________________
२९-१२४)
महापुराण
(१५७
सरोवगाहनिर्धूतश्रमाः पीताम्भसो हयाः । आमीलिताक्षमध्यषुर्विततान्पटमण्डपान् ॥ ११७ नालिकेरद्रुमेष्वासीदुचितो वमशालिनः । निवेशो हास्तिकस्यास्य विभोस्तालीवनेषु च ॥११८ प्रपतन्नालिकेरौघ स्थपुटा वनभूमयः । हस्तिनां स्थानतामीघुस्तैरेव प्रान्तसारितैः ॥ ११९ द्विपानुदन्यतस्तीवं वमथुव्यजितश्रमान् । निन्युजलोपयोगाय सरांस्यभिनिषादिनः ॥ १२० नीचैर्गतेन सुव्यक्तमार्गसञ्जनितश्रमान् । गजानाधोरणा निन्युः सरसीरवगाहने ॥ १२१ प्रवेष्टुमब्जिनीपत्रच्छन्नं नागो नवग्रहः । नैच्छत्प्रचोद्यमानोऽपि वारि वारिधिशङ्कया ॥ १२२ वनं विलोकयन्स्वरं कवलोचितपल्लवम् । गजश्चिरगृहीतोऽपि किमप्यासीत्समुत्सुकः ॥ १२३ स्वैरं न पपुरम्भांसि नागृह्णकवलानपि । केवलं वनसम्भोगसुखानां सस्मरुन्जाः ॥ १२४
सरोवराच्या पाण्यात स्नान केल्यामुळे घोड्यांचा प्रवास-श्रम नाहीसा झाला व त्यानंतर ते पाणीही प्याले. यानंतर विस्तृत अशा वस्त्र मंडपात थोडेसे डोळे मिटून उभे राहिले ॥ ११७ ॥
ज्यांची शरीरे उंच व स्थूल होती अशा हत्तींच्या समुदायाचा निवास नारळाच्या झाडाखाली व ताडांच्या वनात होता. अर्थात् भरतमहाराजांचे हत्ती वरील वनात बांधले होते हे योग्यच होते ॥ ११८ ॥
वरून पडणाऱ्या नारळाच्या फलानी त्या वनभूमि उंच व खोलगट झालेल्या होत्या. पण हत्तीनीच ती फळे बाजूला सारली. त्यामुळे त्या वनभूमि त्याना राहण्यास योग्य झाल्या ॥ ११९ ॥
हत्तीना खूप तहान लागली होती व त्यांच्या तोंडातून फेस गळत असल्यामुळे ते श्रमाने थकले होते. म्हणून महातानी त्याना सरोवराकडे पाणी पाजण्याकरिता नेले ॥ १२० ॥
मंद मंद चालण्यामुळे हत्तीना मार्ग श्रम झाला असे स्पष्ट दिसत होते. म्हणून महातानी त्याना स्नानाकरिता सरोवराकडे नेले ॥ १२१ ॥
नवीनच ज्याला पकडले आहे अशा हत्तीला महांताने प्रेरणा केली तरीही कमलिनींच्या पानानी झाकलेल्या सरोवरात त्याने प्रवेश केला नाही. कारण त्याला हे समुद्राचे पाणी आहे असे वाटले ॥ १२२ ॥
ज्याला धरून पुष्कळ दिवस झाले आहेत असाही एक हत्ती ज्याची कोवळी पाने खाण्याला योग्य आहेत अशा वनाला पाहून विलक्षण उत्सुक झाला ।। १२३ ॥
कांही हत्तीनी स्वैरपणाने पाणी प्राशिले नाही व वनातील कोवळी पानेही पण खाल्ली नाहीत पण वनात पूर्वी आपण विहार करून यथेच्छ सुख भोगले होते याचे स्मरण ते करू लागले ।। १२४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org