Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-१४१)
महापुराण
विमुक्तं व्यक्तसूत्कारं करमुत्क्षिप्य वारणैः । वारि स्फटिक दण्डस्य लक्ष्मीमूहे खमुच्छलत् ॥ १३३ उदगाहैविनिर्धूतश्रमाः केचिन्मतङ्गजाः । बिसभङ्गरधुस्तृप्ति हेलया कवलीकृतः ॥ १३४ मृणालैरधिदन्ताग्रमपितविबभुर्गजाः । अजस्त्रमम्बुसंसेकाद्दन्तैः प्रारोहितैरिव ॥ १३५ प्रमाद्यद्विरदः कश्चिन्मृणालं स्वरोद्धृतम् । ददावालानबुद्धचैव नियन्त्रे द्विगुणीकृतम् ॥ १३६ चरणालग्नमाकर्षन्मृणालं भीलुको गजः । बहिः सरस्तटीं व्यास्थवन्दुतन्तुकशङ्कया ॥ १३७ करैरुत्क्षिप्य पद्मानि स्थिताः स्तम्बरमा बभुः । देवतानुस्मृति किञ्चत्कुर्वन्तोऽर्धेरिवोद्धृतः ॥ १३८ सरस्तरङ्गधौताङ्गा रेजस्तुङ्गा मतङ्गजाः । शृङ्गारिता इवालग्नः सान्द्ररम्भोजरेणुभिः ॥ १३९ ययुः करिभिरारुद्धं परिहत्य सरोजलम् । पतत्रिणः सरस्तीरं तद्युक्तमबलीयसाम् ॥ १४० सरोऽवगाहनिणिक्तमूर्तयोऽपि मतङ्गजाः । रजः प्रमाथैरात्मानं चक्रुरेव मलीमसम् ॥ १४१
ज्यातून जोराने सूत्कार शब्द बाहेर पडत आहे अशा आपल्या सोंडा हत्तीनी उंच करून त्यातून पाणी बाहेर सोडले असता ते आकाशात उंच उडू लागले व त्याने स्फटिकाच्या काठीची शोभा धारण केली ॥ १३३ ।।
___ पाण्यात खूप अवगाहन केल्यामुळे ज्यांचे श्रम दूर झाले आहेत अशा कित्येक हत्तीनी लीलेने खाल्लेल्या कमलांच्या दांड्यांच्या तुकड्यानी संतोष धारण केला ।। १३४ ।।।
कित्येक हत्तींनी आपल्या दातांच्या अनावर कमलांचे दांडे धारण केले होते. त्यामुळे नेहमी पाण्याच्या सिंचनाने जणु त्यांच्या दाताना अंकुर फुटले आहेत असे ते शोभू लागले ।। १३५॥
उन्मत्त अशा कोणी एका हत्तीने आपल्या सोंडेने उपटलेले कमलाचे दांडे दुहेरी केले व तेही आपल्या पायाला बांधण्याची साखळी आहे अशा बुद्धीने महाताला दिली ।। १३६ ॥
आपल्या पायात अडकलेल्या कमलाच्या दांड्याला ओढणारा कोणी भित्रा हत्ती त्याला आपल्याला बांधण्याचा साखळदंड आहे असे समजू लागला व तळयाच्या बाहेरच्या तटावरच तो उभा राहिला ॥ १३७ ।।
आपल्या सोंडानी कमळे उंच धरून उभे राहिलेले हत्ती देवतांचे कांही स्मरण करून जणु त्यांना अर्घ्य अर्पण करीत आहेत असे दिसत होते ॥ १३८ ॥
__ सरोवराच्या तरङ्गानी ज्यांची अंगे चांगली धुतली आहेत असे उंच हत्ती अंगांना दाट लागलेल्या कमलांच्या परागानी जणु रंगवून सुशोभित केल्याप्रमाणे दिसू लागले ॥१३९।।
हत्तींनी सर्व बाजूनी सरोवराचे पाणी व्यापलेले असल्यामुळे सरोवराचे पाणी सोडून सर्व पक्षी तटावर आले अर्थात् हे बरोबरच झाले. कारण दुर्बल जीवानी असेच वागणे योग्य आहे ॥ १४० ॥
सरोवरात अवगाहन करून हत्ती निर्मल-स्वच्छ झाले होते तरीही धूळ आपल्या अंगावर उडवून त्यांनी स्वतःला पुनः मलिन बनविले ।। १४१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org