Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२८-२१९
पुण्यं जिनेन्द्रपरिपूजनसाध्यमाद्यम् । पुण्यं सुपात्रगतदानसमुत्थमन्यत् ॥ पुण्यं व्रतानुचरणादुपवासयोगात् । पुण्यार्थिनामिति चतुष्टयमर्जनीयम् ॥ २१९ इत्थं स्वपुण्यपरिपाकजमिष्टलाभम् । स श्लाघयनजनतया श्रुतपुण्यघोषः॥ चक्री सभागृहगतो नृपचक्रमध्ये । शक्रोपमः पृथुनपासनमध्यवात्सीत् ॥ २२०
हरिणी धुततटवने रक्ताशोकप्रवालपुटोद्भिदि । स्पृशति पवने मन्दं मन्वं तरङ्गविभेदिनि । अनुसुरसरित्सन्यः साधं प्रभुः सुखमावस-ज्जलनिधिजयश्लाघाशीभिजिनाननुचिन्तयन् ॥ २२१
इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणश्रीमहापुराणसंग्रह
पूर्वार्णवद्वारविजयवर्णनं नामाष्टाविशं पर्व ॥ २८॥
सुख देणारे रत्नाप्रमाणे आहे. म्हणून हे सज्जनानो, आपण जिनेश्वरानी सांगितलेले पुण्य नेहमी संचित करा ॥ २१८ ।।
जिनेश्वराचे पूजन केल्यापासून प्राप्त होणारे जे पुण्य ते सर्वश्रेष्ठ म्हणून पहिले होय. सत्पात्राला दान दिल्यापासून उत्पन्न होणारे जे पुण्य आहे ते दुसरे पुण्य आहे. अहिंसादिक व्रताचरणापासून प्राप्त होणारे पुण्य हे तिसरे पुण्य होय व उपवास केल्यापासून प्राप्त होणारे जे पुण्य ते चौथे होय. असे पुण्याचे चार प्रकार आहेत. म्हणून पुण्याची इच्छा करणान्यानी श्रीजिनेन्द्रपूजा करावी, सत्पात्राला दान द्यावे, अहिंसादिक व्रतांचे पालन करावे व उपवासादि नियम पाळावे. अशा या चार क्रिया अवश्य कराव्यातच ।। २१९ ।।
याप्रमाणे आपल्या पुण्याच्या उदयापासून जो इष्टपदार्थाचा लाभ झाला आहे त्याविषयी मनात जो आनंद मानीत आहे व स्वपुण्याची जनतेकडून झालेली घोषणा ज्याने ऐकिली आहे असा तो चक्रवर्ती सभागृहात गेला. तो राजसमूहामध्ये इद्राप्रमाणे दिसत होता व सभागृहातील मोठ्या राजसिंहासनावर तो इंद्राप्रमाणे बसला ॥ २२० ॥
तीरावरील वृक्षांना हालविणारा व लाल अशोकाच्या कोवळ्या पालवींना विकसित करणारा व लाटांना मंदमंदपणाने वेगळे करणारा असा वारा वहात असता त्या गंगानदीच्या तटावर आपल्या सैन्यासह नृपेशभरत सुखाने राहिला व समुद्राला जिंकल्यामुळे लोकांच्या मंगल आशीर्वादासह श्रीजिनेश्वराचे चिन्तन तो मनात करू लागला ।। २२१ ॥
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादात पूर्वसमुद्राच्या द्वाराच्या विजयाचे वर्णन करणारे अठ्ठाविसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org