Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१५२)
महापुराण
नृपानवारपारीणान् द्वैप्यानप्युपसागरे । बली बलेरवष्टभ्य पुपोष वनजान्गजान् ॥ ७४ रत्नान्यपि विचित्राणि तेभ्यो लब्ध्वा यथेप्सितम् । तानेवास्थापयतत्र सन्तुष्टः प्रभुराज्ञया ॥ ७५ महान्ति गिरिदुर्गाणि निम्नदुर्गाणि च प्रभोः । सिद्धानि बलरुद्धानि किमसाध्यं महीयसाम् ॥ ७६ इत्थं स पृथिवीमध्यात्पौरस्त्यान्निर्जयन्नृपान् । प्रतस्थे दक्षिणामाशां दाक्षिणात्यजिगीषया ॥ ७७ यतो यतो बलं जिष्णोः प्रचलत्युद्घनायकम् । ततस्ततः ससामन्ता नमन्त्यानम्प्रमौलयः ॥ ७८ त्रिलिङ्गाधिपानौशान् कच्छान्ध्रविषयाधिपान् । प्रातरान्करेलांश्चेरान्पुनाटांश्च व्यजेष्ट सः ॥७९ कूटस्थानोलिकांश्चैव समाहिषक मेकुरान् । पांड्यानन्तरपाण्ड्यांश्च दण्डेन वशमानयत् ॥ ८० नृपानेतान्विजित्याशु प्रणमध्य स्वपादयोः । हृत्वा तत्साररत्नानि प्रभुः प्रापत्परं मुदम् ॥ ८१ सेनानीरपि बभ्राम प्रभोराज्ञां समुद्वहन् । गिरीन्ससरितो देशान्कालिङ्गकवनाश्रितान् ॥ ८२
(२९-७४
जे राजे उपसमुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्याजवळ राहत होते व जे समुद्राच्या द्वीपात राहत होते त्या सर्वांना आपल्या सैन्याच्या द्वारे भरतेशाने वश केले होते व वनात उत्पन्न झालेल्या हत्तीना पकडून त्याने त्याना पुष्ट केले ॥ ७४ ॥
त्या राजापासून नाना प्रकारची रत्नेही भरतेशाने आपल्या इच्छानुरूप मिळविली व त्यामुळे सन्तुष्ट होऊन आपल्या आज्ञेने त्यानाच त्यांच्या राज्यावर पुनः स्थापन केले ॥ ७५ ॥ पर्वतावरील मोठे किल्ले आणि जमीनीवरचे किल्ले भरतेशाच्या सेनेने घेरा घालून वश केले होते. बरोबरच आहे की, महान् सामर्थ्यशाली राजाना काय असाध्य असते बरे ? त्याना असाध्य कांहीच असत नाही ॥ ७६ ॥
याप्रमाणे भरतेशाने पूर्व दिशेच्या सर्व राजाना जिंकले. नंतर दाक्षिणात्य राजाना जिंकण्याच्या इच्छेने पृथ्वीच्या मध्यभागापासून दक्षिण दिशेकडे त्याने प्रयाण केले ॥ ७७ ॥
उत्कृष्ट सेनापतीने युक्त असे विजयी भरतेशाचे सैन्य जिकडे जिकडे प्रयाण करू लागले तिकडचे राजे सामन्तासहित आपले मस्तक नम्र करून त्याना नमस्कार करीत होते ॥ ७८ ॥
चक्रवर्ती भरताने त्रिकलिंग, ओश, कच्छं आणि आन्ध्र देशांच्या राजाना जिंकले. तसेच प्रातर, केरल, चेर आणि पुन्नाट या देशांचा अधिपतीनाही त्याने जिंकले ।। ७९ ।।
राजा भरताने कूट देश, औलिक देश, माहिष देश, कमेकुर देश, पांड्य व अन्तरपांड्य या देशातील राजाना दण्डरत्नाच्या साहाय्याने जिंकले ॥ ८० ॥
या राजाना जिंकून व आपल्या चरणावर नमस्कार करवून व त्यांच्यापासून साररत्ने ग्रहण करून भरत प्रभूला अतिशय आनंद वाटला ।। ८१ ।।
Jain Education International
भरतप्रभूची आज्ञा धारण करणारा सेनापति देखील पर्वत, नद्यानी सहित अनेक देशात फिरला व कलिंग देशाच्या अरण्यातही फिरला ॥ ८२ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org