________________
एकोनत्रिंशं पर्व |
अथ चक्रधरो जेनीं कृत्वेज्यामिष्टसाधनीम् । प्रतस्थे दक्षिणामाशां जिगीषुरनुतोयधि ॥ १ तोऽस्य पटुढक्कानां ध्वनिरामन्द्रमुच्चरन् । मूर्च्छितः काहलारावैरब्धिध्वानं तिरोदधे ॥ २ प्रयाणभेरी निःस्वानः सम्मूर्च्छन् गजबृंहितैः । दिङ्मुखान्यनयत्क्षोभं हृदयानि च विद्विषाम् ॥ ३ विबभुः पवनोद्धूता जिगीषोजयकेतनाः । वारिधेरिव कल्लोलानुद्वेलाना जुहूषवः ॥ ४ एकतो लवणाम्भोधिरन्यतोऽप्युपसागरः । तन्मध्येयान्बलौघोऽस्य तृतीयोऽब्धिरिवाबभौ ॥ ५ हस्त्यश्वरथपादातं देवाश्च सनभश्चराः । षडङ्गं बलमस्येति पप्रथे व्याप्य रोदसी ॥ ६ पुरः प्रतस्थे दण्डेन चक्रेण तदनन्तरम् । ताभ्यां विशोधिते मार्गे तद्दलं प्रययौ सुखम् ॥ ७ तच्चक्रमरिचक्रस्य केवलं क्रकचायितम् । दण्डोऽपि दण्डचपक्षस्य कालदण्ड इवापरः ॥ ८
यानंतर चक्रायुधधारी भरतेश्वराने इष्टजयप्राप्ति करून देणारी जिनेश्वराची पूजा केली. नंतर दक्षिणदिशेला जिंकण्याची इच्छा करणारा तो समुद्राला अनुसरून प्रयाण करू लागला ।। १ ॥
त्यावेळी मोठ्या नगान्यांचा गंभीर ध्वनि तुतान्यांच्या आवाजानी युक्त होऊन दुप्पट झाला व त्याने समुद्राच्या ध्वनीला आच्छादले. समुद्राची गर्जना ऐकू येईना अशी झाली ॥ २ ॥
प्रयाणाच्यावेळी वाजविलेल्या नगान्यांचा ध्वनि हत्तीच्या शब्दानी द्विगुण- दुप्पट झाला व त्याने दिशांची मुखे दणाणली व शत्रूची मनेही घाबरी झाली ॥ ३ ॥
दक्षिणेकडील प्रदेशाला जिंकण्याची इच्छा करणान्या भरतराजाचे वायानी वर फडफडणारे विजयध्वज तीरावर येऊन आपटत असलेल्या समुद्राच्या तरंगाना जणु बोलावण्याची इच्छा करीत असल्याप्रमाणे शोभत होते ॥ ४ ॥
एका बाजूला लवणसमुद्र आणि दुसरीकडे उपसागर. या दोहोच्या मध्यप्रदेशातून प्रयाण करणारे हे भरतेशाचे सैन्य जणु तिसन्या समुद्राप्रमाणे शोभले ।। ५ ।।
हत्ती, घोडे, रथ, पायदळ व विद्याधर सैन्यासह असलेले देवसैन्य असे सहा प्रकारचे या भरतराजश्वराचे सैन्य होते व ते आकाशात व पृथ्वीवर व्यापून पसरले होते ॥ ६ ॥
सर्व सैन्याच्या पुढे दण्डरत्न चालत असे, यानंतर चक्ररत्न चालत असे आणि या दोघांच्याद्वारे स्वच्छ केलेल्या मार्गानी चक्रवर्तीचे सैन्य सुखाने प्रयाण करू लागले ।। ७ ।।
ते चक्र शत्रुसैन्याला केवळ करवताप्रमाणे कापून टाकणारे वाटत असे व दण्डरत्न देखिल शत्रुगणाला यमाच्या दण्डाप्रमाणे वाटत असे ।। ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org