Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१५८)
महापुराण
(२९-१२५
उत्पुष्करान्स्फुरद्रौक्मकक्षानिन्यद्विपान्सरः । सशयूनिव नीलाद्रीन्सविद्युत इवाम्बुदान् ॥ १२५ वनद्विपमदामोदवाहिने गन्धवाहिने । गजः कुप्यन् जलोपान्ते निन्ये कृच्छान्निषादिना ॥ १२६ अकस्मात्कुपितो दन्ती शिरस्तिर्यग्विधूनयन् । अनङकुशवशस्तीवमाधोरणमखेदयत् ॥ १२७ वन्यानकेपसम्भोगसङक्रान्तमदवासनाम् । विगाढुं सरसीं नैच्छन्मदेभः करिणीमिव ॥ १२८ पीतं वनद्विपः पूर्वमम्बु तद्दानवासितम् । द्विपः करेण सजिघ्रन्नापादास्फालयत्परम् ॥ १२९ पीताम्भसो मदासारैर्वृद्धि निन्यः सरोजलम् । गजा मुधा धनादानं नूनं वाञ्छन्ति नोन्नताः॥१३० उत्पुष्कर सरोमध्ये निमग्नोऽपि मदद्विपः । रंरद्धिः खमुत्पत्य व्यज्यते स्म मधुव्रतैः ॥ १३१ पीताम्बुरम्बुदस्पद्धिबृंहितो मदकुञ्जरः । दुधाव गण्डकण्डूयां चण्डगण्डूषवारिभिः ॥ १३२
ज्यानी आपल्या सोंडीचे अग्रभाग वर केले आहेत व ज्यांच्या पाठीवर सोन्याच्या जरीच्या झुली आहेत असे हत्ती अजगरानी युक्त अशा नील पर्वताप्रमाणे व विजेने सहित अशा मेघाप्रमाणे दिसत होते व त्याना महातानी सरोवराकडे नेले ।। १२५ ॥
रानटी हत्तींच्या मदाचा गंध वाहून नेणान्या अशा वाऱ्यावर एक हत्ती रागावला होता. त्याला महाताने मोठ्या कष्टाने पाण्यात भरलेल्या सरोवराकडे नेले ।। १२६ ।।
एक हत्ती अकस्मात रागावला. त्याने आपले मस्तक इकडे तिकडे फिरविले व इकडे तिकडे आपले मस्तक तो हलवू लागला, तो अंकुशाच्या वश राहिला नाही व त्याने तीव्रपणाने महात्ताला तीव्र खेदखिल्ले ।। १२७ ॥
रानटी हत्तींच्या संभोगाने जिचे पाणी मदाच्या वासाने युक्त झाले आहे अशा सरोवरात एक हत्ती प्रवेश करण्यास नाखुष झाला. जसे एका हत्तीने उपभोगलेल्या हत्तीणीचा उपभोग घेण्यास दुसरा हत्ती नाखुष असतो त्याप्रमाणे तो नाखुष झाला ॥ १२८ ॥
पूर्वी ज्याचे पाणी अन्य हत्तीनी प्राशन केल्यामुळे त्याच्या मदाने ते पाणी वासयुक्त झाले होते अशा त्या पाण्याचा वास आपल्या सोंडेने हुंगून तो हत्ती ते पाणी प्याला नाही. पण न पिता तो ते पाणी ढवळू लागला ।। १२९ ॥
- कांही हत्तीनी सरोवराचे पाणी प्राशन केले व आपल्या मद जलाच्या वृष्टीने ते सरोवराचे पाणी वाढविले. हे त्यांचे करणे योग्यच झाले. कारण जे उन्नत थोर असतात ते दुसऱ्याचे धन फुकट घेण्याची इच्छा करीत नाहीत ॥ १३० ॥
एक मत्त हत्ती सरोवरात बुडालेला होता तथापि त्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग पाण्यावर ठेवला होता. त्यावेळी आकाशात उडून जोराने गुंजारव करणाऱ्या भुंग्यांनी त्याला व्यक्त केले. अर्थात् येथे हत्ती बुडाला आहे असे स्पष्ट केले ॥ १३१॥
जो पाणी प्याला आहे, ज्याची गर्जना मेघाच्या गर्जनेशी स्पर्धा करीत आहे अशा मत्त हत्तीने सोंडेतून वेगाने सोडलेल्या पाण्यानी गालावरची खाज शांत केली ॥ १३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org