Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१६८)
महापुराण
(३०-१४
निपपे नालिकेराणां तरुणानां नुतो रसः । सरस्तीरतरुच्छायाविश्रान्तरस्य सैनिकः ॥ १४ स्फुरत्परुषसम्पातः पवनाधूननोत्थितः । तालीवनेषु तत्सैन्यः शुश्रुवे मर्मरध्वनिः ॥ १५ समं ताम्बूलवल्लीभिरपश्यत्क्रमुकान् विभुः । एककार्यत्वमस्माकमितीव मिलितान्मिथः ॥ १६ नृपस्ताम्बूलवल्लीनामुपध्नान् क्रमुकद्रुमान् । निध्यायन्वेष्टितांस्ताभिर्मुमुदे दम्पतीयितान् ॥१७ - स्वाध्यायमिव कुर्वाणान्वनेष्वविरतस्वनान् । वीन्मुनी निव सोऽपश्यद्यत्रास्तमितवासिनः ॥ १८ पनसानि मुद्न्यन्तः कण्टकीनि बहिस्त्वचि । सुरसान्यमृतानीव जनाः प्रादन्यथेप्सितम् ॥ १९ नालिकेररसः पानं पनसान्यशनं परम् । मरीचान्युपदंशश्च वन्या वृत्तिरहो सुखम् ॥ २० सरसानि मरीचानि किमप्यास्वाद्य विष्किरान् । रुवतःप्रभुरद्राक्षीद्गलदश्रुविलोचनान् ॥ २१ विदश्य मञ्जरीस्तीक्ष्णा मरीचानामशङकितम् । शिरोविधूनतोऽपश्यत्प्रभुस्तरुणमर्कटान् ॥ २२
सरोवराच्या तीरावर असलेल्या वृक्षांच्या सावलीत विश्रांति घेऊन भरताचे सैनिक तरुण नारळांच्या झाडांचा आपोआप गळणारा रस यथेच्छ पीत असत ॥ १४ ॥
त्या भरतराजाच्या सैनिकांनी ताडवृक्षाच्या अरण्यात वा-याने हलविल्यामुळे उत्पन्न झालेला, जवळ आल्यानंतर ज्यांचा कठोरपणा कानाला झोंबत आहे असा वाळलेल्या ताडांच्या पानांचा ध्वनि ऐकिला ॥ १५ ॥
आम्हा दोघांचे कार्य एकच आहे असे समजून जणु सुपारीची झाडे तांबूललताशी परस्पर मिळून गेलेली आहेत असे भरतराजाने पाहिले ॥ १६ ॥
तांबूलाच्या वेलींना आधाररूप असलेले व स्त्रियांनी युक्त अशा पुरुषाप्रमाणे दिसणाऱ्या सुपारीच्या झाडाना तांबल वेलीनी वेष्टिलेले पाहून भरतराजाला मोठा आनंद वाटला. हे दम्पति आहेत असे वाटून तो आनंदला ॥ १७ ॥
___त्या वनात सूर्यास्ताच्या वेळी निवास करणारे जे पक्षी सारखा शब्द करीत होते ते पाहून सूर्यास्ताचे वेळी एकेच ठिकाणी निवास करणारे व स्वाध्याय करणारे जणु मुनि आहेत असे भरतराजाला वाटले ॥ १८ ॥
___ ज्यांच्या त्वचेवर बाहेर काटे आहेत व जे आत मृदु आहेत व जे अमृताप्रमाणे सुरस आहेत असे फणस लोकानी आपली तृप्ति होईपर्यंत भक्षिले ॥ १९ ॥
नारळांच्या रसाचे पान करणे, यथेच्छ फणस खाणे व मियांचा चटणीप्रमाणे उपयोग करणे अशा रीतीने वनातील निवास अत्यंत सुखदायक आहे ॥ २० ॥
काही तरी मिन्यांचे सरस दाणे खाऊन जे शब्द करीत आहेत व ज्यांच्या डोळ्यातून अश्रु गळत आहेत अशा पक्ष्यांना भरतराजाने पाहिले ॥ २१ ॥
मियांच्या तीक्ष्ण-तिखट मंजरी निःशंकपणे खाऊन नंतर आपले मस्तक हलविणाऱ्या तरुण माकडाना भरतराजाने पाहिले ॥ २२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org