Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३०-९२)
महापुराण
(१७७
तामुत्तीर्य जनक्षोभात् उत्पतत्पतगावलीम् । बलं विन्ध्योत्तरस्थानमाक्रामत्कुतपास्थया ॥ ८६
तस्य दक्षिणतोऽपश्यद्विन्ध्यमुत्तरतोऽप्यसौ। द्विधाकृतमिवात्मानमपर्यन्तं दिशोर्द्वयोः ॥ ८७ स्कन्धावारनिवेशोऽस्य नर्मदामभितोऽद्युतत् । प्रथिम्नाविन्ध्यमावेष्टय स्थितो विन्ध्य इवापरः ॥८८ बलोपभुक्तनिःशेषफलपल्लवपादपः । अप्रसूनलतावीरुद्विन्ध्यो वन्ध्यस्तदाभवत् ॥ ८९ वैणवस्तण्डुलैर्मुक्ताफलमित्रैः कृतार्चनाः । अध्यूषः सैनिकाः स्वैरं रम्या विन्ध्याचलस्थितिः॥९० गजैगण्डोपलरश्वैरश्ववकत्रश्च विद्वतैः । स्कन्धावारः सविन्ध्यश्च भिदा नावापतुर्मिथः ॥ ९१ कृतावासं च तत्रैनं ददृशुस्तद्वनाधिपाः । वन्यरुपायनैः श्लाघ्यरगदैश्च महौषषैः ॥ ९२
..............-------------
लोकांच्या क्षोभाने-गलबल्याने जिच्या तटावरील पक्ष्यांची पंक्ति उडून गेली आहे अशा नर्मदा नदीतून भरताचे सैन्य उतरून विंध्यपर्वताच्या उत्तरेकडील टेकड्यावर येथे आम्हास बसण्याकरिता देवडी केलेली आहे अशा बुद्धीने चढू लागले ॥ ८६ ।।
त्या भरतराजाने दक्षिणेकडे व उत्तरेकडेही पसरलेल्या विन्ध्यपर्वताला पाहिले. जणु आपले दोन विभाग करून या दोन दिशांना त्याने स्वतः आपल्याला वाटून दिले आहे असे भरताला वाटले ।। ८७ ।।
नर्मदानदीच्या दोन्ही किनान्यावर पसरलेली भरतराजाच्या सैन्यांची छावणी आपल्या मोठ्या विस्ताराने विन्ध्यपर्वताला वेढून दुसरा विंध्यपर्वत जणु राहिला आहे अशी शोभली ॥ ८८ ॥
भरतराजाच्या सैन्याने विन्ध्यपर्वतावरील सर्व वृक्षांची फळे व कोवळी पाने उपभोगिली. तसेच वेलींची व झुडपांची फलेही उपभोगिली. त्यामुळे तो विध्याद्रि त्यावेळी वन्ध्याद्रि झाला अर्थात् पुष्पफळांनी रहित वांझ-झाला ।। ८९ ।।
वेळूच्या समूहांतील तांदूळ व त्यांतील मोत्यांचा समूह यांच्या मिश्रणानी ज्यांची पूजा अर्थात् आदर केला आहे असे सैनिक स्वच्छंदाने तेथे राहिले. त्यांना तेथे राहणे मोठे आनंददायक वाटले ॥ ९० ॥
गजैर्गण्डोपलैरिति- हत्तींनी व घोड्यांनी युक्त अशी सैन्याची छावणी होती व विन्ध्यपर्वत देखिल हत्तीप्रमाणे मोठमोठे जे काळे दगड त्यांनी युक्त होता व इकडून तिकडे पळणारे घोडमुखे किन्नर यांनी युक्त होता. त्यामुळे सैन्याची छावणी व विन्ध्यपर्वत एकमेकापासून वेगळे दिसत नव्हते. दोघांचे सादृश्य मात्र दिसले ।। ९१ ॥
त्या विंध्यवनाचे जे राजे होते त्यांनी भरतराजाला पाहिले व अरण्यात उत्पन्न झालेल्या उत्तम अशा वस्तु व रोगविनाशक उत्तम उत्तम औषधेही त्याला भेट दिली याप्रमाणे राजांनी भरतप्रभूचे दर्शन घेतले ॥ ९२ ।। म. २३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org