Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-३५)
महापुराण
(१४७
पार्थिवस्यैकराष्ट्रस्य मता वर्णाश्रमाः प्रजाः । पार्थिवाः सार्वभौमस्य प्रजा यत्तेन ते धृताः ॥२९ पुण्यं साधनमस्यैकं चक्रं तस्यैव पोषकम् । तद्वयं साध्यसिद्धयङ्ग सेनाङ्गानि विभूतये ॥ ३० इति मण्डलभूपालान्बलात्प्राणमयनयम् । मानमेवाभनक तेषां न सेवाप्रणयं विभुः ॥ ३१ प्रतिप्रयाणमभ्येत्य प्राणंसिषुरमुं नृपाः । प्राणरक्षामिवास्याज्ञां वहन्तः स्वेषु मूर्धसु ॥ ३२ प्रणताननुजग्राह सातिरेकैः फलैः प्रभुः । किमु कल्पतरोः सेवास्त्यफलाल्पफलापि वा ॥ ३३ सम्प्रेक्षणः स्मितहासः सविश्रम्भश्च जल्पितैः । सम्राट् सम्भावयामास नपान्संमाननैरपि ॥३४ स्मितः प्रसाद सञ्जल्पवित्रम्भं हसितैर्मुदम् । प्रेक्षितैरनुरागं च व्यनक्ति स्म नृपेषु सः ॥ ३५
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण. आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि भिक्षु हे चार आश्रम. या चार वर्णांचे व चार आश्रमांचे जे जनसमुदाय हे एका राष्ट्राची-एका देशाच्या राजाची प्रजा आहे व असे नम्र झालेले अनेक देशाचे जे राजे ते चक्रवर्तीची प्रजा होय. म्हणून प्रजेबरोबर राजांचीही काळजी वाहणे हे चक्रवर्तीला योग्यच आहे ॥ २९॥
पूर्वजन्मी प्राप्त करून घेतलेले पुण्यकर्म हे या चक्रवर्तीला सर्व कार्यसिद्ध करण्यास मुख्य साधन होते व चक्ररत्न हे त्या पुण्याला मदत करणारे दुसरे साधन होते व सैन्य हे त्याच्या वैभवाला प्रकट करणारे होते. अर्थात् विजयरूपकार्याच्या सिद्धीलाही दोन मुख्य कारणे होती ॥ ३० ॥
याप्रमाणे वर सांगितलेल्या साधनानी ह्या राजेश्वराने मांडलिक राजांना नम्र केले अर्थात् त्यांचा अभिमान त्याने नष्ट केला पण सेवा करण्याविषयी जे त्यांचे प्रेम होते ते त्याने नष्ट केले नाही ॥ ३१ ॥
प्रत्येक प्रयाणाचे वेळी ते राजे आले व त्यानी त्याला नमस्कार केला व जणु आपल्या प्राणाचे रक्षण करणारी अशी या चक्रवर्तीची आज्ञा त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केली ॥ ३२ ॥
भरतेश्वराने जे राजे नम्र झाले होते त्याना अतिशय अधिक फळ देऊन त्यांच्यावर चांगला अनुग्रह केला. बरोबरच आहे की, कल्पवृक्षाची सेवा निष्फळ किंवा त्याच्यापासून अल्प फल मिळाले असे कधी घडले आहे काय ? ॥ ३३ ।।
या चक्रवर्तीने कित्येक राजाना प्रसन्नपाहण्याने, कित्येकांना अधिक हसण्याने, कित्येकाबरोबर विश्वासयुक्त भाषणाने व कित्येकांचा आदराने सत्कार करून संतुष्ट केले ॥ ३४ ॥
___या भरतराजाने किंचित् हसण्याने त्या मांडलिक राजाविषयी आपली प्रसन्नता व्यक्त केली. कित्येकाशी मनमोकळेपणाच्या भाषणाने विश्वास प्रकट केला. अधिक हसण्याने आनंद व्यक्त केला व प्रेमळ पाहण्याने त्यांच्याविषयीचे प्रेम त्याने व्यक्त केले ॥ ३५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org