Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०-६५)
महापुराण
(१७३
बाणामविरताबाणां केतम्बामम्बुसम्भृताम् । करीरिततटोत्सङ्गां करीरी सरिदुत्तमाम् ॥ ५७ प्रहरी विषममाहेर्दूषितामसतीमिव । मुररां कुररैः सेव्यामपपङ्कां सतीमिव ॥ ५८ पारां पारेजलं कूजत्क्रौञ्चकादम्बसारसाम् । मदनां समनिम्नेषु समानामस्खलद्गतिम् ॥ ५९ मदतिमिवाबद्धवेणिकां ससह्यदन्तिनः । गोदावरीमविच्छिन्नप्रवाहामतिविस्तृताम् ॥ ६० . करीरवनसंरुद्धतटपर्यन्तभूतलाम् । तापीमातपसन्तापात्कवोष्णा बिभ्रतीमपः ॥ ६१ रम्यां तीरतरुच्छायासंसुप्तमृगशावकाम् । खातामिवापरान्तस्य नदी लाङ्गलखातिकाम् ॥ ६२ सरितोऽमूःसमं सैन्यरुत्ततार चम्पतिः । तत्र तत्र समाकर्षन्मदिनो वनसामजान् ॥ ६३ प्रसारितसरिज्जिह्वो योऽब्धि पातुमिवोद्यतः। सह्याचलं तमुल्लङघ्य विन्ध्यादि प्राप तद्वलम्॥६४ भूभृतां पतिमुत्तुङ्ग पृथुवंशंधृतायतिम् । परैरलङध्यमद्राक्षीद्विन्ध्यादि स्वमिव प्रभुः ॥ ६५
जिच्यांत पाण्याचा खळखळाट नेहमी होत असतो अशी बाणा नावाची नदी, जिच्यात पाणी नेहमी भरलेले असते अशी केतम्बा नामक नदी. जिचा तीरप्रदेश हत्तींनी उकरलेला आहे अशी नद्यामध्ये उत्तम असलेली करीरी नदी, जसे नीच पुरुषांच्या सहवासाने बिघडलेल्या स्त्रीप्रमाणे भयंकर मगरसुसरी वगैरे जलचरांनी बिघडलेली तरून जाण्यास कठिण झालेली प्रहरानामक नदी, जशी सती स्त्री अपपंक-पापरहित असते तशी जी अपपंक चिखलरहित आहे आणि जिच्या तीरावर कुरर नांवाचे पक्षी राहतात अशी मुररा नांवाची नदी ॥ ५७-५८ ॥
जिच्या किना-यावरील पाण्यांत करकोचा, कलहंसबदक व सारस पक्षी शब्द करीत आहेत अशी पारानदी. सपाट प्रदेश व खोलगट प्रदेश अशा दोन्ही स्थानी समान वन अडखळता जिचा प्रवाह वाहत असतो अशी मदना नामक नदी ॥ ५९॥
सह्यपर्वतरूपी हत्तीचा जणु मदाचा प्रवाह जो की बांधलेल्या वेणीसारखा सरळ आहे. अशी व जिचा प्रवाह अतिशय विस्तृत व अखण्ड आहे अशी गोदावरी नदी ।। ६० ।।
नेपतीच्या वनाने जिच्या तटावरील भूमिप्रदेश व्याप्त झाला आहे व जी सूर्याच्या प्रखर तापामुळे कोमट पाणी धारण करीत आहे अशी तापी नदी॥ ६१ ।।
जिच्या तीरावरील वृक्षांच्या छायेत हरिणबालक झोपले आहेत अशी रम्या नदी आणि पश्चिमेकडील प्रदेशाची जणु खातिका ( खंदक ) अशी लांगलखातिका नदी ।। ६२ ॥
इत्यादि अनेक नद्या सेनापतीने आपल्या सैन्यासह पार केल्या व त्याने अनेक जंगली मदोन्मत्त हत्तीनाही पकडवून आणिले होते ॥ ६३ ॥
नद्यारूपी आपल्या जिभा लांब पसरून जो समुद्राचे पाणी पिण्यासाठी उद्युक्त झाला आहे अशा सह्याद्रीला उल्लंघून भरतराजाचे सैन्य विध्याद्रीजवळ आले ॥ ६४ ।।
प्रभु भरताने आपल्याप्रमाणे या विध्यपर्वताला पाहिले. प्रभुभरत भूभतां पतिम्आपण ज्याप्रमाणे सर्व राजांचे स्वामी आहोत तसे हा विध्य देखिल सर्व पर्वतांचा पति स्वामी आहे. उत्तडं आपण जसे वैभवादिकांनौ उंच आहोत तसा हा पर्वत उत्तंग-शिखरांनी उंच आहे व आपण जसे पृथुवंश-श्रेष्ठ वंशामध्ये जन्मलो आहोत तसा हा पर्वत पृथुवंश-मोठ्या वेळूनी युक्त आहे, आपण जसे धृतायति-उत्कृष्ट भविष्याला धारण करणारे आहोत तसे हा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org