Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१६२)
महापुराण
(२९-१५२
उत्तारिताखिलपरिच्छदलाघवेन प्रव्यजितद्रुतगतिक्रमलक्ष्यवेगाः। आपातुमम्बु सरसां परितः प्रसनुः उच्छृङ्खलैरनुगताः कलभैः करिण्यः ॥ १५२ प्राक्पीतमम्बु सरसां कृतमौष्ट्रकेण स्वोद्गालदूषितमुपात्ततदङ्गगन्धम् । नापातुमैच्छदुदकं तृषितोऽपि बर्कः सर्वो हि वाञ्छति मनोविषयं मनोज्ञम् ॥ १५३ पीतं पुरा गजतया सलिलं मदाम्बुसंवासितं सरसिजाकरमेत्य तूर्णम् । प्रीत्या पपुः कलभकाश्च करेणवश्च सम्भोगहेतुरुदितो हि सगन्धभावः ॥ १५४ प्रहषिणी-पीताम्भोव्यपगमितान्तरङ्गतापा सन्तापं बहिरुदितं सरोऽवगाहैः । नीत्वान्तं गजकलभैः समं करिष्यः सम्भोक्तुं सपदि वनद्रुमान्विचेरुः ॥ १५५ वल्लीनां सकुसुमपल्लवाग्रभङगान् गुल्मौघानपि सरसान्कडङगरांश्च । सुस्वादून्मृदुविटपान्वनद्रुमाणां तयूथं कवलयति स्म धेनुकानाम् ॥ १५६
अंगावरचे हौदा वगैरे सर्व सामान उतरून घेतल्यामुळे ज्यांना आता हलकेपणा वाटत आहे व त्यामुळे ज्यांची शीनगति-गमन होऊन ज्यांचा वेग व्यक्त झाला आहे. अशा हत्तिणी सरोवरांचे पाणी पिण्यासाठी सर्व बाजूंनी जेव्हा जाऊ लागल्या तेव्हां त्यांचे बंधनरहित छावे त्यांच्या मागून जाऊ लागले ।। १५२ ॥
कित्येक सरोवरांचे पाणी उंटांनी आधी प्राशन केले होते व त्यांच्या तोंडातील फेसाने ते दूषित झाले होते. त्याला उंटाच्या अंगाचा वास पण येत होता. त्यामुळे हत्तीच्या छाव्याला तहान लागली असूनही ते प्यावे असे त्याला वाटेना. बरोबर आहे की, सर्वाना आपल्या मनाचा विषय-मनाला आवडणारा पदार्थ सुंदर असावा असे वाटत असते ॥ १५३ ।।
पूर्वी हत्तींचा समूह येऊन पाणी पिऊन गेला होता व त्याच्या मदजलाने ते पाणी गंधयुक्त झाले होते. त्याला हत्तींच्या मदाचा वास येत होता. पण असे ते पाणी हत्तिणी व त्याच्या छाव्यानी शीघ्र व प्रेमाने प्राशन केले. हे ठीकच आहे- कारण समानता-समानजातिपणा हा खाणेपिणे आदि कार्यात योग्य कारण मानले आहे ।। १५४ ॥
सूर्याच्या किरणानी उत्पन्न झालेला जो बाह्य सन्ताप तो सरोवरात प्रवेश करून आपल्या छाव्यासह हत्तीणींनी नाहीसा केला. यानंतर त्यांनी शरीरात होणारा अन्तस्ताप पाणी पिऊन नाहीसा केला आणि नंतर त्या आपल्या छाव्यासह शीघ्र वनात वक्षांची पाने खाण्यासाठी निघाल्या ।। १५५ ॥
फुलांनी व कोवळ्या पानानी युक्त असे वेलींचे पुढले शेंडे, स्वादयुक्त असे झुडपांचे समूह, रसाळ व कोमल अशा वनवृक्षांच्या फांद्या आणि भूस-धान्याचा कोंडा अशा वनस्पतींच्या प्रकारांचे त्या हत्तिणींनी भक्षण केले ।। १५६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org