________________
१५४)
महापुराण
(२९-९५
पाण्ड्यान्प्रचण्डदोर्दण्डान्स्वण्डितारातिमण्डलान् । प्रायो गजप्रियान्धन्विकुन्तभूयिष्टसाधनान् ॥९५ दृष्ट्वापदानानन्यांश्च तत्र तत्र व्युदुत्थितान् । जयसैन्यरनस्कन्ध सेनानीरनयद्वशम् ॥९६ ते च सत्कृत्य सेनान्यं पुरस्कृत्य ससाध्वसम् । चक्रिणं प्रणमन्ति स्म दूरादूरीकृनायतिम् ॥९७ करग्रहेण सम्पीड्य दक्षिणाशां वधूमिव । प्रसभं हृततत्सारो दक्षिणाब्धिमगात्प्रभुः ॥ ९८ लवङ्गलवलीप्रायमेलागुत्मलताङकितम् । वेलोपान्तवनं पश्यन्महतीं धृतिमाप सः ॥ ९९ तमासिषेविरे मन्दमान्दोलितसरोजलाः । एलासुगन्धयः सौम्या वेलान्तवनवायवः ॥ १०० मरुदुद्भूतशाखानविकीर्णसुमनोऽञ्जलिः । नूनं प्रत्यगृहीदेनं वनोद्देशो विशाम्पतिम् ॥ १०१ पवनाधूतेशाखाप्रैर्व्यक्तषट्पनिस्स्वनैः । विश्रान्त्यै सैनिकानस्य व्याहरनिव पादपाः ॥ १०२
पाषाणाप्रमाणे कठीण नसून हृदयानेही कठीण आहेत असे जे तेलंगण देशाचे राजे, ज्यांच्या सैन्यात हत्ती फार आहेत असे व जे नाना कलात निपुण आहेत असे कलिंग देशाचे राजे व त्यांच्याच स्वभावाप्रमाणे स्वभाव ज्यांचा आहे असे साहसी व मूर्ख असे आण्ड्र देशाचे राजे ; ज्यांना खोटे बोलणे आवडते व जे कपट प्रवृत्ति करतात असे चोल देशाचे राजे; ज्याची प्रवृत्ति सरळ व जे मधुरभाषी आहेत असे केरळ देशाचे राजे ; ज्यांचे बाहु प्रचण्ड आहेत, ज्यांनी शत्रु समुहाला जिंकले आहे, ज्यांना हत्ती प्रिय आहेत, ज्यांचे सैन्य धनुष्यधारी व भालाधारी आहे असे पाण्डय देशाचे राजे व आणखी काही राजे या सर्वांनी खंडणी द्यायची नाही म्हणून लढण्यासाठी तयारी केली होती. पण सेनापतीने आपल्या जयशाली सैन्याने हल्ला करून या सर्वांना जिंकून वश केले ॥ ९१-९७ ॥
नंतर त्यांनी आपणास जिंकणा-या सेनापतीचा सत्कार केला व त्याला पुढे करून भयभीत होऊन ते चक्रवर्तीकडे गेले. चक्रवर्तीने त्यांना राजपदावर कायम केले. त्यामुळे त्यांनी त्याला दूरून नमस्कार केला. जणु दक्षिण दिशेला स्त्रीप्रमाणे करग्रहण करून ज्याने तिचा स्वीकार केला आहे व त्या राजाचे स्थान ग्रहण करून चक्रवर्ती दक्षिण समुद्राकडे गेला ॥९८॥
लवंगाच्या आणि चन्दनाच्या वेलीनी युक्त व वेलदोड्याचे लहान झडपासारख्या बेलींनी यक्त, समद्राच्या किनाऱ्याजवळ असलेल्या वनाला पाहन चक्रवर्तीला फार सन्तोष वाटला ॥ ९९ ॥
ज्यांनी सरोवराचे पाणी मन्द रीतीने हालविले आहे, ज्यांच्यात वेलदोड्यांचा सुगंध पसरला आहे, जे किनाऱ्याच्या वनातून वाहात आहेत अशा सौम्य वायूनी या चक्रवर्तीची सेवा केली ॥ १०० ॥
वाऱ्याने हलविलेल्या शाखाच्या अग्रभागानी ज्याने फुलांची ओंजळ अपिली आहे अशा या वन प्रदेशाने खरोखर या चक्रवर्तीचे स्वागत केले आहे असे वाटले ॥ १०१ ।।
वाऱ्याने झाडांच्या फांद्यांचे अग्रभाग हालत होते व त्यावर व्यक्त रीतीने भुंगे गुंजारव करीत होते, त्यामुळे असे वाटत होते की, या वनातील वृक्ष जणु विश्रान्तीसाठी चक्रवर्तीच्या सैन्याला जणु बोलावीत आहेत ।। १०२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org