Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२९-७३)
महापुराण
(१५१
तैरश्चिकं गिरि क्रान्त्वा रुद्ध्वा वैडूर्यभूधरम् । भटाः कुटाद्रिमुल्लङध्य पारियात्रमशिवयन् ॥ ६७ गत्वा पुष्पगिरेः प्रस्थान्सानू स्मितगिरेरपि । गदागिरेनिकुञ्जषु बलान्यस्य विशश्रमः॥ ६८ वातपृष्ठदरीभागाबृक्षवत्कुक्षिभिः समम् । तत्सैनिकाः श्रयन्तिस्म कम्बलाद्रितटान्यपि ॥ ६९ वासवन्तं महाशैलं विलअध्यासुरधूपने । स्थित्वास्य सैनिकाः प्रापन्मदेभानगिरेयिकान् ॥७० निःसपत्नमिति भ्रमरितश्चेतश्च सैनिकाः । द्विपान्वनविभागेषु कर्षन्तोऽस्य निजगंजः ॥ ७१ दुस्तराः सुतरा जाताः सम्भुक्ताः सरितो बलैः । स्वारोहाश्च दुरारोहा गिरयः क्षुण्णसानवः॥ राष्ट्राण्यवधयस्तेषां राष्ट्रीयाश्च महीभुजः । फलायज्जज्ञिरे भर्तुर्योनिताश्चामुना फलैः ॥७३
कुहा, समतोया, कञ्चानदी व कपीवती या नद्यानाही, याचप्रमाणे निर्विन्ध्या नदी, जाम्बुवती, उत्तमा नदी, समुद्राला मिळालेली वसुमती नदी, शर्करावती नदी, सपा, कृतमाला, परिञ्चा पनसा नदी, अवन्तिकामा आणि हस्तिपानी नदी, वागन्धु नदी, व्याघ्री नदी व चर्मण्वती नदी, शतभागा, नन्दा व करमवेगिनी नदी, चुल्लितापी, रेवी, सप्तपारा व कौशिकी नदी या सर्व नद्यांचे पाणी खोल होते, या सर्व नद्याना भरतेशाच्या सैन्याने चोहीकडून घेरले व घोड्यांच्या खुरानी त्यांचे तट पडल्यामुळे ते अधिक विस्तृत झाले ॥ ६१-६६ ॥
याच्या सैन्यातील वीरांनी तैरश्चिकनामक पर्वताला उल्लंघून नन्तर वैडूर्य पर्वताला वेढा दिला. तदनंतर त्या वीरांनी कुट पर्वताला उल्लंघिले आणि पारियात्र पर्वतावर मुक्काम केला ॥ ६७ ॥
पुष्पगिरीच्या वरच्या सपाट भागावर भरतेशाची सैन्ये आधी गेली. यानंतर स्मितगिरीच्या सानूवर-वरच्या सपाट भागावर गेली. नंतर गदागिरीच्या लतामंपडात त्यांनी विश्रान्ति घेतली ॥ ६८ ॥
या चक्रवर्तीच्या सैन्यानी ज्याच्या गुहामध्ये अस्वले आहेत अशा वातपृष्ठ नामक पर्वताच्या दन्यामध्ये निवास केला व कंबल पर्वताच्या तटावरही निवास केला ॥ ६९ ।।
भरतेशसैनिकानी यानंतर वासवन्त नामक महान् पर्वत उल्लंधिला आणि ते असुरधूपन पर्वतावर गेले. तेथे मुक्काम करून नंतर ते मदेभ व अनंगिरेयक या दोन पर्वतावर गेले ॥ ७० ॥
हा सर्व प्रदेश शत्रुरहित असल्यामुळे भरतेशाचे सैनिक इकडे तिकडे खुशाल फिरू लागले व येथील वनविभागात असलेल्या हत्तींना आपल्या हत्तींच्या द्वारे त्यानी ओढून आणिले ।। ७१ ।।
ज्या नद्या तरून जाण्यास अशक्य होत्या त्यांचे पाणी भरतेशाच्या सैन्यानी प्याल्यामुळे त्या सुतर-तरून जाण्या योग्य झाल्या. ज्या पर्वताचा वरील भाग चढून जाणे कठिण होते या सैन्याच्या चालण्याने तो भाग फुटून गेल्यामुळे सहज चढता येण्यास योग्य झाले ।। ७२ ॥
सर्व राष्ट्र व त्यांच्या सीमा, त्या राष्ट्रात असलेले लोक व त्या राष्ट्राचे अधिपति राजे यांचा भरतेशाने संतोष केला त्यामुळे त्यांनीही भरतेशाला सन्तुष्ट केले ।। ७३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org