Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०-७८)
महापुराण
(१७५
क्षीबकुञ्जरयोगेऽपि क्वचिदक्षीबकुञ्णरम् । विपत्रमपि सत्पत्रपल्लवं भाति यवनम् ॥ ७३ स्फुटद्वेणूवरान्मुक्तैर्व्यस्तैर्मुक्ताफलः क्वचित् । वनलक्ष्म्यो हसन्तीव स्फुरद्दन्तांशु यहुने ॥ ७४ गुहामुखास्फुरद्धीरनिर्झरप्रतिशब्दकः । गर्जतीव कृतस्पर्को महिम्ना यः कुलाचलैः॥ ७५ स्फुटं निम्नोन्नतोद्देशैश्चित्रवर्णैश्च धातुभिः । मृगरूपैरतक्यैश्च चित्राकारं विभति यः ॥ ७६ ज्वलन्त्योषषयो यस्य वनान्तेषु तमीमुखे । देवताभिरिवोत्क्षिप्ता दीपिकास्तिमिरच्छिदः ॥७७ क्वचिन्मृगेन्द्रभिन्नभकुलोच्छलितमौक्तिकः । यदुपान्तस्थलं धत्ते प्रकीर्णकुसुमश्रियम् ॥ ७८
त्या पर्वतावरचे वन क्षीबकुंजरयोगेऽपि उन्मत्त हत्तींनी सहित असून देखिल अक्षीबकुज्जर-मदोन्मत्त हत्तींनी रहित होते आणि विपत्रमपि-पानांनी रहित असूनही सत्पत्रपल्लवं-पाने व कोवळ्या पानांनी सहित होते. याप्रमाणे विरोधरूप असून सुशोभित झाले होते. या श्लोकांत विरोधाभास अलंकार आहे. विरोधाचा परिहार असा- तेथील वन क्षीबकुंजर मदोन्मत्त हत्तींनी युक्त असूनही अक्षीबकुञ्जर म्हणजे समुद्राच्या मिठाने युक्त व हत्तींच्या दातांना देणारे होते. अथवा शोभांजन नामक लतामण्डपाना देणारे होते आणि विपत्र-पक्षांच्या पंखांनीसहित असूनही उत्तम पाने व नवीन कोमल पानानी सहित ते वन होते. याप्रमाणे विरोध परिहार शाला ।। ७३ ।।
या विध्यपर्वताच्या वनांत वेळू फुटून त्यांच्या पोटांतून बाहेर आलेले व इकडे तिकडे पसरलेले जे मोत्यांचे समूह ते अनेक वनलक्ष्मी हसत असतां त्यांच्या दातांचे किरण पसरल्याप्रमाणे वाटतात ॥ ७४ ।।
गुहांच्या तोंडातून बाहेर पडणा-या झ-यांच्या गंभीर प्रतिध्वनींनी तो पर्वत इतर हिमवदादि कुलपर्वताबरोबर जणु आपल्या महिमेने स्पर्धा करीत गर्जना करीत आहे असे वाटते ।। ७५ ॥
हा पर्वत खोलगट व उंच असे प्रदेश धारण करीत आहे, आणि नाना रंगांचे धातु धारण करीत आहे. ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही असे चित्रविचित्र रंगाचे व आकृतीचे पशु धारण करीत आहे. यामुळे हा पर्वत अनेक विचित्र आकार धारण करीत आहे असे वाटते ॥ ७६ ।।
या पर्वताच्या अरण्यांत कृष्णरात्रीच्या आरंभी जणु देवतांनी लावलेल्या व अंधकाराचा नाश करणाऱ्या अनेक दिवट्या आहेत. असा भास करणान्या अनेक वनस्पति प्रकाशत असतात ।। ७७॥
सिंहाने फोडलेल्या अनेक हत्तींच्या गंडस्थलांतून-मस्तकांतून बाहेर उसळून पडलेल्या मोत्यांनी फुले पसरली असता जी शोभा दिसते तशी शोभा या पर्वताच्या पायथ्याची जमीन एके ठिकाणी धारण करीत आहे ।। ७८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org