Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-२१)
महापुराण
(१४५
चमूरवधवादेव कैश्चिदस्य विरोधिभिः । चमूरुवृत्तमारब्धमतिदूरं पलायिभिः॥ १५ महाभोगर्नुपैः कैश्चिद्भयादुत्सृष्टमण्डलैः । भुजङ्गरिव निर्मोकस्तत्यजेऽपि परिच्छदः ॥ १६ प्रदुष्टान्भोगिनः कांश्चितप्रभुरुद्धृत्य मन्त्रतः । वल्मीकेष्विव दुर्गेषु कुल्यानन्यानतिष्ठिपत् ॥१७ अनन्यशरणैरन्यैस्तापविच्छेदमिच्छुभिः । तत्पादपादपच्छाया न्यषेवि सुखशीतला ॥ १८ केषाञ्चित्पत्रनिर्मोक्षं छायापायं च भूभुजाम् । पादपानामिव ग्रीष्मः समभ्यर्णश्चकार सः॥ १९ ध्वस्तोष्मप्रसरा गाढमुच्छ्वसन्तोऽन्तराकुलाः । प्राप्तेऽस्मिन्वैरिभूपालाः प्रापुर्मर्तव्यशेषताम्॥२० वैरकाम्यति यो नास्मिन्प्रागेव विननाश सः । विदिध्यापयिषुर्वह्नि शलभः कुशली किम् ॥ २१
सैन्याचा शब्द ऐकल्याबरोबर या भरतराजाचे शत्रु अतिदूर पळून हरिणाच्या वृत्ताचा आश्रय करीत असत ॥ १५ ॥
उत्तम सुखे भोगणारे अशा कित्येक राजांनी आपल्या-मण्डलाचा देशाचा त्याग केला. जसे ज्यांची शरीरे स्थूल आहेत असे सर्प भयाने आपल्या शरीराचा मंडलाकार त्यागतात व कांत सोडून देतात. तसे महाभोग सुखे भोगणारे असे राजे भयाने आपल्या देशाचा त्याग करून व आपले छत्र चामरादिक सोडून टाकून गेले ।। १६ ॥
___जसे दुष्ट सर्पाना मंत्राच्याद्वारे पकडून वारूळात सोडतात तसे प्रजेला पिळून सुखोपभोग घेणाऱ्या दुष्ट राजांना आपल्या मंत्राच्याद्वारे सल्लामसलतीने किल्ल्यात डांबून ठेवले व कुलीन इतर राजांना त्यांच्या राज्यावर भरतमहाराजानी स्थापन केले ॥ १७ ॥
ज्याना दुसरा कोणी रक्षक नाही व आपल्याला त्रास-दुःख होऊ नये असे इच्छिणारे कित्येक राजानी या भरतराजाच्या चरणरूपी वृक्षाची सुखदायक व शीतल अशी जी छाया तिचा आश्रय घेतला ॥ १८ ॥
ग्रीष्मऋतु जवळ आला म्हणजे तो कित्येक वृक्षाची पाने नाहीशी करतो व कित्येकांची छाया-सावली नाहीशी करतो. तसे या भरतराजाने देखिल कित्येक दुष्ट राजांचा पत्रनिर्मोक्षहत्ती घोडे वगैरे पत्राना-वाहनाना नाहीसे केले. व कित्येकांच्या छायेचा अपाय-आश्रयाचा नाश केला ॥ १९ ॥
हा भरतराजा जेव्हा जवळ आला तेव्हा कांहीं शत्रुराजांच्या तेजस्वीपणाचा नाश झाला. ते मोठ्या वेगाने श्वास टाकू लागले व त्यांच्या अन्तःकरणात फारच व्याकुळता उत्पन्न झाली. आता त्यांचे फक्त मरावयाचे बाकी उरले होते ॥ २० ॥
__जो राजा या भरतराजाविषयी मनात शत्रुभाव बाळगीत होता. त्याचा पूर्वीच नाश होऊन चुकला. बरोबरच आहे की अग्नि आपण विझवू अशी इच्छा करणा-या टोळाचे कुशल कसे होईल ? तो सुखी होणे कसे शक्य आहे ? ॥ २१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org