्ञानाच्या अपेक्षेने अल्पज्ञानी होऊन देखिल आपल्या ज्ञानाच्या अपेक्षेने अजलधी-अजडधी अर्थात् विद्वान (अजडा धीर्यस्य सः) अथवा अजड-ज्ञानपूर्ण परमात्मा त्याचे ज्ञान करणारा ( अजडं ध्याय तीति अजडधीः) होता. तसे तो समुद्र देखिल जलाशय-जलयुक्त होऊन देखिल अजलीं-जलप्राप्त करण्याच्या इच्छेने ( नास्ति जले धीर्यस्य सः ) रहित होता. याप्रमाणे तो समुद्र दीर्घकालपर्यन्त भरतेश्वराची सेवा करीत राहिला.
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत आर्ष त्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराणसंग्रहातील दक्षिणसमुद्रद्वार जिंकल्याचे वर्णन करणारे हे एकोणतिसावें पर्व समाप्त झाले ॥ २९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org