Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१६४)
महापुराण
(२९-१६३ मालिनी-अवनिपतिसमाजेनानुयातस्तुरङगैरकृशविभवयोगाग्निर्जयन्लोकपालान् । प्रतिदिशमुपशृण्वन्नाशिषश्चक्रपाणिः शिबिरमविशदुच्चैर्बन्दिना पुण्यघोषः ॥ १६३ अथ सरसिजिनीनां गन्धमादाय सान्द्रं धुततटवनवीथिमन्दमावासमन्तात् । श्रममखिलमनौत्सीत्कर्तुमस्योपचारम् प्रहित इव सगन्धः सिन्धुना गन्धवाहः ॥ १६४ अविदितपरिमाणैरन्वितो रत्नशङखैः स्फुरितमणिशिखाग्रे गिभिः सेवनीयः। सततमुपचितात्मा रुद्धदिक्चक्रवालो जलनिधिमनुजह तस्य सेनानिवेशः ॥ १६५ तत्रावासितसाधनो निधिपतिर्गत्वा रथेनाम्बुधिम् । जैत्रास्त्रप्रतिनिजितामरसभस्तं व्यन्तराधीश्वरम् ॥ जित्वा मागधवत्क्षणाद्वरतनुं तत्साह्वमम्भोनिधि- ।
द्वीपं शश्वदलञ्चकार यशसा कल्पान्तरस्थायिना ॥ १६६ लेभेऽभेद्यमुरश्च्छंदं वरतनोग्रैंवेयकं च स्फुरत्चूडारत्नमुदंशु दिव्यकटकान्सूत्रं च रत्नोज्ज्वलम् । सद्रत्नैरिति पूजितः स भगवान् श्रीवैजन्तार्णवद्वारेण प्रतिसन्निवृत्य कटकं प्राविक्षदुत्तोरणम् ॥१६७
घोड्यावर बसून अनेक राजे ज्याच्या मागून येत आहेत, ज्याने आपल्या विशाल वैभवाने लोकपालांना जिंकले आहे, प्रत्येक दिशात लोकांचे आशीर्वाद ऐकणारा, चक्ररत्न ज्याच्या हातात आहे असा, भाट लोकांच्या उच्च जयजय अशा पुण्यघोषांचे श्रवण करणारा अशा त्या भरतचक्रवर्तीने आपल्या शिबिरात प्रवेश केला ।। १६३ ।।
यानन्तर किना-याच्या वनपंक्तीला जो हालवीत आहे व कमलिनींचा उत्कट गंध घेऊन हळुहळु चोहोकडे जो वाहत होता व समुद्राने पाठविलेला जणु खास कोणी सम्बन्धीजन आहे असा वायु चक्रवर्तीच्या सर्व श्रमांना दूर करीत होता ।। १६४ ।।।
त्यावेळी चक्रवर्तीच्या सेनांचे राहण्याचे स्थान बिलकुल समुद्राचे अनुकरण करीत होते. जसे समुद्र प्रमाणरहित असंख्य रत्ने व शंख यांनी भरलेला असतो तसे हे चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल प्रमाणरहित शंख आदि निधि व रत्नाचे निवासस्थान होते. समुद्र जसा ज्यांच्या मस्तकावरील रत्नाचे किरणाग्र चमकत आहेत अशा सर्पानी सेवनीय असतो तसे चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल ज्यांच्या मस्तकावर अनेक रत्ने चमकत आहेत अशा भोगी अर्थात् राजे लोकांनी सेवनीय होते. जसे समुद्र निरन्तर वाढत असतो तसे या चक्रवर्तीचे सेनास्थान देखिल नेहमी वाढत होते व समुद्र जसा सर्व दिशात पसरून राहतो, तसे चक्रवर्तीचे हे सेनास्थान सर्व दिशांना घेरून राहिले होते. म्हणून हे सेनास्थान समुद्राचे अनुकरण करीत होते ।। १६५ ।।
ज्याने आपल्या सेनेला समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवले आहे व ज्याने आपल्या विजयलील शस्त्रानी मागधदेवाच्या सभेला जिंकले आहे. अशा निधिपतिभरत चक्रवर्तीने रथाच्याद्वारे समुद्रात जाऊन मागधदेवाप्रमाणे व्यन्तरदेवाचा स्वामी अशा वरतनु नामक देवालाही जिंकले व समुद्रात असलेल्या वरतनु नामक द्वीपाला कल्पान्त कालापर्यन्त स्थिर राहणान्या आपल्या यशाने नेहमी अलंकृत केले ।। १६६ ॥
चक्रवर्ती भरताने त्या वरतनु देवापासून कधीही न तुटणारे कवच-चिलखत, अतिशय कान्तिसंपन्न हार, चमकणारे चूडारत्न-चूडामणि, दिव्यकडे व रत्नांनी प्रकाशमान असा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org