________________
२९-१५१)
महापुराण
नाध्वा द्रुतं गुरुवरैरपि नानुयातः युद्धेषु जातु न किमप्यभिराद्धमेभिः । भारक्षमाश्च करिणः सविशेषमेव बद्धास्तथाप्यनिभृता इति धिक्चलत्वम् ॥ १४७ बध्नीथ नः किमिति हन्त विनापराधात् जानीत भोः प्रतिफलत्यचिरादिदं नः। इत्युच्चलच्छणि विधूय शिरांसि बन्धर्वैरं नियन्त्रिषु गजाः स्म विभावयन्ति ॥ १४८ आघातुको द्विरदनः सविशेषमेव गात्रापरान्तकरबालधिषु व्ययोजि । बन्धेन सिन्धुरवरास्त्वितरे तथा नो गाढीभवन्त्यविरतान्न परत्र बन्धाः ॥ १४९ आलानिता वनतरुष्वतिमात्रमुच्चस्कन्धेषु सिन्धुरवराश्च तथोच्चकर्यत् । तन्नूनमाश्रयणमिष्टमुदात्तमेव सन्धारणाय महतामहतात्मसारम् ॥ १५० इत्थं नियन्तृभिरनेकपवृन्दमुच्चैरालानितं तरुषु सामि निमीलिताक्षम् । तस्थौ सुखं त्रिचतुरेण कृताङ्गहारम् । लोलोपयुक्तकवलं स्फुटकर्णतालम् ॥ १५१
___ या हत्तींनी आपले शरीर स्थूल असल्यामुळे जलदीने मार्गक्रमण केले नाही असे नाही व यांनी युद्धप्रसंगी कांही अपराध केला, चुकवाचुकवी केली असेही पण नाही व ओझे वाहण्याच्या कामी यांनी विशेषरीतीने दक्षता घेतली. खूप ओझे वाहिले पण चंचलता अंगी असल्यामळे त्यांना विशेषरीतीने जखडन बांधले होते. यावरून त्यांच्या चंचलपणाला धिक्कार असो असे म्हणणे अयोग्य होईल असे वाटत नाही ।। १४७ ।।
___अहो आम्ही कांहीं अपराध केला नसताही आम्हाला विनाकारण कां बरे बांधता ? पण याचे फल तुम्हाला भोगण्याचा प्रसंग येईल हे तुम्ही चांगले ध्यानात घ्या असे जणु म्हणून त्या हत्तींनी कानावर असलेल्या अंकुशाला जोराने हालविले अर्थात् आपली अंकुशासह डोकी जोराने हालविली व महातांनी आपणास बांधल्यामुळे त्यांच्याविषयींचे स्वत:च्या मनात असलेले वैर त्यांनी प्रकट केले ॥ १४८ ॥
जी हत्तीची जात प्राणिघात करणारी होती. त्यांच्या शरीराचा मागचा भाग अर्थात् मागचे पाय पुढची सोंड व मागचे शेपूट इत्यादि ठिकाणी त्यांना विशेषरीतीने बांधून टाकले होते. पण जे उत्तम हत्ती तसे नव्हते त्यांना तसे बळकट बांधले नव्हते. यावरून असे वाटते की, मत्त हत्ती वाचून इतर हत्तींना फार बळकट बांधण्याचे कारण नव्हते ॥ १४९ ॥
__ ज्यांच्या मोठ्या शाखा अगदी उंच आहेत अशा वनवृक्षाशी मोठे हत्ती चांगले कसून बांधलेले होते. बरोबरच आहे की, ज्याचे सामर्थ्य नष्ट झाले नाही असा मोठा आश्रय मोठ्याना बांधण्यास त्यांचे संधारण करण्यास योग्य आहे असे आम्हास वाटतें ॥ १५० ॥
___ याप्रमाणे महातांनी अनेक हत्तींचा समूह मजबूत झाडांच्या ठिकाणी बांधला व तो हत्तींचा समूह आपले अर्धे डोळे मिटून व लीलेने घास खात उभा राहिला व सहज आपले पाय सोंड वगैरे अवयव गमतीने हालवू लागला व आपले कान हालवीत सुखाने उभा राहिला ।। १५१ ॥ म २१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org