Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१४४)
महापुराण .
(२९-९
प्रययो निकषाम्भोधि समया तटवेदिकाम् । अनुवेलावनं सम्राट् सन्यैः संभावयन्विशः ॥९ मनुवाद्धितटं कर्षन्नलच्या स्वमनीकिनीम् । आज्ञालतां नृपाद्रीणां मूनि रोपयति स्म सः॥ चलिते चलितं पूर्व निर्याते निःसृतं पुरः । प्रयाते यातमेवास्मिन् सेनानीभिरिवारिभिः॥ ११ निष्क्रान्त इति सम्भ्रान्तरायात इति भीवशः । प्राप्त इत्यनवस्थश्च प्रणेमे सोऽरिभूमिपैः ॥१२ महापगारयस्येव तरुरस्य बलीयसः । यो यः प्रतीपमभवत्स स निर्मूलतां ययौ ॥ १३ प्रतीपवृत्तिमादर्श छायास्मानं च नात्मनः । विक्रमकरसश्चक्री सोऽसोढ किमुत द्विषम् ॥ १४
सम्राट भरताने आपल्या सैन्याच्याद्वारे सर्व दिशाना शब्दमय करीत प्रयाण केले. अर्थात् समुद्राच्याजवळ व तटवेदिकेला लागून असलेल्या वनाच्या जवळ त्याने सैन्यासह प्रयाण केले ॥ ९ ॥
जिचा पराभव करणे शक्य नाही अशा आपल्या सेनेला चक्रवर्तीने समुद्रतटाला अनुसरून नेले व त्याने राजे हेच जणु पर्वत त्यांच्या मस्तकावर त्याने आपल्या आज्ञारूपी लतेचे आरोपण केले ॥१०॥
भरतराजा जाण्याला उद्युक्त झाला म्हणजे त्याच्या पूर्वी सेनापति जसे निघत असत तसे शत्रुसमूहही भरतराजाच्या निघण्याच्या पूर्वीच जाण्याला उद्युक्त होत असत. जसे भरतराजा निघाला असता सेनापति तत्पूर्वी पुढे निघून जात असत तसे भरतप्रभूचे शत्रु त्याच्या आधीच आपले स्थान सोडून निघून जात असत. अर्थात् स्थान सोडून पळत असत. अथवा भरतप्रभूला शरण जाण्यासाठी उद्युक्त होत असत. भरतमहाराज नगरातून निघण्याच्या पूर्वीच सेनापति प्रथम नगरातून पुढे जात असत. तसे शत्रु आपल्या नगरातून आधीच निघून पुढे पळत जात असत. अथवा भरतराजाला भेटण्यासाठी आपल्या नगरातून शत्रु बाहेर येत असत. भरतमहाराजानी प्रस्थान करण्याच्या पूर्वी त्यांचे सेनापति प्रस्थान करीत होते तसे त्यांचे शत्रुही भरतमहाराजाच्या प्रस्थानापूर्वीच प्रस्थान करीत असत अर्थात् अन्य ठिकाणी निघून जात असत किंवा चक्रवर्तीला भेटण्यासाठी पुढे जात असत ।। ११ ॥
चक्रवर्ती भरतमहाराज नगरातून निघाले असे ऐकल्याबरोबर शत्रु व्याकुल होत असत व भरतमहाराज आले असे ऐकल्याबरोबर शत्रु भयवश होत असत व महाराज अगदी
असे ऐकल्यावर त्यांचे चित्त ठिकाणावर राहात नसे आणि मग शरण येऊन ते शत्र भरतमहाराजाना नमस्कार करीत असत ।। १२ ।।
अतिशय बलवान् अशा महानदीच्या वेगासमोर आलेल्या वृक्षाची जशी परिस्थिति होते अर्थात् तो मुळासकट उन्मळून पडतो तसे जे शत्रु या चक्रवर्तीच्या विरुद्ध जात ते पूर्णपणे नष्ट होत असत ।। १३ ॥
_पराक्रम गाजवणे हेच ज्याला आवडते अशा या भरत भूपालाला आरशात आपलेच प्रतिबिम्ब उलट दिसत असलेले सहन होत नव्हते. मग त्याला आपल्या उलट असलेला शत्रु कसा बरे सहन होईल ? ॥ १४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org