Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-२१८)
पुण्यक सारथिरिति विनान्तरायः । पुष्ये प्रसेदुषि नृणां किमिवास्त्यल अध्यम् ॥ २१३ पुण्यादयं भरतचक्रधरो जिगीषु रुद्भिन्नवेलमनिलाहतवीचिमालम् । प्रोल्लध्य वाद्धिममरं सहसा विजिग्ये । पुण्ये बलीयसि किमस्ति जगत्यलङध्यम् ॥ २१४ पुण्योदयेन मकराकर वारिसीमां । पृथ्वीं स्वसादकृत चक्रधरः पृथुश्रीः ॥ दुर्लभ्यमब्धिमवगाह्य विनोपसर्गेः । पुण्यात्परं न खलु साधनमिष्टसिद्धये ॥ २१५ चक्रायुधोऽयमरिचक्रभयङ्कर श्रीः । आक्रम्य सिन्धुमतिभीषणनऋचक्रम् ॥ चक्रे वशे सुरमवश्यमनन्यवश्यं । पुण्यात्परं न हि वशीकरणं जगत्याम् ॥ २१६ पुण्यं जले स्थलमिवाभ्युपपद्यते नृन् । पुण्यं स्थले जलमिवाशु निहन्ति तापम् ॥ पुण्यं जलस्थलभये शरणं तृतीयम् । पुण्यं कुरुध्वमत एव जना जिनोक्तम् ॥ २१७ पुण्यं परं शरणमापदि दुविलङ्घ्यं । पुण्यं दरिद्रति जने सुखदायि पुण्यम् ॥ पुण्यं सुखार्थानि जने सुखदायि रत्नम् । पुण्यं जिनोदितमतः सुजनाश्चिनुध्वम् ॥ २१८
महापुराण
हा भरतप्रभु कांही अन्तराय न येता येथे आला आहे. पुण्य प्रसन्न झाले म्हणजे मनुष्याला अलंघ्य वस्तु कोणतीच राहात नाही. अर्थात् सर्व उत्तम वस्तूंची प्राप्ति होतेच ।। २१३ ।।
( १४१
सर्व जगाला जिंकण्याची इच्छा करणान्या भरतराजाने ज्याच्यात भरती ओहोटीनहमी उत्पन्न होतात व ज्याच्या लाटा वायूने सारख्या उठून आपटल्या जातात अशा समुद्राचे उल्लंघन केले व मागधदेवाला सहसा जिंकले. हे सर्व योग्यच झालें. कारण पुण्य बळकट असल्यावर जगात कांहीच अलंध्य - असाध्य नाही ।। २१४ ।।
ज्यांचे वैभव फार मोठे आहे अशा चक्री भरताने ही संपूर्ण भरतक्षेत्ररूपी पृथ्वी जिला लवणसमुद्राच्या पाण्याची सीमा आहे तिला पुण्याच्या विशाल उदयाने आपल्या आधीन करून घेतले आहे. ज्यात प्रवेश करणे अत्यंत कठिण आहे अशा लवणसागरात प्रवेश करून काहीही विघ्नावाचूनही भरत लक्ष्मी निजाधीन करून घेतली. यावरून इष्टसंसिद्धि होण्याकरिता पुण्याशिवाय दुसरे उत्कृष्ट साधन नाहीच असे म्हणावयास बिलकुल हरकत नाही ।। २१५ ।।
शत्रुसमूहाला ज्याची लक्ष्मी फार भयंकर वाटते अशा या चक्रायुधयुक्त भरतेशाने अतिशय भयंकर मगरादिक जलचरांचा समूह ज्यात आहे अशा सिन्धु - लवणसमुद्राला जिंकले व कोणालाही वश न होणान्या मागधदेवाला वश केले. यावरून या जगात पुण्याशिवाय दुसरें वश करणारे साधन नाही हे सिद्ध होते ।। २१६ ।।
पुण्य हे पाण्यात मानवाना स्थलस्वरूपाचे होते व हे पुण्य स्थलावर पाण्याप्रमाणे होऊन संतापाचा नाश करते. हे पुण्य जलभय व स्थलभय दूर करण्यास मनुष्याना तिसरा उपाय आहे. म्हणून जनहो जिनेश्वराने सांगितलेले पुण्य करा ।। २१७ ॥
Jain Education International
है पुण्य आपत्तीत ज्याचा अतिक्रम कोणीही करू शकत नाही असे मनुष्याचे रक्षक आहे. हे पुण्य दारिद्रयावस्थेत मनुष्याला धन देणारे आहे. जो सुखेच्छु आहे त्याला हे पुण्य
For Private & Personal Use Only
•
www.jainelibrary.org