Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-९४)
महापुराण
(१५३
स साधनैः समं भेजे तैलामिक्षमतीमपि । नदी नरवां वङ्गा श्वसनां च महानदीम् ॥ ८३ धुनों वैतरणी माषवती च समहेन्द्रकाम् । सैनिकः सममुत्तीर्य ययौ शुष्कनदीमपि ॥ ८४ सप्तगोदावरं तीथं पश्यन्गोदावरी शुचिम् । सरो मानसमासाद्य मुमुदे शुचिमानसः ॥ ८५ सुप्रयोगां नदी तीर्वा कृष्णवर्णां च निम्नगाम् । सन्नीरां च प्रवेणी च व्यतीयाय समं बलैः॥८६॥ कुब्जा धैर्यां च चूर्णां च वेणां सूकरिकामपि । अम्बेणां च नदी पश्यन्दाक्षिणात्यानशुश्रुवत् ॥ ८७ महेन्द्रादि समानामन्विन्ध्योपान्तं च निर्जयन् । नागपर्वतमध्यास्य प्रययौ मलयाचलम् ॥८८ गोशीर्ष दुर्दराद्रिचगिरि पाण्डयकवाटकम् । स शीतगुहमासीदन्नगंश्रीकटनाह्वयम् ॥ ८९ श्रीपर्वतं च किष्किन्धं निर्जयन्जयसाधनैः । तत्र तत्रोचितै भैरवर्षत चमूपतिः ॥ ९० कर्णाटकान्स्फुटाटोपविकटोशूटवेषकान् । हरिद्राञ्जनताम्बूलप्रियान्प्रायो यशोधनान् ॥ ९१ आन्ध्रान्रुन्द्रप्रहारेषु कृतलक्षान्कदर्यकान् । पाषाणकठिनानङगैर्न परं हृदयैरपि ॥ ९२ कालिङ्गकान्गजप्रायसाधनान्सकलाधनान् । प्रायेण तादृशानोण्डान्जडानुड्डमरप्रियान् ॥ ९३ चोलिकानलिकप्रायान्प्रायशोऽनृजुचेष्टितान् । केरलान्सरलालापान् कलगोष्ठीषु चञ्चुरान् ॥ ९४
तो सेनापति आपल्या सेनेसह तैला, इक्षुमती,, नक्रखा, बङ्गा, श्वसना आणि महानदी या नद्यावर क्रमाने आला ॥ ८३ ।।
सेनापति आपल्या सैनिकासह वैतरणी, भाषवती, महेन्द्रका या नद्यावर उतरून नंतर शुष्क नदीवर देखील गेला ।। ८४ ।।
सप्तगोदावर तीर्थ व पवित्र गोदावरीला पाहून तो राजा पवित्र मानससरोवराकडे प्रयाण करून आनंदित झाला ॥ ८५ ।।
सुप्रयोगा नामक नदी व कृष्णवर्णा नदीला तरून आणि सन्नीरा व प्रवेणी या नदीला उल्लंघून चक्रवर्ती आपल्या सेनेसह पुढे गेला. तसेच कुब्जा, धैर्या, चूर्णी, वेणा, सूरिका आणि अम्बेणा या नद्याना पाहत त्याने भरत राजाने आपले आगमन दक्षिणेतल्या राजाना कळविले ।। ८६-८७ ॥
यानंतर महेन्द्र नामक पर्वताला ओलांडून आणि विन्ध्य पर्वताचा परिसर जिंकून सेनापति नाग पर्वतावर गेला. तेथे राहून नन्तर तो मलय पर्वतावर गेला ॥ ८८ ॥
___ यानंतर गोशीर्ष, दर्दुर पर्वत व पाण्डयकवाट पर्वत यांना उल्लंघून नंतर शीतगुह पर्वत व श्रीकट पर्वतावर गेला. श्रीपर्वत व किष्किध याना सेनापतीने आपल्या जय मिळविणा-या सेनासमूहाने जिकिले व तेथे योग्य अशा लाभानी तो सेनापति समृद्ध झाला ।। ८९-९० ॥
ज्याच्या ठिकाणी गर्व स्फुरत होता व त्याला अनुसरून त्यांचा वेष होता असे व हळद काजळ व तांबूल हे ज्यांना फार आवडतात व ज्यांना यशोधन आवडते असे कर्नाटक देशाचे राजे होते. मर्मस्थली प्रहार करण्यात चतुर व जे कृपण आहेत, जे अङ्गांनीच
म. २०
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org