Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१५०)
महापुराण
(२९-५४
उदुम्बरी च पनसां तमसा प्रमशामपि । पपुरस्य द्विधाः शुक्तिमती च यमुनामपि ॥ ५४ चेदिपर्वतमुल्लडघ्य चेदिराष्ट्र विजिग्यिरे । पम्पासरोऽम्भोऽतिगमा विभोरस्य तुरङ्गमाः ॥ ५५ तमण्यमूकमाक्रम्य कोलाहलगिरि श्रिताः । प्राङमाल्यगिरिमासेदुर्जयिनोऽस्य जयद्विपाः ॥ ५६ नागप्रियाद्रिमाक्रम्य कुतपावज्ञया विभोः । सेनाचराः स्वसाच्चक्रुर्गजांश्चेदिकरूषजान् ॥ ५७ नदी छत्रवती क्रान्त्वा वन्येभक्षतरोधसम् । भेजुश्चित्रवतीमस्य चमूवीरास्तुरङ्गमैः ॥५८ एद्धवामाल्यवतीनीरवनं वन्येभसङकुलम् । यामुनं च पयः पीत्वा जिग्युरस्य द्विपा दिशः॥ ५९ अनुवेणुमतीतीरं गत्वास्य जयसाधनम् । वत्सभूमि समाक्रम्य दशामिप्यलयत् ॥ ६० विशालां नालिकां सिन्धुं पारा निःकुन्दरीमपि । बहुवज्रां च रम्यां च नदी सिकतिनीमपि ॥६१ कुहां च समतोयां च कञ्चामपि कपीवतीम् । निर्विन्ध्यां च धुनी जम्बुमती च सरिदुत्तमाम् ॥६२ वसुमत्यापगामधिगामिनी शर्करावतीम् । स॒पां च कृतमालां च परिजां पनसामपि ॥ ६३ नदीमवन्तिकामां च हस्तिपानी च निम्नगाम् । कागन्धुमापगां व्याघ्री धुनी चर्मण्वतीमपि ॥ ६४ शतभागां च नन्दां च नदीं करभवेगिनीम् । चुल्लितापी च रेवां च सप्तपारां च कौशिकीम् ॥ सरितोऽमूरगाधापा विष्वगारुध्य तबलम् । तुरङ्गगमखुरोत्खाततीरा विस्तारिणीय॑धात् ॥ ६६
या भरतेशाचे हत्ती, उदुम्बरी, पनसा, तमसा, प्रमशा, शुक्तिसती आणि यमुना या नद्यांचे पाणी प्याले ॥ ५४ ॥
पंपा सरोवराचे पाणी ज्यानी उल्लंघिले आहे अशा प्रभु भरताच्या घोड्यानी चेदिपर्वताला उल्लंघून चेदिराष्ट्राला जिंकले ।। ५५ ॥
ऋष्यमूक पर्वताला उल्लंघून जयशाली भरताच्या जयशाली हत्तीनी ऋष्यमूक पर्वताला उल्लंघिले व त्यानी कोलाहल पर्वताचा आश्रय घेतला. या नंतर पूर्वदिशेच्या माल्य गिरि पर्वताकडे आले ॥ ५६ ।।
या भरतेशाच्या सैन्यानी जणु उंबरठा समजून नागप्रिय नामक पर्वत ओलांडला आणि त्यानी चेदि व करूष देशात उत्पन्न झालेल्या हत्तीना आपल्या ताब्यात घेतले ।। ५७॥
या राजाच्या सैन्यातील वीरानी जिचा तट रानटी हत्तीनी तोडला आहे, पाडला आहे अशा छत्रवती नदीला आपल्या घोड्याच्या द्वारे ओलांडले आणि ते चित्रवती नदीकडे आले ।। ५८॥
या राजाच्या हत्तीनी रानटी हत्तीनी भरलेल्या माल्यवती नदीच्या तीराला वेढा घातला व नंतर यमुना नदीचे पाणी पिऊन तेथील आजु-बाजूच्या दिशा त्यानी जिंकल्या ॥५९॥
या भरतेशाला जय मिळवून देणाऱ्या सैन्याने वेणुमती नदीच्या तीराला अनुसरून गमन केले व वत्स देशाच्या प्रदेशाला जिंकले आणि त्यानी दशाणी नदीलाही ओलांडले ॥६॥
- यानंतर या भरतेशाच्या सैन्याने विशाला नदी, नालिका, सिन्धु, पारा व निःकुन्दरी या नद्याना, तसेच बहुवज्रा नदी, रम्या नदी आणि सिकतिनी या नद्याना तसेच
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org