________________
२९-१०८)
महापुराण
(१५५
अथ तस्मिन्वनाभोगे सैन्यमावासयद्विभुः । वैजयन्त महाद्वार निकटेऽम्बुनिधेस्तटे ॥ १०३ सन्नागं बहुपुन्नागं सुमनोभिरधिष्ठितम् । बहुपत्ररथं जिष्णोर्बलं तद्वनमावसत् ॥ १०४ सच्छायान्सफलांस्तुङ्गान्बहुपत्रपरिच्छदान् । असेवन्त जनाः प्रीत्या पार्थिवांस्तापविच्छिदः ॥ सच्छायानप्यसम्भाव्यफलान्प्रोझ्य महाद्रुमान् । सफलान्विरलच्छायानप्यहो शिधियुर्जनाः॥१०६ आकालिकोमनादृत्य बहिश्छायां तवातनीम् । भाविनी तरुमूलेषु छायामाशिश्रियुर्जनाः ॥१०७ वनस्थली तरुच्छायानिरुद्धधुमणित्विषः । सजानयस्सरस्तीरेष्वध्यासिषत सैनिकाः ॥ १०८
यानन्तर दक्षिण समुद्राच्या तटावर वैजयन्त नावाच्या महाद्वाराजवळ विस्तृत वनप्रदेशातच चक्रवर्तीने आपले सैन्य ठेविले ॥ १०३ ।।
ते वन आणि भरतचक्रीचे सैन्य दोघेही समान होते ते असे- सन्नागं वन उत्तम नागवृक्षांनी युक्त होते आणि सैन्य सन्नाग-उत्तम हत्तींनी युक्त होते. वन बहु पुन्नागं पुष्कळ नागकेसर वृक्षांनी युक्त होते व सैन्य बहु पुन्नागं-पुष्कळ उत्तम पुरुषानी युक्त होते. वन सुमनोभिरधिष्ठितं-पुष्कळ फुलांनी गजबजले होते व सैन्य पुष्कळ देव अथवा उत्तम हृदयाच्या पुरुषानी युक्त होते. वन बहु पत्ररथं बहु पुष्कळ पत्ररथ-पक्ष्यानी सहित होते व सैन्य बहु पत्ररथ पुष्कळ वाहने व रथ यानी युक्त होते. याप्रमाणे भरताचे सैन्य आपल्या समान असलेल्या वनात राहिले होते ।। १०४ ॥
सैन्याने वृक्षांचा व राजांचा आश्रय परस्परामध्ये समानता असल्यामुळे घेतला होता ती समानता अशी- वनवृक्ष सच्छाय उत्तम सावलीनी युक्त होते व राजेही सच्छाय उत्तम कान्तीने सम्पन्न होत. राजे पार्थिव-पृथ्वीचे स्वामी म्हणून पार्थिव होत. वृक्ष पार्थिव-पृथिव्यां भवाः पृथ्वीमध्ये उत्पन्न होतात म्हणून पार्थिव होत. राजे सफल-पुष्कळ द्रव्य प्राप्तीने सम्पन्न असतात व वृक्ष हे सफल फलानी लकडलेले असतात. राजे तुंग-उंच-उदार स्वभावाचे असतात. वृक्ष देखील उंच असतात. राजे बहुपत्र परिच्छद-पुष्कळ वाहनादिक वैभवाने संपन्न असतात आणि वृक्ष पुष्कळ पानाच्या परिवाराने सहित असतात. राजे ताप विच्छिदः- दारिद्रयादिक दुःखे नष्ट करणारे असतात व वृक्ष सूर्य सन्तापाचा नाश करणारे असतात. ते सैन्यातील लोक राजांच्या स्वभावाप्रमाणे असलेल्या त्या वन वृक्षांच्या खाली प्रीतीने राहिले ॥ १०५ ॥
सैन्यातील लोकानी दाट सावलीचे परन्तु ज्याना फळे नाहीत अशा मोठ्या वृक्षांना देखील त्यागले पण ज्यांची छाया विरळ असूनही जे फलानी भरून गेले आहेत अशा वृक्षाचा त्यांनी आश्रय घेतला ।। १०६ ॥
तसेच कित्येक सैनिक थोडा वेळ राहणाऱ्या छायेला त्यागून वृक्षाच्या मुळाखाली पुढे येणारी जी छाया तिचा त्यानी आश्रय घेतला ॥ १०७ ॥
त्यावेळी वन प्रदेशातील वृक्षांच्या दाट सावलीमुळे सूर्य किरणाच्या उष्णतेचा ताप ज्याना बिलकुल होत नाही असे कित्येक सैनिक सरोवराच्या तीरावर आपल्या स्त्रियासह बसले ॥ १०८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org