________________
१४६)
महापुराण
(२९-२२
वस्तुवाहनसर्वस्वमाच्छिद्य प्रभुराहरत् । अरित्वमरिचक्रेषु व्यक्तमेव चकार सः ॥ २२ स्वयमपितसर्वस्वा नमन्तश्चक्रवतिनम् । पूर्वमप्यरयः पश्चादधिकारित्वमाचरन् ॥ २३ साधनैरमुनाकान्ता या धरा घृतसाध्वसा । सा धनैरेव तं तोषं नीत्वाभूद्धृतसाध्वसा ॥ २४ कुल्याः कुलघनान्यस्मै दत्वा स्वां भुवमाजिजन् । कुल्याधनजलौघाश्च जिगीषोस्ते हि पार्थिवाः ॥ प्रजाः करभराक्रान्ता यस्मित्स्वामिनि दुःखिताः । तमुद्धृत्य पदे तस्य युक्तदण्डं न्यधाद्विभुः ॥ २६ विजग्राह नपान्दृप्ताननुजग्राहसत्क्रियान् । न्यायः क्षात्रोऽयमित्येवं प्रजाहितविधित्सया ॥ २७ योगक्षेमौ जगत्स्थित्य न प्रजास्वेव केवलम् । प्रजापालेष्वपि प्रायस्तस्य चिन्त्यत्वमीयतुः ॥ २८
या भरतराजाने शत्रूची रत्ने, मोत्ये आदिक धन आणि घोडे, हत्ती आदिक वाहने व आणखी बाकीचे पदार्थ, देश कोशादिक सर्व लुटून नेले व स्पष्ट रीतीने या शत्रुसमूहात त्याने अरित्व व्यक्त केले. अरित्व-अरि-रे म्हणजे धन संपत्ति ती शत्रूची या भरताने घेतल्यामुळे ते शत्रु उघडपणे अरि झाले-धनरहित झाले ।। २२ ।।
भरतराजाला नमस्कार करून त्याला सर्वस्व अर्पण करणारे कांहीं राजे पूर्वी त्याचे शत्रु होते पण त्यानंतर ते मोठे अधिकारी झाले ।। २३ ॥
या भरतेश्वराच्या सैन्यानी आक्रमण केलेली व भयभीत झालेली जी पृथ्वी तिने धन देऊन चक्रवर्तीला जेव्हा सन्तुष्ट केले तेव्हा चक्रवर्तीने तिचे भय दूर केले ॥ २४ ॥
कुलीन वंशातील राजानी आपल्या जवळचे वंशपरंपरेने चालत आलेले रत्नादिक धन देऊन आपली भूमि चक्रवर्तीपासून मिळविली. हे योग्यच झाले कारण कुल्य-कुलपरंपरेने प्राप्त झालेले धन व कुल्या म्हणजे कालव्याचे जल-पाणी हे दोनही पदार्थ पृथ्वी पासून उत्पन्न झालेले असल्यामुळे पृथ्वीला जिंकणाऱ्याचेच असतात ॥ २५ ॥
जो राजा राज्य करीत असता प्रजेवर अतिशय कर बसवून तिला दुःखी करितो अशा राजाला भरतचक्रवर्तीने राज्यापासून बाजूला केले व त्याच्या पदावर कोणा योग्य व्यक्तीला त्याने बसविले ।। २६ ।।
या भरतेश्वराने उन्मत्त झालेल्या राजाना दंड केला व चांगले कार्य करणान्यावर अनुग्रह केला व हे योग्यच झाले. कारण प्रजेचे हित करण्याच्या इच्छेने क्षत्रियानी असे वागणे न्याययुक्तच आहे ॥ २७ ॥
__ योग-- जी वस्तु जवळ नसते ती मिळविणे, क्षेम- मिळविलेली जी वस्तु तिचे रक्षण करणे. हे योग क्षेम जगाचे सर्व व्यवहार सुरळित चालण्यास कारण आहेत. भरतेश्वराने ते योग क्षेम फक्त प्रजेच्या ठिकाणी असले म्हणजे पुरे आहे असे मानले नाही तर ते योगक्षेम प्रजापालक मांडलिक राजातही असावेत याविषयी भरतराजाला फार काळजी होती ॥ २८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org