Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-१६२)
महापुराण
(१६३
कुञ्जेषु प्रतनुतणाङकुरान्प्रमृद्नन् वप्रान्तानपि रदनैः शनैर्विनिघ्नन् । वल्ल्यग्रनसनचणः फलेनहिः सन् व्यालोलः कलभगणश्चिरं विजहे ॥ १५७ प्रत्यग्राः किसलयिनीहाण शाखा भङग्युच्चैर्वनगहनं निषीद कुञ्ज। सम्भोग्यानुपसर सल्लकीवनान्तानित्येवं व्यहृत वने करेणुवर्गः । १५८ सम्भोगैर्वनमिति निविशन्यथेष्टम् स्वातन्त्र्यान्मुहुरपि धूर्मतैनिषिद्धः। बद्धव्यः सहकलभः करेणुवर्गः सम्प्रापत्समुचितमात्मनो निवेशम् ॥ १५९ वित्रस्तरपथमुपाहतस्तुरङगैः पर्यस्तो रथ इह भग्ननिरक्षः। एतास्ता द्रुतमुपयान्त्यपेत्य मार्गाद्वारस्त्रीवहनपराश्च वेगसर्यः ॥ १६० वित्रस्तः करभनिरीक्षणाद्गजोऽयं भीरुत्वं प्रकटयति प्रधावमानः । उत्रस्तात्पतति च वेसरादमुष्माद्विस्रस्तस्तनजघनांशुका पुरन्ध्री ॥ १६१ इत्युच्चय॑तिवदतां पृथग्जनानां सजल्पः क्षुभितरवरौष्ट्रकौक्षकश्च । व्याक्रोशैर्जनितरवैश्च सैनिकानां संक्षोभः क्षणमभवच्चमूषु राज्ञाम् ॥ १६२
त्या हत्तींच्या छाव्यांच्या समूहाने लतामंडपातील बारिक गवताचे अंकुर पायानी तुडविले व तटावर आपल्या दातांनी हळु हळु प्रहार केले. तसेच वेलींचे शेंडे खाण्यात ते चतुर होते. त्यांनी झाडांची फळे तोडली व चंचलपणाने इकडे तिकडे ते खूप वेळपर्यन्त फिरले ॥ १५७ ॥
ताज्या व कोवळ्या पानांनी भरलेल्या फांद्या तोडून घे, मोडलेल्या ढाप्यांनी दाट भरलेल्या अशा वनात बैस, लतामंडपांतील प्रदेशात सल्लकीच्या लतांचे भक्षण कर अशा क्रिया करीत तो हत्तीणींचा समुदाय त्या वनात फिरू लागला ।। १५८ ।।
याप्रमाणे अरण्यांत नाना प्रकारच्या संभोगांनी-क्रीडानी अर्थात् क्रीडा करीत वनाचा आपल्या इच्छेने उपभोग करणारा, स्वतंत्ररूपाने पुढे चालल्यामुळे महातांनी ज्याला रोकले आहे व पिलासह असलेला व बांधावयास योग्य असा हत्तिणीचा कळप आपल्या राहण्यास योग्य अशा स्थानास आला ॥ १५९ ॥
हत्तीना पाहून भ्यालेल्या घोड्यांनी आडवाटेकडे नेलेला हा रथ येथे पडला व त्याचे जू मोडले व कणाही तुटला आहे. तसेच वेश्यांना वाहून नेणान्या या खेचरी भिऊन मार्ग सोडून फार वेगाने पळत आहेत ॥ १६० ॥
उंटाला पाहून घाबरलेला हा हत्ती पळत आहे व आपला भ्याडपणा व्यक्त करीत आहे व हत्तीला पाहून घाबरलेल्या. या खेचरावरून ही स्त्री खाली पडली आणि हिची चोळी व ढुंगणावरचे वस्त्र दोन्ही सुटले आहेत ।। १६१ ।।
याप्रमाणे जोराने बोलणाऱ्या सामान्य लोकांच्या भाषणानी क्षुब्ध झालेले गाढव, उंट आणि बैल यांच्या शब्दानी व अन्योन्य सैनिकांच्या शब्दानी राजांच्या सेनेमध्ये क्षणपर्यंत फार मोठा क्षोभ उत्पन्न झाला ।। १६२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org