Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-५३)
महापुराण
(१४९
दशार्णकचनोभूतानपि चेदिकरूषजान् । दिङनागस्पद्धिनो नागानदुर्भागवनाधिपाः ॥ ४४ विभोर्वलभरक्षोभमसहन्तीव दुःसहम । सूषवेऽनन्तरत्नानि गर्भिणीव वसुन्धरा ॥ ४५ आपाण्डुरगिरिप्रस्थादा च वैभारपर्वतात् । आशैलाद्गोरथादस्य विचेरुर्जयकुञ्जराः ॥४६ वङ्गाङ्गपुण्ड्रमगधान्मालवान्काशिकौशलान् । सेनानीः परिबभ्राम जिगीषुर्जयसाधनः ॥४७ कालिन्दकालकूटौ च किरातविषयं तथा । मल्लदेशं च सम्प्रापन्मतादस्य चमूपतिः ॥ ४८ धनी सुमागधी गङ्गां गोमती च कपोवतीम् । देवस्यां च नदी तीभ्रमरस्य चमूगजाः ॥ गम्भीरामतिगम्भीरां कालतोयां च कौशिकीम् । नदी कालमहीं तानामरुणां निचुरामपि।।५० तं लौहित्यसमुद्रं च कम्बुकं च महत्सरः । चमूमतङ्गजास्तस्य भेजुः प्राच्यवनोपगाः ॥५१ दक्षिणेन नदं शोणमुत्तरेण च नर्मदाम् । बीजानदीमुभयतः परितो मेखलानदीम् ॥ ५२ विचेरुः स्वखुरोद्भूतधूलीसंरुद्धदिङमुखाः । जविनोऽस्य स्फुरत्प्रोथाः जयसाधनवाजिनः ॥ ५३
ज्या वनात हत्ती उत्पन्न होतात त्या वनाच्या अधिपतीनी दशार्णक देशाच्या वनात उत्पन्न झालेल्या आणि चेदि देश व करूष देश या देशात उत्पन्न झालेल्या व दिग्गजाशी स्पर्धा करणारे असे हत्ती भरत राजाला भेट म्हणून दिले ॥ ४४ ।।
या भरत प्रभूच्या सैन्याचे दु:सह ओझे जणु सहन न करणारी आणि जणु गर्भिणी अशा या वसुंधरेने-पृथ्वीने अनन्तरत्नाना जन्म दिला ॥ ४५ ॥
या भरतेशाचे विजयशाली हत्ती हिमवान् पर्वताच्या पायथ्याच्या टेकडीपासून वैभारपर्वतापर्यन्त आणि शिल पर्वतापासून गोरथपर्वतापर्यन्त फिरू लागले ॥ ४६ ।।
शत्रूना जिंकण्याची इच्छा करणारा भरतप्रभूचा सेनापति वंग, अंग, पुण्ड्र, मगध, मालव, काशि आणि कौशल या देशाना जिंकण्याच्या इच्छेने चतुरंग सैन्य घेऊन फिरू लागला ॥ ४७ ॥
भरतप्रभूच्या आज्ञेने तो सेनापति कालिंद व कालकूट या देशात, भिल्लांच्या राज्यात आणि मल्ल देशात क्रमाने आला ।। ४८ ।।
या भरत चक्रधराच्या सैन्यातले हत्ती सुमागधी, गंगा, गोमती, कपीवती, रेवस्या या नद्यातून तरून पलिकडे गेले ।। ४९ ।।
पूर्व दिशेच्या वनाकडे गेलेले भरत प्रभूचे हत्ती अतिशय खोल पाण्याची गंभीरानदी, कालतोया, कौशिकी, कालमही, ताम्रा, अरुणा, निचुरा या नद्या व लौहित्यसमुद्र आणि कंधुक सरोवर या ठिकाणी फिरले ॥ ५०-५१ ॥
आपल्या खुरांच्या आघातानी उडालेल्या धुराळयानी ज्यानी सर्व दिशा व्यापिल्या आहेत, ज्याचे नाकाचे भाग फुरफुरत आहेत व जय मिळवून देणारे असे भरतेशाचे घोडे, शोणभद्रनदीच्या दक्षिण बाजूने व नर्मदा नदीच्या उत्तर बाजूने बीजा नामक नदीच्या दोन्ही बाजूनी व मेखलानदीच्या सर्व बाजूनी फिरत होते ।। ५२-५३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org