Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१४८)
महापुराण
(२९-३६
अतार्सीत्प्रणतानेष समताप्सोद्विरोधिनः । शमप्रतापौ मां जेतुं पार्थिवस्योचितौ गुणौ ॥३६ प्रसन्नया दृशवास्य प्रसादः प्रणते रिपौ। भ्रूभङगेणास्फुटत्कोपः सत्यं बहुनटा नपाः ॥ ३७ अङगान्मणिभिरत्यङगैर्वङगांस्तुङगैर्मतङगजः । तेश्च तैश्च कलिङगेशान्सोऽभ्यनन्ददुपानतान् ॥ मागधीयितमेवास्य स्फुटं मागधकर्नृपः । कोर्तयद्भिर्गुणानुच्चैः प्रसादमभिलाषकः ॥ ३९ कुरूनवन्तीन्पाञ्चालान्काशींश्च सह कोसलैः । वैदर्भानप्यनायासादाचकर्ष चमूपतिः ॥ ४० व्रजन्मद्रांश्च कच्छांश्च वेदोनवत्सान्ससुह्मकान् । पुण्डानौण्ड्रांश्च गौडांश्च मतमश्रावयद्विभोः॥ दशार्णान्कामरूपांश्च काश्मीरानप्युशीनरान् । मध्यमानपि भूपालान्सोऽचिराद्वशमानयत् ॥ ४२ बदुरस्मै नृपाः प्राच्यकलिङगाङगारजान्गजानृ । निरीनिवमहोच्छायान्प्रश्चोतन्मदनिर्झरान् ॥
जे राजे भरत चक्रवर्तीला नम्र झाले त्यांच्यावर तो सन्तुष्ट झाला, प्रसन्न झाला आणि जे राजे विरोधक होते त्याना त्याने अतिशय त्रस्त केले. बरोबरच आहे की, जो राजा पृथ्वीवर दिग्विजय करण्यासाठी निघाला आहे त्याच्या ठिकाणी शम-शान्ति व प्रताप हे दोन गुण असणे अगदी योग्य आहे ।। ३६ ।।
जे शत्रु नम्र होत असत त्यांच्याविषयी या भरतेशाने आपल्या प्रसन्न दृष्टीनेच प्रसाद व्यक्त केला व नम्र न झालेल्या राजाविषयी त्याने आपल्या भुवया चढवून कोप व्यक्त केला. यावरून अनेक भाव व्यक्त करणारा राजा अनेक नटाप्रमाणे असतो अशी म्हण सत्य आहे असे मानावयास हरकत नाही ।। ३७ ।।
अतिशय उत्कृष्ट रत्ने अर्पण करून नम्र झालेल्या अंग देशाच्या राजाना व उंच असे हत्ती नजराण्याकरिता पुढे करून नम्र झालेल्या वंग देशाच्या राजाना व उत्तम रत्ने आणि मोठे हत्ती यांचा नजराणा देऊन नम्र झालेल्या कलिंग देशांच्या राजाना पाहून तो चक्रवर्ती आनन्दित झाला ॥ ३८॥
चक्रवर्ती आपल्यावर नेहमी प्रसन्न राहावा या इच्छेने त्याच्या गुणांचे उच्च स्वराने गायन करणाऱ्या मगध देशाच्या राजानी उघड रीतीने स्तुति पाठकाचेच काम पत्करले ।। ३९॥
भरतेशाच्या सेनापतीने कोसल देशाच्या राजाबरोबर कुरु, अवन्ती, पांचाल, काशी व विदर्भ या देशांच्या राजाना अनायासाने वश केले होते ॥ ४० ॥
__मद्र, कच्छ, चेदि, वत्स, सुह्मक, पुण्ड, औण्ड, गौड आदिक देशात प्रयाण करणा-या सेनापतीने त्या त्या देशातील राजाना भरतप्रभूचे मत-शासन आज्ञा कळविली ।। ४१ ।।
याचप्रमाणे दशार्ण, कामरूप, काश्मीर, उशीनर व मध्यम या देशांच्या राजानाही त्या सेनापतीने लौकरच वश केले ॥ ४२ ॥
पर्वताप्रमाणे फार उंच व ज्यांच्या गंडस्थलातून मद झरत आहे असे जे पूर्व दिशेकडे असलेल्या कलिंग व अंगार देशात उत्पन्न झालेले हत्ती ते या चक्रवर्तीला अनेक राजानी भेट म्हणून अर्पण केले ॥ ४३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org